प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-■किसान सभेच्या लढ्यास आणखी एक यश

 ■किसान सभेच्या लढ्यास आणखी एक यश



●जिल्हाभरातील सर्वच महसूल मंडळास मिळवून दिला हक्काचा विमा


परळी / प्रतिनिधी


रस्तावरील आंदोलने, शासन दरबारी पाठपुरावा, कायदेशीर लढाई ,सोशल मीडिया ऑनलाईन ट्रेंड या सर्वच पातळीवर बीड जिल्हा किसान सभेने केलेल्या लढाईस आणखी एक यश मिळाले असून जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात पीक विमा कंपनीस विमा देण्यास भाग पाडले असून काही ठिकाणी शेतकऱ्यांना हा विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे.दुसरीकडे सण 2020 च्या खरीप पीक विमा बाबत केलेले आंदोलने व अभ्यासपूर्ण अहवाल शासन दरबारी मंत्रालयात राज्य तक्रार निवारण समिती समोर मांडत सण 2020 ची किसान सभेने केलेली पीक विमा देण्याची मागणी राज्य तक्रार निवारण समिती ने योग्य असल्याचे मत व्यक्त करीत पीक विमा कंपनीस खरीप 2020 चा पीक विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात यावा असे आदेश पीक विमा कंपनीस दिले आहेत.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नी खंबीरपणे पाठीशी असलेल्या किसान सभेच्या विविध मागण्या आता मंजूर करण्यात येत असून किसान सभेने केलेल्या विविध लढ्याचे हे यश आहे.


बीड जिल्हातील शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो.या वर्षी देखील मान्सुम काळामध्ये सुरुवातीलाच सलगच्या पावसाने अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली व त्यानंतर मात्र महिनाभर पावसाचा खंड पडला.ऑक्टोबर मध्ये झालेला परतीच्या पावसाचा कहर सर्वत्र पाहवयास मिळाला. बीड जिल्ह्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी भरडला गेला. केलेल्या सगळ्या कष्टाची तर माती झालीच परंतु सावकाराकडून व्याजाने घेतलेल्या कर्जातून शेतीसाठी केलेला खर्च देखील पिकांमधून वापस मिळाला नाही. म्हणून शेतकरी हातबल होऊन ऑक्टोबर अखेर जिल्हयात 230 पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करण्याच्या घटना जिल्हाभरातून समोर आल्या.


Click:● *'गावचे कारभारी अन् चारचाकीची सवारी' | ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी|तहसीलला यात्रेचे रूप.* #mbnews#subscribe #comments#like #share


पिकाचे संरक्षण म्हणून काढलेल्या पिक विम्याचा परतावा मात्र कंपनीने जिल्ह्यातील फक्त 47 महसूल मंडळातील शेतकऱ्यांनाच मंजूर केला. पीक विमा कंपनी कडून शेतकऱ्यांवरील होणाऱ्या अन्याया व संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी करण्यात येणाऱ्या क्रूर चेष्ठेविरोधात अखिल भारतीय किसान सभेने संपूर्ण बीड जिल्हाभर गावोगावी बैठका घेऊन शेतकऱ्यांमध्ये या बाबत जाणीव निर्माण करून दिली.सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन ट्रेन आंदोलन, जिल्हा कचेरीवर हजारो शेतकऱ्यांचा रुमनं मोर्चा,भर दिवाळीमध्ये जिल्हाभरात करण्यात आलेले जलसमाधी आंदोलन, दिवाळं आंदोलन, शिमगा आंदोलन अशी अनेक आंदोलन करून लोक प्रतिनिधी, प्रशासन, शासन या सर्वांचे या प्रश्नी लक्ष्य वेधून घेतले.किसान सभेच्या या सर्व संघर्षास त्याचबरोबर शेतकरी व शेतकरी पुत्रांच्या एकजुटीची धास्ती घेऊन आता जिल्ह्यातील सर्व मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे टाकण्यास कंपनीने सुरुवात केली आहे. लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीने काय घडू शकते याचे उत्तम उदाहरण किसान सभेच्या या संघर्षाने दाखवून दिले आहे. या सगळ्या संघर्षामध्ये किसान सभेची जिल्हा कमिटी ज्या मध्ये दत्ता डाके, जिल्हाकार्याध्यक्ष काशीराम शिरसाठ, जिल्हा सचिव मुरलीधर नागरगोजे, पांडुरंग राठोड, जगदीश फरताडे,सुभाष डाके,कृष्णा सोळंके, राजेभाऊ अण्णा बादाडे, डॉ.सावळाराम उबाळे, संजय चोले,दादा शिरसाठ, मोहन लांब,गंगाधर पोटभरे, बालाजी कडबाने, ब्रह्मानंद देशमुख,रवी देवरवाडे,रुस्तम माने,भगवान बडे, बळीराम देशमुख, विष्णुपंत देशमुख आदीनी अहोरात्र मेहनत घेतली आहे.

●●●●●●●●●●●

किसान सभेच्या या सगळ्या संघर्षाला काही प्रमाणात यश आले आहे. परंतु मिळालेली रक्कम ही तुटपुंजी असून संपूर्ण विम्याची रक्कम व जिल्हाभरातील सर्व शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळेपर्यंत किसान सभा निकराची झुंज देणार तसेच खरीप 2020 चा शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळून दिल्या शिवाय किसान सभा स्वस्थ बसणार नाही

-एड.अजय बुरांडे

जिल्हाध्यक्ष

किसान सभा बीड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या