MB NEWS:बारावीत मुलीच हुशार !

 बारावीत मुलीच हुशार !


बीड- बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे. राज्याचा निकाल 91 टक्के लागला आहे, सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.

शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in fchal maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

यंदा राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला असून 12 लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 96.01 तर सर्वात कमी निकाल मुंबई 88. 13 टक्के लागला आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालाची टक्केवारी 2.97 टक्क्यांनी घसरली. गेल्यावर्षी 94.22 टक्के निकाल लागला होता.14 लाख 16 हजार 371 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याच्या निकालाची टक्केवारी 91.25 एवढी आहे. कोकण विभाग अग्रेसर असून सर्वाधिक निकाल 96.01 टक्के, तर सर्वात कमी निकाल मुंबई 88.13 टक्के एवढा आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 93.73 टक्के असून मुलांचा निकाल 89.14 टक्के एवढा आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 4.59 टक्के जास्त आहे.

गुण पडताळणीसाठी २६ मे पासून करा अर्ज

ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांतील गुणांची पडताळणी करता येणार आहे. उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने (http://verification.mhe hsc.ac.in) या संकेतस्थळावरून स्वत: तसेच कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना बारावीची गुणपत्रिका व स्थलांतरप्रमाणपत्र त्यांच्या शाळा महाविद्यालयामार्फत X ५ जून पासून दुपारी तीन नंतर वितरित करण्यात येतील..

शाखानिहाय निकाल-

विज्ञान - 96.9 टक्के कला – 84.5 टक्के वाणिज्य 90.42 टक्के व्यवसाय अभ्यासक्रम 91.25 टक्के -

विभागानुसार निकाल

पुणे: 93.34 टक्के

नागपूर: 90.35 टक्के

औरंगाबाद : 91.85 टक्के

मुबई: 88.13 टक्के

कोल्हापूर: 93.28 टक्के

अमरावती: 92.75 टक्के • नाशिक: 91.66 टक्के

लातूर: 90.37 टक्के

कोकण: 96.01 टक्के

|

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार