MB NEWS-वेबसाईट चालत नसल्यामुळे गोंधळ ;निवडणूक फॉर्मला आँनलाईनचा फटका!

 वेबसाईट चालत नसल्यामुळे गोंधळ ;निवडणूक फॉर्मला आँनलाईनचा फटका!



परळी वैजनाथ, प्रतिनिधीदि.३०

सध्या राज्यभरात  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी  सुरू असून २८ नोव्हेंबर पासून राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र आँनलाईन भरणे सुरु केले आहे.परंतु वेबसाईट चालत नसल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे.



राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूकीचे नामनिर्देशन पञ सादर करण्याची ऑनलाइन प्रक्रियेला वेबसाईटचा खोडा बसल्याने निवडणूक फॉर्म व जात पडताळणी फॉर्म भरणे कठीण झाल्याने निवडणूक लढवू पाहणाऱ्यांचा जीव भांड्यात अडकला आहे.त्याचबरोबर जे उमेदवार हे राखीव संवर्गातून फॉर्म भरत आहेत त्यांची पडताळणी प्रस्ताव आँनलाईन करून त्याची पावती घ्यायची आहे मात्र ती वेबसाईट धीम्या गतीने चालत असल्यामुळे अनेक उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


Click:● *'गावचे कारभारी अन् चारचाकीची सवारी' | ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी|तहसीलला यात्रेचे रूप.* #mbnews#subscribe #comments#like #share


नामर्देशन पत्र दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना अनेकांची जात पडताळणी प्रस्ताव सुद्धा तयार नाहीत त्यामुळे त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. ज्या उमेदवारांकडे जात पडताळणीचा प्रस्ताव तयार आहेत त्यांना इंटरनेटच्या समस्येमुळे त्यांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येत नाही.याची संबधिताने नोंद घेऊन जात पडताळणी प्रस्ताव दाखल करण्यासाठी ऑफलाइनचा पर्याय द्यावा त्याचबरोबर निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा ऑफलाइनचा पर्याय द्यावा अशी मागणी ग्रामपंचायत लढवणाऱ्या उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार