पोस्ट्स

MB NEWS-■किसान सभेच्या लढ्यास आणखी एक यश

इमेज
  ■किसान सभेच्या लढ्यास आणखी एक यश ●जिल्हाभरातील सर्वच महसूल मंडळास मिळवून दिला हक्काचा विमा परळी / प्रतिनिधी रस्तावरील आंदोलने, शासन दरबारी पाठपुरावा, कायदेशीर लढाई ,सोशल मीडिया ऑनलाईन ट्रेंड या सर्वच पातळीवर बीड जिल्हा किसान सभेने केलेल्या लढाईस आणखी एक यश मिळाले असून जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात पीक विमा कंपनीस विमा देण्यास भाग पाडले असून काही ठिकाणी शेतकऱ्यांना हा विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे.दुसरीकडे सण 2020 च्या खरीप पीक विमा बाबत केलेले आंदोलने व अभ्यासपूर्ण अहवाल शासन दरबारी मंत्रालयात राज्य तक्रार निवारण समिती समोर मांडत सण 2020 ची किसान सभेने केलेली पीक विमा देण्याची मागणी राज्य तक्रार निवारण समिती ने योग्य असल्याचे मत व्यक्त करीत पीक विमा कंपनीस खरीप 2020 चा पीक विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात यावा असे आदेश पीक विमा कंपनीस दिले आहेत.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नी खंबीरपणे पाठीशी असलेल्या किसान सभेच्या विविध मागण्या आता मंजूर करण्यात येत असून किसान सभेने केलेल्या विविध लढ्याचे हे यश आहे. बीड जिल्हातील शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागत

MB NEWS- ग्रामपंचायत निवडणूकीसाठी परळीत अर्ज प्राप्त 357

इमेज
  ग्रामपंचायत निवडणूकीसाठी परळीत 357 अर्ज प्राप्त  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज परळीत 357 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे . परळी वै तालुका ग्राम पंचायत निवडणुक सार्वञिक निवडणुक  2022  दिनांक-30-11-2022 एकूण ग्रामपंचायत-80 प्राप्त नामनिर्देशन पञ-357 सरपंच पदासाठी-59 सदस्य पदासाठी-298 ------------------------------------- Click: ● *'गावचे कारभारी अन् चारचाकीची सवारी' | ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी|तहसीलला यात्रेचे रूप.* #mbnews#subscribe #comments#like #share

MB NEWS-वेबसाईट चालत नसल्यामुळे गोंधळ ;निवडणूक फॉर्मला आँनलाईनचा फटका!

इमेज
  वेबसाईट चालत नसल्यामुळे गोंधळ ;निवडणूक फॉर्मला आँनलाईनचा फटका! परळी वैजनाथ, प्रतिनिधीदि.३० सध्या राज्यभरात  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी  सुरू असून २८ नोव्हेंबर पासून राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र आँनलाईन भरणे सुरु केले आहे.परंतु वेबसाईट चालत नसल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे. राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूकीचे नामनिर्देशन पञ सादर करण्याची ऑनलाइन प्रक्रियेला वेबसाईटचा खोडा बसल्याने निवडणूक फॉर्म व जात पडताळणी फॉर्म भरणे कठीण झाल्याने निवडणूक लढवू पाहणाऱ्यांचा जीव भांड्यात अडकला आहे.त्याचबरोबर जे उमेदवार हे राखीव संवर्गातून फॉर्म भरत आहेत त्यांची पडताळणी प्रस्ताव आँनलाईन करून त्याची पावती घ्यायची आहे मात्र ती वेबसाईट धीम्या गतीने चालत असल्यामुळे अनेक उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. Click: ● *'गावचे कारभारी अन् चारचाकीची सवारी' | ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी|तहसीलला यात्रेचे रूप.* #mbnews#subscribe #comments#like #share नामर्देशन पत्र दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना अनेकांची जात पडताळणी प्रस्ताव सुद्धा तयार नाहीत त्यामुळे त्य

MB NEWS-ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरुडॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

इमेज
  ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन पुणे : ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. साठोत्तरी कालखंडात कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांत दर्जेदार वाङ्मयनिर्मिती करणारे नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ रोजी मुखेड (जि. नांदेड) या गावी झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण देगलूर येथे झाले. बी.ए. आणि एम. ए. या दोन्ही परीक्षांत मराठवाडा विद्यापीठात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. ते कुलपतींच्या सुवर्णपदकाने सन्मानित झाले होते. 'शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास' या विषयावर शोधप्रबंध लिहून त्यांनी १९८० साली पीएच.डी. पदवी संपादन केली. बीड येथील महाविद्यालयात १९७१ ते १९७७ या काळात मराठीचे अधिव्याख्याता

MB NEWS-महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयात मा.फुले पुण्यतिथी साजरी

इमेज
  महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयात मा.फुले पुण्यतिथी साजरी परळी / प्रतिनिधी महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र प्राथमिक विद्यालय, मोहा शाळेत सत्य शोधक समाजाचे संस्थापक, स्त्री शिक्षणासाठी, समानता व सत्यासाठी देह झिजवणारे, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे शोषित-वंचिताना आवाज देणारे, दिन दलितांचे कैवारी, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची  पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मा.ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमीत्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे मा.फुले यांच्या जीवन कार्याला उजाळा देत त्यांचे विचार व्यक्त केले. शिक्षकांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती देऊन त्यांचे कार्य व त्यांचा वारसा पुढे नेण्याची गरज असल्याचे सांगत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनीषा जाधव,सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

MB NEWS-●मोहा येथील महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थिनी

इमेज
 ■ कु.किरण कुट्टे हिची बीड जिल्हा संघात निवड ●मोहा येथील महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थिनी परळी / प्रतिनिधी महाराष्ट्र विद्यालय मोहा येथील इयत्ता 9 वर्गात शिक्षण घेत असलेल्या कु.किरण कुट्टे या विद्यार्थिणीची बीड जिल्हा असोसिएशनच्या कुमारी संघात निवड झाली असून राज्य पातळीवरील स्पर्धेत ती बीड जिल्ह्यासाठी खेळणार आहे. महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा च्या संचालक मंडळाच्या  मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विद्यालय मोहा ही शाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांमध्ये असलेला क्रीडा आणि कलागुणांना प्राधान्य देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने कार्य करत आहे.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत आपल्या दमदार खेळीने सर्वांचे लक्ष्य वेधून राज्यस्तरीय स्पर्धेकरिता कु.किरण कुट्टे हिची निवड करण्यात आली असून ती राज्य पातळीवरील बीड जिल्ह्याच्या मुलींच्या कबड्डी संघात जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.कु.किरण च्या या यशामागे तिचे प्रशिक्षक क्रीडा शिक्षक सुनील तारे,शाळेचे क्रीडा प्रेमी मुख्याध्यापक धं

MB NEWS-झाली.....अखेर तुकाराम मुंढे यांची बदली

इमेज
  झाली.....अखेर तुकाराम मुंढे यांची बदली बीड- अवघ्या दोन महिन्यांपूर्वी आरोग्य विभागाच्या आयुक्त पदाची सूत्र स्वीकारणारे आणि या दोन महिन्यात आरोग्य विभागाला शिस्त लावणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांची शासनाने उचलबांगडी केली आहे.त्यांची बदली केली असली तरी अद्याप त्यांना पदस्थापणा देण्यात आलेली नाही . राज्याच्या आरोग्य विभागाची सूत्र दोन महिन्यांपूर्वी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे हे आपल्या अनेक निर्णयामुळे वादग्रस्त ठरले होते.कर्मचारी जीन्स टी शर्ट घालून कामावर येऊ शकत नाहीत,प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर रात्री सुद्धा मेडिकल ऑफिसर नियुक्त असावा यासह अनेक निर्णय त्यांनी घेतले होते. Click : MB NEWS च्या youtube channel  ला भेट द्या:-  https://youtube.com/@manswibhawawishwa-ravindra694 ज्या विरोधात राज्यातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन देखील केले होते.दरम्यान मुंडे यांच्या या निर्णयामुळे त्यांची बदली होणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.मुंढे यांच्याकडील पदभार काढण्यात आला असून त्यांची बदली केली आहे.मात्र त्यांना अद्याप नव्याने पडस्थापणा देण

MB NEWS-परळी वैजनाथ कॉरिडॉरच जनता जनार्दनाच्या प्रगतीची गुरुकिल्ली..!

इमेज
  परळी वैजनाथ कॉरिडॉरच जनता जनार्दनाच्या प्रगतीची गुरुकिल्ली..! # जोशींचीतासिका (भाग १) जय वैद्यनाथ, प्रत्येक राष्ट्राची प्रगती केव्हा होते तर त्या राष्ट्रातील शेवटच्या नागरिकाची प्रगती झाली तेव्हाच. प्रगतीची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. आपण इथे फक्त भारतीय संविधानाला अपेक्षित प्रगती गृहीत धरूया. प्रत्येक ठिकाणी रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण झाल्या तर नागरिकांचा विकास होणारच. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारतर्फे आणलेली 'प्रसाद' योजना अशीच एक आहे. तीर्थक्षेत्र विकास करणे आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा प्रामुख्याने त्या योजनेचा उद्देश आहे. एक भाविक / पर्यटक कोणत्याही ठिकाणी गेला तर रोजगाराच्या २२ संधी निर्माण होतात. कुठल्याही भागाचा विकास हा स्थानिकांनी मनावर घेतले तर नक्कीच होऊ शकतो. फक्त गरज असते तो इच्छा शक्तीची. आजच्या तासिकेत पाच उदाहरण सांगणार आहे की, जेणेकरून नागरिकांनी स्वतः प्रगती करायची ठरवल्यावर काय होऊ शकते हे लक्षात येईल..! १)  केदारनाथ धाम : श्री क्षेत्र केदारनाथचे कपाट (दरवाजे) या वर्षी ६ मे रोजी सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी दर्शनास

MB NEWS-आयएएस अधिकारी बदल्या: कोणाची कुठे झाली बदली ?

इमेज
  आयएएस अधिकारी बदल्या: कोणाची कुठे झाली बदली ? दि. २९.११.२०२२ 1. डॉ व्ही.एन. सूर्यवंशी, IAS-2006, अतिरिक्त आयुक्त MMRDA, मुंबई यांची आयुक्त, उत्पादन शुल्क, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2. भाग्यश्री बानायत - NL:2012, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांची सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 3. श्री विनय सदाशिव मून, IAS-2011, मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P. भंडारा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., परभणी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. Click : MB NEWS च्या youtube channel  ला भेट द्या:-  https://youtube.com/@manswibhawawishwa-ravindra694 4. श्री. सुनील एस चव्हाण, IAS-2007, यांची नियुक्ती आयुक्त, कृषी, पुणे म्हणून करण्यात आली आहे. 5. श्री एस.एम. कुर्तकोटी, IAS – 2013, यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P भंडारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 6. श्रीमती सौम्या शर्मा, IAS -2018, सहाय्यक जिल्हाधिकारी देगलूर उपविभाग नांदेड यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P, नागपूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

MB NEWS-शासनामार्फत सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचा दिला शब्द

इमेज
  कौठळीच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची पंकजाताई मुंडेंनी घेतली भेट शासनामार्फत सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचा दिला शब्द परळी वैजनाथ ।दिनांक २९। कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेल्या कौठळी येथील अंकुश गरड या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले. शासनामार्फत सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. Click : MB NEWS च्या youtube channel  ला भेट द्या:-  https://youtube.com/@manswibhawawishwa-ravindra694    नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत  कौठळी येथील अंकुश भानुदास गरड या तरूण शेतकऱ्याचे उभे पिक वाहून गेले. अगोदरच कर्जाचा डोंगर आणि त्यात हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने अंकुश गरड यांनी २५ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. पंकजाताई मुंडे यांनी आज या शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले व धीर दिला. यावेळी महसूल प्रशासनाशी संपर्क साधून त्यांनी शासनामार्फत मदत मिळवून देण्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, लक्ष्मीकांत कराड, पप्पू चव्हा

MB NEWS-ॲक्युपंक्चरिस्ट डॉ. राहुल देशमुख, सौ साधना देशमुख यांचा सत्कार

इमेज
  ॲक्युपंक्चरिस्ट डॉ. राहुल देशमुख, सौ साधना देशमुख यांचा सत्कार  परळी,छत्रपती संभाजीनगर येथे आयुष  इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे राष्ट्रीय पातळीवरचा ॲक्युपंक्चर स्टार अवॉर्ड 2022 हा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, कायरोप्रॅक्टिक   डॉ रजनीश कांत पटना   यांच्या हस्ते 27 नोव्हेंबर रोजी परळी येथील गणेशपार भागातील ॲक्युपंक्चरिस्ट डॉक्टर राहुल देशमुख, सौ साधना देशमुख यांना प्रदान करण्यात आला. Click : MB NEWS च्या youtube channel  ला भेट द्या:-  https://youtube.com/@manswibhawawishwa-ravindra694  त्याबद्दल डॉक्टर राहुल देशमुख यांचा मंगळवारी खंडोबा मंदिर येथे हरि भाऊ डांगे,संजय खाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,यावेळीनारायण डांगे ,हरिभाऊ डांगे, नरहरी डांगे ज्ञानोबा शेळके, माऊली चिकने,राजाभाऊ बारगजे, डॉक्टर राहुल देशमुख ,शंकर कापसे, अमोल रुद्रवार ,अजय पुजारी शंकर कापसे ,राजाभाऊ बारगजे,श्रीकांत पाथरकर, अमर बुंदिले, सौदागर शेळके ,ऋषभ कान्हेगावकर उपस्थित होते

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी केले प्रवेशाचे स्वागत ; उजनी येथील साहेबराव मानेही भाजपात

इमेज
  राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का ; पंकजाताई मुंडेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचाचा  भाजपत प्रवेश पंकजाताई मुंडे यांनी केले प्रवेशाचे स्वागत ; उजनी येथील साहेबराव मानेही भाजपात परळी वैजनाथ ।दिनांक २९। ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. तालुक्यातील परचुंडीचे सरपंच बाळासाहेब थोरात आणि उजनीचे कार्यकर्ते साहेबराव माने यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी या प्रवेशाचे स्वागत केले आहे.    तालुक्यात सर्वत्र  ग्रामपंचायत निवडणूकीची जोरदार तयारी सुरू आहे. परचुंडीची ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात होती, तेथील विद्यमान सरपंच बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या  एकाधिकार शाहीला कंटाळून या निवडणूकीत पंकजाताई मुंडे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेत आज आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. थोरात यांचेसह श्रीराम फताळे, पंपू रूपनर, विकास थोरात, फुलचंद थोरात, महादेव थोरात, गोविंद पडूळे आदींसह अनेक कार्यकर्त्यांचे पंकजाताई मुंडे यांनी भाजपचा गमचा घालून स्वागत केले. भाजपचे तालु

MB NEWS-अंबाजोगाई पिपल्स को- ऑप.बँक लि 'च्या अध्यक्षपदी राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड

इमेज
  अंबाजोगाई पिपल्स को- ऑप.बँक लि 'च्या अध्यक्षपदी राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड  सहकार क्षेत्रात दीपस्तंभ ठरलेल्या अंबाजोगाई पिपल्स को- ऑप.बँक लि 'च्या अध्यक्षपदी राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड झाली आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केलेली भावना.... यानिमित्तानं सर्वसामान्यांच्या विकासाच्या पालखीचा भोई होता आले, याचा जितका आनंद आहे, तितकीच मोठी जबाबदारीही आहे, ही जाणीव मनात ठेवून  आजपासून लगेचच कामकाजाला सुरवात केली. आपल्या कार्यातून व दूरदृष्टीकोनातून ही बँक एका उंचीवर नेवून ठेवली. बँकेच्या माध्यमातून शेती, उद्योगाला उभे करण्याचे काम केले. शेतकरी बांधवांना, सर्वसामान्यांना सहकार्याचा हात दिला. पतसंस्था, सहकारी संस्था, यासह अन्य सहकारी संस्थांना सोयी सुविधा, योजना दिल्या. या बँकेच्या योजनांचे राज्यातील इतर बँकांनी वेळोवेळी स्वागत केले व त्या योजनांचे अनुकरणही केले. शेतकरी, सर्वसामान्यांच्या, तसेच व्यापारी, उद्योजक यांच्या उन्नतीचे ध्येय समोर ठेवून बँक आजवर ज्या पद्धतीने व ज्या गतीने कार्यरत आहे, त्याच पद्धतीने किंबहुना आण

MB NEWS-हेळंब येथे खंडोबा मंदिरात तीन दिवसशीय यात्रोत्सव

इमेज
  हेळंब येथे खंडोबा मंदिरात  यात्रोत्सव : विविध कार्यक्रम  पालखी सोहळा, वाघ्या मुरळी, कुस्त्यांची दंगलीसह विविध कार्यक्रम परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील मौजे हेळंब येथील ग्रामदैवत श्री.खंडोबा यात्रेस मंगळवारी प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने रविवारपासून मंदिर परिसर दुमदुमू लागला आहे.       हेळंब येथे 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान ग्रामदैवत श्री.खंडोबा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. बोरणा नदीकाठी बोरणाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले श्री.खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे.  या निमित्त मंगळवारी दुपारी १ वा. श्री खंडोबाची पालखी मिरवणुक निघणार आहे. रात्री १२ वाजता शोभेची दारु उडवून अतिषबाजी केली जाणार आहे व २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे. बुधवारी रात्री ८ ते १२ दरम्यान वाग्या मुरळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी , दि.1 डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होणार आहेत. जंगी कुस्त्यासाठी प्रथम पारितोषिक ५,००१/- ठेवण्यात आले आहे. Click : MB NEWS च्या youtube channel  ला

MB NEWS-राज्यपालांची पदमुक्त होण्याची इच्छा? राजभवनाने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले......

इमेज
  राज्यपालांची पदमुक्त होण्याची इच्छा? राजभवनाने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...... महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यापूर्वी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल कोश्यारी हे चर्चेत आले होते. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्याची मागणी करण्यात येत होती. त्यातच आता भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा सुरु आहे. जवळील व्यक्तीकडे पदमुक्त होऊन आपल्या राज्यात पुन्हा जाण्याची इच्छा कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे. पण, राजभवनाकडून या वृत्ताचे खंडण करण्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पदमुक्त होण्याबद्दल माध्यमांत सुरु असलेल्या चर्चा अफवा आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी पदमुक्त अथवा राजीनामा देण्याबाबत कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही, असे राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल कोश्यारी हे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. मुंबईतून गुजराती आणि मारवाडी लोकांनी पैसा काढून घेतला तर काही राहणार नाही. महात्मा फुल

MB NEWS-'तर कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचं नाही'!

इमेज
  'तर कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचं नाही'! -उदयनराजे महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर वेगळेच वादळ तयार झाले आहे. त्यांची हाकलपट्टी करण्याची मागणी सगळीकडून होताना दिसत आहे. यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. उदयनराजे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. आपण कोणत्या पदावर आहोत याचे भान न ठेवता वेगळ्याच प्रकारे बोलण्याचा प्रघात सुरु झाला आहे. ज्या राजांनी आपल्याला गर्वानं, मानानं जगायला शिकवलं त्यांच्याबद्दल आपण जेव्हा कुणी काही बोलतं ते ऐकून कसं काय घेतो असा प्रश्न उदयन राजे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये उदयनराजे हे भावूक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी सरकारकडून शिवाजी राजांचे अधिकृत चरित्र का प्रकाशित केले जात नाही असाही सवाल उपस्थित केला आहे. Click : MB NEWS च्या youtube channel  ला भेट द्या:-  https://youtube.com/@manswibhawawishwa-ravindra694 आपल्याला खरचं शिवाजी महाराजांच

MB NEWS-.....म्हणून करण्यात आली पहिली ते आठवी शिष्यवृत्ती बंद !

इमेज
  .....म्हणून करण्यात आली पहिली ते आठवी शिष्यवृत्ती बंद ! बीड- पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती योजना केंद्र शासनाने बंद केली आहे.आठवीपर्यंत चे शिक्षण मोफत असल्याने या विद्यार्थ्यांना दिली जाणारी योजना बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.जवळपास सात लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. आता शाळांनी ते अर्ज प्रमाणित केल्यावर अचानक केंद्र शासनाने हे अर्ज फेटाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मागील वर्षी शिष्यवृत्ती मिळालेले व यंदा नव्याने अर्ज करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीला मुकले असून, पालकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. पहिली ते दहावीपर्यंतच्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेतून केंद्र सरकारमार्फत दरवर्षी एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. यंदा नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अर्ज भरून घेणे व पडताळणी करून केंद्राकडे पाठविण्याची जबाबदारी शिक्षण संचालक (योजना) कार्यालयाकडे दिली होती. सुरुवातीला अत्यल्प अर्ज भरले गेल्याने संचालनालयाने ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवून दिली. त्यानंतर पुन्हा ५ नाेव्हेंबरपर

MB NEWS-मोठी बातमी! राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून पदमुक्त होण्याचे संकेत

इमेज
  मोठी बातमी! राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून पदमुक्त होण्याचे संकेत मागील काही महिन्यांपासून वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आलेले  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी   हे पदमुक्त होण्याची शक्यता आहे. तसे संकेत मिळत असून राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती माहिती सूत्रांनी दिली आहे.  कोश्यारी  यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे म्हटले जात आहे.  राज्यपाल भगतसिंह यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करताना, शिवाजी महाराज हे जुन्या काळातले नायक होते, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात त्यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले होते. भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता. शिंदे गटानेही नाराजी व्यक्त केली होती. त्याशिवाय, छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी छत्रपती यांनीदेखील राज्यपालांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता.  Click : MB NEWS च्या youtube channel  ला भेट द्या:-  https://youtube.com/@manswibhawawishwa-ravindra694 राज्यपालांसंमोर पर्याय काय?

MB NEWS-महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने केला विश्वविक्रम:एकाच षटकात ठोकले 7 षटकार

इमेज
  महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने केला विश्वविक्रम: एकाच षटकात ठोकले 7 षटकार महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरी सामन्यात उत्तर प्रदेश विरुद्ध ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने एकाच सामन्यात दोन विश्वविक्रमांना गवसणी घातली. ऋतुराजने 159 चेंडूत 220 धावांची नाबाद खेळी साकारली ज्यात त्याने 10 चौकार आणि 16 षटकार मारले. एवढेच नाही तर त्याने उत्तर प्रदेशचा फिरकी गोलंदाज शिवा सिंहच्या एका षटकात 7 षटकार ठोकून 43 धावा वसूल केल्या. एक चेंडू नो बॉल असल्याने ऋतुराजने त्यावरही षटकार ठोकला आणि न भुतो न भविष्यती असा क्रिकेटच्या जगतातील विक्रम रचला. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 138.36 होता. शेवटच्या दोन षटकात त्याने 9 षटकार मारले. हे सर्व घडले महाराष्ट्राच्या डावाच्या 49व्या षटकात. ऋतुराजने शिवा सिंहच्या गोलंदाजावर घणाघाती प्रहार केला. या षटकात ऋतुराजने सलग 4 चेंडूत 4 षटकार ठोकले. पाचवा चेंडू नो बॉल असल्याचा निर्णय पंचांनी दिला. त्यानंतरच्या फ्री हिट आणि शेवटच्या चेंडूवरही ऋतुराजने षटकार खेचून वर्ल्ड रेकॉर्ड केला. या षटकात षटकारांच्या माध्यमातून 42 तर 1 अतिरिक्त ध

MB NEWS-महिलांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर रामदेव बाबांचा माफीनामा.....

इमेज
  महिलांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर रामदेव बाबांचा माफीनामा.....म्हणाले पुणे : योगगुरु बाबा रामदेव यांनी महिलांसंबंधी वक्तव्यावर माफी मागितली आहे.      राज्य महिला आयोगाने त्यांच्या विधानाची गंभीर दखल घेत रामदेव बाबांना दोन दिवसात खुलासा करण्याची नोटीस पाठवली होती. आपल्या शब्दांनी ठेच लागली असल्यास माफी मागतो, अशा भावना रामदेव बाबांनी व्यक्त केल्या आहेत. बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली. याबाबतीत दोन दिवसाच्या आत आपला खुलासा सादर करण्यासाठी नोटीस त्यांना पाठवण्यात आली होती. रामदेव बाबांनी ईमेलद्वारे खुलासा करत वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. काय आहे माफीनामा? महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 नुसार मी कुठलाही अपराध केलेला नाही. मी जागतिक स्तरावर महिला सबलीकरणासाठी काम करत आलो आहे. जेणेकरुन महिलांना समाजात समानतेचा दर्जा प्राप्त होण्यास मदत होईल. भारत सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या योजनांना प्रोत्साहन दिलंय. इतकंच नाही तर महिलांचं समाजातील स्थ

MB NEWS-विजापूर रोडवरील सोरेगाव येथील घटना...

इमेज
  लातूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने सोलापुरातील  हॉटेलमध्ये केली आत्महत्या विजापूर रोडवरील सोरेगाव येथील घटना... सोलापुरातील  हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. लातूरमधील एका अधिकाऱ्याच्या पत्नीने सोलापुरातील हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. स्नेहलता प्रभू जाधव असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. स्नेहलता या लातूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रभू जाधव यांच्या पत्नी होत्या. स्नेहलता यांनी हॉटेलच्या रुममध्ये साडीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. प्रभू जाधव हे यापूर्वी सोलापुरात जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी होते. स्नेहलता प्रभू जाधव यांच्या मुलाचे १८ डिसेंबर लग्न रोजी होते. लग्नाच्या खरेदीसाठी त्या, त्यांचे पती व नातेवाईक कर्नाटकातील चडचण येथे गेले होते. शनिवारी रात्री उशीर झाल्याने ते सोरेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. रविवारी सकाळी प्रभू जाधव हे कामानिमीत्त लातूरला गेले. दुपारी स्नेहलता यांनी आपल्या लातूर मधील नातेवाईकाला फोन करत जोरजोराने रडत आपण 'आत्महत्या करणार' असे सांगू लागल्या. यामुळे नातेवाईकांनी समजून सा

MB NEWS-आपघात: खून प्रकरणातील आरोपीने ओढली स्टेरिंग; पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचारी जखमी

इमेज
  आपघात: खून प्रकरणातील आरोपीने ओढली स्टेरिंग;  पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचारी जखमी              नेकनूर,                                      शनिवारी चुलत्याला ठार मारण्यात आल्याची घटना घडलेली आहे.मुळकवाडी खून प्रकरणातील आरोपीला स्थळ पाहणी करण्यासाठी घेवुन जाणाऱ्या पोलीस गाडीला मांजरसुंबा- पाटोदा रोडवर ससेवाडी जवळ अपघात झला. यामध्ये पोलीस अधिकारी शेख मुस्तफा, एक कर्मचारी जखमी असून बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपीने गाडीची स्टेरिंग ओढल्याने गाडी पलटी झाल्याची माहिती समोर येत आहे.           Click : MB NEWS च्या youtube channel  ला भेट द्या:-  https://youtube.com/@manswibhawawishwa-ravindra694         नेकनूर पोलीस स्टेशन येथून पोलीस गाडीमध्ये एपीआय शेख मुस्तफा, पो.का.खाडे, देशमुख आणि दोन पंच  मुळकवाडी खून प्रकरणातील आरोपी रोहिदास विठ्ठल निर्मळ याला स्थळ पाहणीसाठी घेऊन चालले होते.  मधल्या सीटवरील आरोपीने चालकाच्या हातातील स्टेरिंग ओढल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. यामध्ये एपीआय शेख मुस्तफा डोक्याला आणि खांद्याला मार लागला असून त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू

MB NEWS-प्रसिद्ध वकील ॲड. पंडीतराव देशपांडे (परळीकर) यांचे निधन

इमेज
प्रसिद्ध वकील ॲड.पंडीतराव  देशपांडे (परळीकर) यांचे निधन    बीड जिल्हा न्यायालयात वकीली व्यवसाय करणारे प्रसिद्ध वकील  जेस्ट विधीज्ञ अॅङ पंडीतराव शिवाजीराव देशपांडे साहेब ( परळीकर) यांचे वयाच्या 95 व्या वर्षी अल्प आजाराने रविवार दि.27 -11-2022 रोजी त्याच्या निवासस्थानी  दुख:द निधन झाले आहे....        त्यांचे पशच्यात दोन मुले  अॅङ.धनंजय ; अॅड प्रशांत देशपांडे परळीकर,तसेच दोन मुली; सुना; नाती आहेत.        चंपावती शिक्षण संस्था बीड , सामजिक चळवळीत ते सतत अग्रेसर असत; अनेक वर्षे त्यानी कम्युनिस्ट पार्टी मध्ये सक्रीय राहून काम केले.      Click : MB NEWS च्या youtube channel  ला भेट द्या:-  https://youtube.com/@manswibhawawishwa-ravindra694

MB NEWS-कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेले शेतकरी अंकुश गरड यांच्या कुटुंबाचे ॲड.माधव जाधव यांनी केले सांत्वन

इमेज
  कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेले शेतकरी अंकुश गरड यांच्या कुटुंबाचे ॲड.माधव जाधव यांनी केले सांत्वन परळी वै :  तालुक्यातील कौठळी येथील अंकुश गरड या तरुण शेतकऱ्यानी कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली असून त्या कुटुंबाची ज्येष्ठ विधीज्ञ तथा समाजसेवक ॲड. माधव जाधव यांनी भेट घेऊन गरड कुटुंबाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन याप्रसंगी माधव जाधव यांनी दिले. परळी तालुक्यात व बीड जिल्ह्यात सातत्याने शेतकरी आत्महत्याचं सत्र चालूच असून कौठळी येथे अंकुश गरड या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. मुळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत व काही अडचण असेल तर बोलून दाखवली पाहिजे ज्यातून मार्ग काढता येईल. Click : MB NEWS च्या youtube channel  ला भेट द्या:-  https://youtube.com/@manswibhawawishwa-ravindra694  शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत असे आव्हान याप्रसंगी ॲड माधव जाधव यांनी केले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवाकराम जाधव सर, तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, तालुका उपाध्यक्ष भागवत जाधव, मराठा सेवा संघाचे गंगाराम अण्णा जाधव,

MB NEWS-६५ वर्षिय शेतकऱ्याची आत्महत्या

इमेज
  ६५ वर्षिय शेतकऱ्याची आत्महत्या   केज:- केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील  रावसाहेब किसन चौरे वय (६५ वर्ष) या शेतकऱ्याने दि. २७ नोव्हेंबर रोजी  जी वाचीवाडी शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी नापिकी आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान व कर्ज फेडन्यासाठी होत असलेली ओढाताण या विवंचनेतून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याची चर्चा सुरू आहे.  दरम्यान आत्महत्येची माहिती मिळताच पोलिस नाईक उमेश आघाव आणि बाळराजे सोनवणे हे घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई करीत आहेत.