पोस्ट्स

MB NEWS:बारावीत मुलीच हुशार !

इमेज
  बारावीत मुलीच हुशार ! बीड- बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे. राज्याचा निकाल 91 टक्के लागला आहे, सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in fchal maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. यंदा राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला असून 12 लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 96.01 तर सर्वात कमी निकाल मुंबई 88. 13 टक्के लागला आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालाची टक्केवारी 2.97 टक्क्यांनी घसरली. गेल्यावर्षी 94.22 टक्के निकाल लागला होता.14 लाख 16 हजार 371 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याच्या निकालाची टक्केवारी 91.25 एवढी आहे. कोकण विभाग अग्रे

MB NEWS:आज समर्थ प्रतिष्ठानचा सामुदायिक उपनयन सोहळा

इमेज
  बहुसोमयाजी यज्ञेश्वर सेलूकर महाराज, वे.शा.स. ज्योतिषाचार्य अनंत शास्त्री जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज समर्थ प्रतिष्ठानचा सामुदायिक उपनयन सोहळा परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.२३ - समर्थ प्रतिष्ठान द्वारा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे प्रतीवर्षा प्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज,वे.शा.स.ज्योतिषाचार्य अनंत शास्त्री जोशी यांच्या उपस्थितीत यंदाचा सोहळा होणार आहे.यंदाच्या सोहळ्यासाठी २४ बटूंची नोंदणी प्रतिष्ठान कडे करण्यात आली आहे.साधुसंतांची आशिर्वादपर उपस्थिती व शिस्तबद्ध नियोजनामुळे हा उपनयन संस्कार सोहळा राज्यभरात प्रसिद्ध आहे.            हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे ज्या सोळा संस्कारांचा उल्लेख आहे त्यातील एक महत्त्वाचा म्हणजे उपनयन संस्कार,प्रतिवर्ष नित्यनेमाने सामुदायिकरीत्या हा सोहळा समर्थ प्रतिष्ठान आयोजीत करत असते.आज २५ मे २०२३, मित्ती जेष्ठ शु ०६ शके १९४५ गुरूवार रोजी सकाळी १० वाजून ४५ मिनीटांच्या पावन मुहूर्तावर उपनयन संस्कार वैद्यनाथ दर्शन मंडप,परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज,माजलगाव ये

MB NEWS: डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांची आरोग्य विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड

इमेज
 डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांची आरोग्य विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड अंबाजोगाई (प्रतिनिधी)-- स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांची महाराष्ट्र शासनाच्या नाशिक येथील आरोग्य विद्यापीठाने वैद्यकशास्त्र या विषयातील अभ्यास मंडळावर निवड केली आहे.     डॉ. सिध्देश्वर बिराजदार हे येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात गेली अनेक वर्षे मेडिसीन विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मेडिसीन विषयातील अध्यापनासोबतच -हदय विकार व मेडिसीन विभागाशी संबंधित असलेल्या आजारांवर प्रभावी उपचार करणारे एक निष्णात डॉक्टर म्हणून डॉ सिध्देश्वर बिराजदार यांची ओळख आहे. मेडिसीन विभागातील त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नाशिक येथील आरोग्य विद्यापीठाने त्यांची अभ्यास मंडळावर निवड केली आहे.       सदरील नियुक्तीबद्दल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, आ. नमिता मुंदडा, विधानसभेचे माजी सदस्य संजय दौंड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, माजी मंत्री ऍड. पंडीतर

MB NEWS:परळीसह मराठवाड्यातील विविध ठिकाणांहून समाजबांधव व विविध क्षेत्रातील सर्वस्तरीय मान्यवरांची उपस्थिती

इमेज
 ■ ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै. आयोजित शानदार सोहळ्यात ४१  बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार ! परळीसह मराठवाड्यातील विविध ठिकाणांहून समाजबांधव व विविध क्षेत्रातील सर्वस्तरीय मान्यवरांची उपस्थिती परळी वै.(प्रतिनिधी)-      ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ आयोजित शानदार सोहळ्यात ४१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले. परळीसह मराठवाड्यातील विविध ठिकाणांहून समाजबांधव व विविध क्षेत्रातील सर्वस्तरीय मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली.           ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने आयोजित ४३वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आज २४ मे रोजी शानदार व वैभवी स्वरूपात संपन्न झाला. शानदार सोहळ्यात ४१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले. संत -महंत, मान्यवर व समाज बांधवांची सोहळ्यासाठी मोठी उपस्थिती  लाभली. गेल्या ४३ वर्षा पासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो.शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. यावर्षीच

MB NEWS:बारावीचा निकाल उद्या; दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर होणार

इमेज
  बारावीचा निकाल उद्या; दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर होणार HSC Result 2023 :    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून  लवकरच अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.  गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती. अखेर प्रतीक्षा संपली आहे.  उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी मह

MB NEWS:वे.शा.स.ज्योतिषाचार्य अनंत शास्त्री जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार सोहळा

इमेज
  २५ मे रोजी समर्थ प्रतिष्ठानचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा वे.शा.स.ज्योतिषाचार्य अनंत शास्त्री जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार सोहळा परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.२३ - समर्थ प्रतिष्ठान द्वारा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे प्रतीवर्षा प्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत होत असल्याने या सोहळ्याला अनन्य साधारण महत्व आहेच.वे.शा.स.ज्योतिषाचार्य अनंत शास्त्री जोशी यांच्या उपस्थितीत यंदाचा सोहळा होणार आहे.यंदाच्या सोहळ्यासाठी २४ बटूंची नोंदणी प्रतिष्ठान कडे करण्यात आली आहे.साधुसंतांची आशिर्वादपर उपस्थिती व शिस्तबद्ध नियोजनामुळे हा उपनयन संस्कार सोहळा राज्यभरात प्रसिद्ध आहे.            हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे ज्या सोळा संस्कारांचा उल्लेख आहे त्यातील एक महत्त्वाचा म्हणजे उपनयन संस्कार,प्रतिवर्ष नित्यनेमाने सामुदायिकरीत्या हा सोहळा समर्थ प्रतिष्ठान आयोजीत करत असते.यंदा २५ मे २०२३, मित्ती जेष्ठ शु ०६ शके १९४५ गुरूवार रोजी सकाळी १० वाजून ४५ मिनीटांच्या पावन मुहूर्तावर उपनयन संस्कार वैद्यनाथ दर्शन मंडप,परळी वैजनाथ

MB NEWS:पहिल्याच दिवशी तपासणी शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
  खा.प्रितमताई मुंडे यांना दिव्यांगांचे उदंड आशीर्वाद ! पहिल्याच दिवशी तपासणी शिबिराला मिळाला उत्स्फूर्त  प्रतिसाद निराधारांचे कष्ट कमी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध : खा. प्रितमताई मुंडे बीड । दि. २३ । सामाजिक न्याय विभाग व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग पूर्व तपासणी शिबिराचे उदघाटन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.बीड शहर आणि तालुक्यातील असंख्य दिव्यांग बांधवांनी शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून खा.प्रितमताई मुंडे यांना उदंड आशीर्वाद दिले. जिल्हा रुग्णालयात पार पडलेल्या दिव्यांग पूर्व तपासणी शिबिराच्या उदघाटनाला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे, समाज कल्याण अधिकारी रवींद्र शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, रा.स्व. संघाचे पुरुषोत्तम कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना खा. प्रितमताई मुंडे म्हणाल्या की “वंचित दुर्लक्ष घटकांच्या सेवेचा वसा आणि वारसा घेऊन आम्ही वंचितांच्या उत्थानासा

MB NEWS:माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींची प्रकृती बिघडली; उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे भेटीसाठी हिंदुजा रुग्णालयात

इमेज
माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींची प्रकृती बिघडली; उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे भेटीसाठी हिंदुजा रुग्णालयात मुंबई: शिवसेना पक्षाचा सुवर्णकाळ पाहिलेले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. मनोहर जोशी यांना सोमवारी सायंकाळी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मंगळवारी सकाळी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे माहीम येथील हिंदुजा रुग्णालयात पोहोचले आहेत. शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक म्हणून मनोहर जोशी यांची ओळख आहे. मनोहर जोशी यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपदही भुषविले होते. गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. काल संध्याकाळी मनोहर जोशी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. मनोहर जोशी यांना मेंदूशी संबंधित व्याधी आहे. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर न्यूरोलॉजिस्ट डॉ. चारुलता संकला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. मनोहर जोशी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. हिंदुजा रुग्णा

MB NEWS:UPSC चा निकाल जाहीर, मुलींनी पुन्हा मारली बाजी; इशिता किशोर देशात पहिली

इमेज
  UPSC चा निकाल जाहीर, मुलींनी पुन्हा मारली बाजी; इशिता किशोर देशात पहिली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा 2022 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर हा निकाल जाहीर करण्यात आला असून पहिल्या चारही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. इशिता किशोर हिने पहिला नंबर मिळवला असून त्या खालोखाल गरिमा लोहिया, उमा हर्थी एन आणि स्मृती मिश्रा यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांक मिळवला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातूनही मुलींच्याच नावाचा डंका असून ठाण्यातील कश्मिरा संख्ये हिने देशात 25वा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे याआधी तिने दोन वेळा प्रयत्न केला होता. परंतु तिला यश मिळाले नव्हते. मात्र तिसऱ्या प्रयत्नात तिने थेट 25वा क्रमांक मिळवला. यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पहिल्या 10 क्रमांकावरील विद्यार्थी 1. इशिता किशोर 2. गरिमा लोहिया 3. उमा हरति एन 4. स्मृति मिश्रा 5. मयूर हजारिका 6. गहना नव्या जेम्स 7. वसीम अहमद 8. अनिरुद्ध यादव 9. कनिका गोयल 10. राहुल श्रीवास्तव

MB NEWS:स्मशानभूमीत काम करणाऱ्या युवकाचा मार्कडेय तिर्थात आढळला मृतदेह

इमेज
  स्मशानभूमीत काम करणाऱ्या युवकाचा मार्कडेय तिर्थात आढळला मृतदेह परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      परळीच्या सार्वजनिक स्मशानभूमीत काम करणाऱ्या पवार कुटुंबातील एका युवकाचा मृतदेह स्मशानभूमी शेजारीलच मार्कंडेय  तीर्थात आढळून आला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केले जात आहे.    याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार  दिनांक 22/05/2023 रोजी ५.१५ वा.सुमारास मयत नामे सोमनाथ गुलाबराव पवार वय 27 वर्षे रा. रामनगर परळी वै याचा मृतदेह मार्कंडेय तीर्थात आढळून आला.मयताचा भाऊ प्रभुनाथ गुलाबराव पवार याने पोलीसात खबर दिली. यातील मयत नामे सोमनाथ गुलाबराव पवार वय 27 वर्षे रा. रामनगर परळी वै  नेहमाप्रमाणे सकाळी उठवण्यासाठी न आल्याने त्याने इकडे तिकडे आजुबाजुला व ईतर नातेवाईकांकडे चौकशी केली तो मीळुन आला नाही. नंतर मार्कडेय तिर्थ परळी वै रात्री खुर्चीवर बसलेल्या ठिकाणी व आजुबाजुला पाहीले असता सोमनाथ पवार हा दिसुन आला नाही. तेव्हा भावाने मार्कडेय तिर्थामध्ये जावुन पाहीले असता तेथे मयताची चप्पल दिसुन आल्याने खबर देणार याने मार्कडेय तिर्थमध्ये शोध घेतला असता तेथे मयत हा तिर्थामध्ये तरंगताना उलट अवस्थ

MB NEWS:औष्णिक विद्युत केंद्रात महाराणा प्रताप सिंह यांची ४८३ वी जयंती उत्साहात साजरी

इमेज
  महाराणा प्रतापसिंह यांच्या ज लढवय्या जीवनाचा आजही आदर्श - मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे    औष्णिक विद्युत केंद्रात महाराणा प्रताप सिंह यांची ४८३ वी जयंती  उत्साहात साजरी परळी / प्रतिनिधि  परळी औष्णिक विद्युत केंद्रात प्रशासकीय सभागृहात दि २२ में रोजी महाराणा प्रताप सिंह यांची ४८३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे हे होते कार्यक्रमाच्या सुरवतीस महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस वंदन केले- यावेळी अद्यक्षीय समारोप करताना मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे म्हणाले की प्रतापसिंह हे सिसोदिया घराण्यातील मेवाड़चा राजपूत राजा होता- आपल्या भारतावर ज्यानी जवळपास ३०० वर्ष राज केले त्या मुघल साम्राज्याच्या विरोधात शेवटपर्यंत संघर्षमय लढत राहिले- त्यांच्या या लढवय्य जीवनाचा आजही आदर्श घेऊन स्मरण करतात- या कार्यक्रमास सुरक्षा अधिकारी राजेंद्र पवार, वरिष्ठ व्यवस्थापक अरविन्द येरने, सचिन पवार, कार्यकारी अभियंता इस व्ही माने, राजू गजले, धनश्री कोराटे, कल्पना फुके, परमेश्वर सरवदे, बालाजी कांदे, पत्रकार भगवान साकसमुद्रे, बालकिशन सोनी, आदींची उपस्थि

MB NEWS:नंदनंज येथे विद्रोही कवी संमेलनाचे आयोजन

इमेज
  नंदनंज येथे विद्रोही कवी संमेलनाचे आयोजन  रानबा गायकवाड, प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे, बा.सो. कांबळे, सिध्देश्वर इंगोले यांची उपस्थिती परळी प्रतिनिधी.   आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते स्मृतीशेष कोंडिबा केरबा वाव्हळे यांच्या ५ व्या स्मृतीदिनानिमित्त उद्या दिनांक २३ मे रोजी नंदनंज येथे   निमंत्रित आंबेडकरी विद्रोही कवींचे कवीसंमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कोंडिबा वाव्हळे यांचे सुपुत्र आदर्श शिक्षक, गंगाधर वाव्हळे यांनी दिली.      २३ मे रोजी सकाळी १०:०० वाजता भंन्ते पय्यातीस यांच्या हस्ते पुण्यानुमोदन विधी व धम्मदेसना आयोजित करण्यात आली आहे.त्यानंतर जेष्ठ साहित्यीक-संपादक  भीमयुगकार रानबा गायकवाड यांचे  व्याख्यान आणि  भव्य आंबडेकरी विद्रोही कवी संमेलन पार पडणार आहे.या कवी संमेलनात प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, कवी प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे, विद्रोही कवी-निवेदक बा.सो.कांबळे आणि कवी, गझलकार सिध्देश्वर इंगोले सहभागी होणार आहेत.या कवी संमेलनाचे सुत्रसंचलन रानबा गायकवाड हे करणार आहेत.       ‌‌ या कवी संमेलनास  आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गंगाधर कोंडिब

MB NEWS:संस्कार व व्यायामातून राष्ट्रनिर्मानाचे ३४ वे वर्ष

इमेज
  संस्कार व व्यायामातून राष्ट्रनिर्मानाचे ३४ वे वर्ष श्री हनुमान व्यायाम शाळा व वैद्यनाथ बँकेचा उपक्रम परळी l प्रतिनिधी श्री हनुमान व्यायाम शाळा व वैद्यनाथ बँक यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या एक महिन्यापासून परळी शहरात सुरू असलेल्या व्यायाम शिबीर व संस्कार वर्गाचा आज उत्साहात समारोप झाला. यावेळी व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती होती.      ज्या वयात संस्कार व्हायला हवेत अशाच संस्कारक्षम वयात सकाळी ५ ते ८ व सायंकाळी ५ ते ८ या वेळेत एक महिना या विद्यार्थ्यांना सर्वांगसुंदर व्यायाम, प्राणायाम, लेझीम, लाठी- काठी, तलवारबाजी, मल्लखांब, जलतरण, बॉक्सिंग, कराटे व बौद्धिक शिकवले गेले हे शिबीर शिवालय भवन, वैद्यनाथ मंदिर समोर तर पोहणे चांदापूर येतील तलावात शिकवण्यात आले.  एकूण ४० प्रशिक्षक व सहप्रशिक्षक या शिबिरात ३५० प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देत होते. दरम्यान, आज रविवार २१मे रोजी सांगता झाली. महिनाभरात विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या सर्व गोष्टींची प्रात्यक्षिते या सांगता समारोपात सादर करण्यात आली  यावेळी पालकांची व नागरिकांची मोठी उपस्थिती होती. -------------

MB NEWS:23 मे 2 जून दरम्यान जिल्ह्यात तालुकानिहाय मोफत दिव्यांग पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन

इमेज
  23 मे 2 जून दरम्यान जिल्ह्यात तालुकानिहाय मोफत दिव्यांग पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन बीड (जि.मा.का.) बीड जिल्ह्याच्या खासदार प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 23 मे ते 2 जुन, 2023 या कालावधीत मोफत दिव्यांगपूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तपासणीनंतर दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार व गरजेनुसार सुमारे पाच हजार दिव्यांगाना कृत्रिम अवयव व साधनांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 23 मे रोजी बीड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले असून 24 मे रोजी केज, 25 मे रोजी माजलगाव, 26 मे रोजी गेवराई, 27 मे रोजी वडवणी, 28 मे रोजी धारूर, 29 मे रोजी अंबाजोगाई, 30 मे रोजी आष्टी, 31 मे रोजी शिरूर कासार, 1 जुन रोजी पाटोदा येथे तर 2 जुन रोजी परळी वैजनाथ येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व ठिकाणी शिबिराची वेळ सकाळी 10.00 ते सायं 6-00 वाजेपर्यंत राहणार आहे.  दिव्यांगानी शिबिरास येतेवेळी आधार कार्डची छायांकित प्रत, दिव्यांग प्रमाणपत्र (40 टक्क्यांपेक्षा अधिक हवे), बी.पी.एल. रे

MB NEWS:भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीचे 23 मे रोजी आयोजन

इमेज
  भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीचे 23 मे रोजी आयोजन बीड (जि.मा.का.) जिल्हयातील शासकीय कर्मचा-यांविरूध्द प्राप्त होणा-या तक्रारींबाबत पाठपुरावा करण्यासाठी जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती स्थापन करण्यात आलेली असून या समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 23 मे, 2023 रोजी दुपारी 12-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आयोजित करण्यात आलेली आहे. शासकीय अधिकारी, कर्मचा-यांविरूध्द भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असल्यास नागरिकांनी जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीसमोर व्यक्तीशः उपस्थित राहून पुराव्यासह लेखी स्वरूपात मांडाव्यात. सदर तक्रारीसोबत पुरावे जोडले गेले नसल्यास अशा तक्रारी समितीमध्ये घेतल्या जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे  समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. *****

MB NEWS:मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

इमेज
  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम इच्छुकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन बीड (जि.मा.का.) बेरोजगारांना उत्पादन उद्योग व सेवा उद्योगासाठी राज्यात गत चार वर्षांपासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी  maha-cmegp.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. या योजने अंतर्गत सेवा उद्योगासाठी 20 लक्ष रुपये मर्यादेपर्यंत व उत्पादन उद्योगांसाठी  50 लक्ष रुपयांपर्यंतपर्यंत बँकेमार्फत अर्थसहाय्य दिले जाते. या योजने अंतर्गत उद्योग विभागामार्फत बँकेच्या कर्ज मंजुरीनंतर जास्तीत जास्त 35 टक्यापर्यंत (जात प्रवर्ग/उद्योग कार्यक्षेत्रानुसार) अनुदान देय आहे. तसेच  10 लक्ष रुपयांच्या कर्ज मर्यादेपर्यंत (सेवा/ उत्पादन उद्योग) शिक्षणाची अट नाही. दर सोमवारी छानणी नंत्तर ऑनलाईन कर्ज प्रस्ताव बँकाना मंजुरीस्तव शिफारस करण्यात येतात व कर्ज मंजुरी वाटपानंतर अनुदान ऑनलाईन बँकेत जमा करण्यात येते. इच्छुक अर्जदारांनी maha-cmegp.gov.in या सं

MB NEWS:उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

इमेज
  विवाह निमित्ताने प्रवास करणाऱ्या वाहन धारकांनी सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन बीड (जि.मा.का.) दरवर्षी विवाह मुहूर्त असलेल्या महिन्यात अपघातात वाढ झालेली आढळते. यातील अनेक अपघात हे विवाह कार्यक्रमासाठी प्रवास करणाऱ्या वाहनांचे असतात. विवाह निमित्ताने प्रवास करणाऱ्या वाहन धारकांनी सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड यांनी केले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत "शुभमंगल सावधान" हे पत्रक प्रकाशित करण्यात आले असून शुभविवाह प्रसंगी प्रवासादरम्यान वर-वधू पक्षांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन  पत्रकातून करण्यात आले आहे.  विवाह मुहूर्त असलेल्या महिन्यात विवाहखरेदी, पत्रिका वाटप ई. निमित्ताने आणि मुहूर्तादिवशी विवाहसाठी रस्त्यावर दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांची रस्त्यावर वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढलेली असते. त्यामुळे लक्षपूर्वक वाहने चालवा. विवाह तिथी दिवशी वर्दळ वाढल्यामुळे प्रवासास उशीर होतो. उशिरामुळे वाहनाचा वेग वाढवावा लागतो. परिणामी अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे लवकर निघा

MB NEWS:शासन आपल्या दारीला मिळणार महालाभार्थी पोर्टलची जोड

इमेज
  शासन पहिल्यांदाच पाहिलं.....लाभार्थींची बोलकी प्रतिक्रिया शासन आपल्या दारीला मिळणार महालाभार्थी पोर्टलची जोड अभियानाची व्याप्ती वाढवा, सर्वाना सहजपणे लाभ मिळावेत– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई (जि.मा.का.) शासन आपल्या दारी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महालाभार्थी पोर्टलचा उपयोग करून घेण्यात येणार असून यामुळे या योजनेची व्याप्ती वाढणार आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे एक सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जास्तीत जास्त नागरिकांना सहज सुलभ लाभ मिळावेत म्हणून या पोर्टलचा देखील उपयोग व्हा अशी सुचना केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महत्वाच्या सूचना केल्या. बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी या अभियानाची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव डॉ. अमोल शिंदे यांनी सादरीकरण केले व ही योजना कशारीतीने राबविण्यात येत आहे त्याची माहिती दिली. तर एमकेसीएलतर्फे विवेक सावंत

MB NEWS:महाराणा प्रताप यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

इमेज
  महाराणा प्रताप यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन बीड  (जि.मा.का.)  महान योद्धे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार श्री. अडसुळ यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील श्रीमती बोराडे, गिरीश कुलकर्णी, अनिल वाघमारे, राम घडसे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. *****

MB NEWS:विद्यार्थी बनणार यूजीसीचे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर

इमेज
  विद्यार्थी बनणार यूजीसीचे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील (एनईपी) उच्च शिक्षणातील तरतुदींचा प्रसार करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) देशातील 300 विद्यार्थ्यांची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड करणार आहे. या विद्यार्थ्यांना ‘एनईपी-सारथी’ असे म्हटले जाणार आहे. यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीशकुमार यांनी सांगितले, यूजीसी एनईपीच्या तरतुदी लागू करण्यात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर देत आहे. यूजीसीने देशातील सर्व विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्था, प्राचार्य आणि संचालकांना प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची नावे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘एनईपी-सारथी’ म्हणून नेमणूक झालेले विद्यार्थी समाजात उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध बदलांच्या माहितीचा प्रसार आणि प्रचार अन्य विद्यार्थी आणि पालकांमध्ये करतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे फायदे लोकांना ते पटवून देतील. उच्च शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्याची नियुक्ती ‘एनईपी-सारथी’ म्हणून करण्यात येईल. त्यासाठी या विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व असामान्य असावे. शिक्षण संस्था, विद्यापीठे जूनअखेरपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रस्ताव पाठवू शकती

MB NEWS:लावण्याई पब्लिक स्कूलच्या प्रवेश कॅम्पचे डॉ. गुरुप्रसाद देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन

इमेज
लावण्याई पब्लिक स्कूलच्या प्रवेश कॅम्पचे डॉ. गुरुप्रसाद देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन ...................................... परळी   22  ( प्रतिनिधी) आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगती बरोबर त्याच्या चौफेर व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी पालक चांगल्या शाळेच्या शोधामध्ये असतात. मध्यमवर्गीय पालकांना माफक शुल्कामध्ये अतिशय दर्जेदार व विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविणारी शाळा म्हणून परळी शहरांमध्ये लावण्याई शाळेचा नावलौकिक वाढत आहे. वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा मधील गुणवत्ता व अभिनव उपक्रम यांच्या बळावर अल्पावधीतच परळीकरांच्या व पालकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या लावण्याई पब्लिक स्कूलच्या शैक्षणिक वर्ष 2023 2024 या वर्षाच्या प्रवेश कॅम्पचे उद्घाटन परळी शहरातील प्रख्यात बालरोग तज्ञ डॉ गुरूप्रसाद देशपांडे यांच्या हस्ते नवजीवन हॉस्पिटल मध्ये संपन्न झाले. यावेळी शाळेचे अध्यक्ष पत्रकार अनंत कुलकर्णी,अॅड.दत्तात्रय आंधळे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ गुरुप्रसाद देशपांडे म्हणाले की लावण्याई  पब्लिक स्कुल  ही परिसरातील मध्यमवर्गीय पालकांच्या अपेक्षा व विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती पूर्

MB NEWS:परळीच्या पेठगल्लीत हिंदूसुर्य महाराणा प्रताप जयंती उत्साहात

इमेज
  परळीच्या पेठगल्लीत हिंदूसुर्य महाराणा प्रताप जयंती उत्साहात  परळी,हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह महाराज यांची जयंती  येथील पेठगल्ली मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,यावेळी   माजी नगरसेवक प्रकाशसिंह भैय्या ठाकूर,, ज्येष्ठ नेते विठ्ठलराव दंदे, लोकमत दैनिकाचे तालुका प्रतनिधी संजय खाकरे, भाजपाचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा प्रा घनश्याम अवस्थी, भारतसिंह ठाकूर ,राजा  ठाकूर, तानाजी देशमुख वैजनाथ बागवाले, विजयसिंह चौहाण ,श्रीनिवास सावजी राजेश्वर तिळकरी ,अभिजीत देशमुख, पापा सिंह ठाकुर रोहित मोदी आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषण झाली,आज सायंकाळी ठीक पाच वाजता महाराणा प्रतापसिंह महाराज यांच्या प्रतिमेची संवाद्य मिरवणूक परळी वैजनाथ नगरीतील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार आहे या मिरवणुकीस उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शुभम परदेशी ,,उपाध्यक्ष रजत परदेशी करण ठाकूर,, मार्गदर्शक विक्रम सिंह रणधीर ठाकूर ,महिपाल ठाकुर ,अनिकेत तिळकरी नागेश ठाकूर ,अभिमन्यू गुट्टे अक्षय ठाकूर, ठाकुर करण रघुवंशी यांन

MB NEWS:तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला ताकदवान बनवण्याचं स्व.राजीवजींनी केले-बहादुरभाई

इमेज
  माजी प्रधानमंञी स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने परळी शहर काँग्रेस  कार्यालयात अभिवादन  तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला ताकदवान बनवण्याचं स्व.राजीवजींनी केले-बहादुरभाई   परळी प्रतिनिधी  माजी प्रधानमंञी स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने परळी शहर काँग्रेस  कार्यालयात स्व.राजीव गांधींच्या प्रतिमेच पुजन करुन अभिवादन कार्यक्रम रविवार दि.21 मे रोजी शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी स्व.राजीव गांधी यांच्या विचारांना उजाळा देत सांगितले कि,स्व.राजीव गांधी हे दुरदृष्टी असलेले प्रधानमंञी होते.तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला ताकदवान बनवण्याचं त्यांनी कायम स्वप्न बाळगलं आणि ते पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक निर्णयही त्यांनी घेतले.आज भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी काही पावलं उचलत आहे. त्याचा पाया राजीव गांधी यांनी रचला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. राजीव गांधींना भारतात कंप्यूटर क्रांती आणण्याचं श्रेय दिलं जातं. त्यांचं म्हणणं होतं की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय उद्योगांचा विकास शक्य नाही. भारतातील लोकांपर्यंत त्

MB NEWS:शिवसेना आणखी मजबुतपणे उभी करा

इमेज
  शिवसेना आणखी मजबुतपणे उभी करा खा.संजय राऊत यांचा अभयकुमार ठक्कर यांच्याशी संवाद परळी/प्रतिनिधी शिवसेनेच्या अगदी स्थापनेपासून सोबत असलेले अभयकुमार ठक्कर हे आजही शिवसेनेत कायम असून परळी शहर व तालुक्यात शिवसेना वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे अशी ओळख माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी खा.संजय राऊत यांच्यासोबत करून दिल्यानंतर काही वेळ राऊत आणि ठक्कर यांच्यात संवाद झाला. शिवसेना आणखी मजबुत करा, तुम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहात, आपल्याला शिवसेना पुन्हा एकदा मोठया जोमाने उभी करायची आहे अशी सूचना खा.संजय राऊत यांनी दिली.  बीड येथील महाप्रबोधन यात्रेसाठी खा.संजय राऊत हे रवाना होत असतांना त्यांच्या समवेत परळी येथे अनेकांनी संवाद साधला. यावेळी बोलतांना वैद्यनाथ मंदिरात अभयकुमार ठक्कर यांची ओळख खा.संजय राऊत यांच्यासोबत माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी करून दिली. अभयकुमार ठक्कर हे शिवसेनेच्या स्थापनेपासून सोबत असल्याचे सांगत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माँ साहेब मीनाताई ठाकरे या ठक्कर यांच्या निवासस्थानी उतरल्याची आठवण आ.धनंजय मुंडे यांनी करून दिली. त्याचा संदर्भ घेत संजय राऊत

MB NEWS:श्री शनि भक्ताचा असाही अनोखा संकल्प!

इमेज
  श्री शनि भक्ताचा असाही अनोखा संकल्प! व्यसनातून मुक्त होण्यासाठी इतरांना दाखवला मार्ग! व्यसनातून मुक्त होण्यासाठी बरेच जण प्रामाणिक प्रयत्न करत असतात; मात्र मनावर ताबा राहत नसल्याने पुनः पुन्हा व्यसनाच्या आहारी जाण्याची वेळ येते, अशावेळी भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन वर्षभरासाठी लागणारा व्यसनाचा खर्च मंदिराच्या जीर्णोद्धाराला देऊन मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न भक्ताने केला आहे आणि हा आदर्श मार्ग इतरांसमोर ठेवला आहे.  श्री शनि देव हे इतर देवतांपेक्षा कडक स्वभावाचे मानले जातात आणि अशा भगवंताच्या चरणी लिन होऊन व्यसनातून मुक्त होण्यासाठीचा मार्ग या भक्ताने निवडला असून व्यसनासाठी दररोजचा होणारा खर्च लक्षात घेऊन वर्षभराची रक्कम रुपये 58,400 या भक्ताने श्री चरणी अर्पण केले आहेत. खरोखरच आपल्या व्यसनातून ज्यांना मुक्त होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आदर्शवत असा मार्ग या भक्ताने नाव न सांगण्याच्या अटीवर दाखवला आहे... तंबाखू, पुडी खाणे, दारू, पत्ते खेळणे अशा व इतर  प्रकारच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी हा मार्ग आहे असे या भक्ताने बोलून दाखवले.