MB NEWS-झाली.....अखेर तुकाराम मुंढे यांची बदली

 झाली.....अखेर तुकाराम मुंढे यांची बदली



बीड- अवघ्या दोन महिन्यांपूर्वी आरोग्य विभागाच्या आयुक्त पदाची सूत्र स्वीकारणारे आणि या दोन महिन्यात आरोग्य विभागाला शिस्त लावणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांची शासनाने उचलबांगडी केली आहे.त्यांची बदली केली असली तरी अद्याप त्यांना पदस्थापणा देण्यात आलेली नाही .

राज्याच्या आरोग्य विभागाची सूत्र दोन महिन्यांपूर्वी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे हे आपल्या अनेक निर्णयामुळे वादग्रस्त ठरले होते.कर्मचारी जीन्स टी शर्ट घालून कामावर येऊ शकत नाहीत,प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर रात्री सुद्धा मेडिकल ऑफिसर नियुक्त असावा यासह अनेक निर्णय त्यांनी घेतले होते.


Click: MB NEWS च्या youtube channel  ला भेट द्या:- https://youtube.com/@manswibhawawishwa-ravindra694



ज्या विरोधात राज्यातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन देखील केले होते.दरम्यान मुंडे यांच्या या निर्णयामुळे त्यांची बदली होणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.मुंढे यांच्याकडील पदभार काढण्यात आला असून त्यांची बदली केली आहे.मात्र त्यांना अद्याप नव्याने पडस्थापणा देण्यात आलेली नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !