इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS-महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयात मा.फुले पुण्यतिथी साजरी

 महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयात मा.फुले पुण्यतिथी साजरी




परळी / प्रतिनिधी


महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र प्राथमिक विद्यालय, मोहा शाळेत सत्य शोधक समाजाचे संस्थापक, स्त्री शिक्षणासाठी, समानता व सत्यासाठी देह झिजवणारे, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे शोषित-वंचिताना आवाज देणारे, दिन दलितांचे कैवारी, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची  पुण्यतिथी साजरी करण्यात आली.


मा.ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमीत्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे मा.फुले यांच्या जीवन कार्याला उजाळा देत त्यांचे विचार व्यक्त केले. शिक्षकांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती देऊन त्यांचे कार्य व त्यांचा वारसा पुढे नेण्याची गरज असल्याचे सांगत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनीषा जाधव,सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट