इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:आज समर्थ प्रतिष्ठानचा सामुदायिक उपनयन सोहळा

 बहुसोमयाजी यज्ञेश्वर सेलूकर महाराज, वे.शा.स. ज्योतिषाचार्य अनंत शास्त्री जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज समर्थ प्रतिष्ठानचा सामुदायिक उपनयन सोहळा





परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.२३ - समर्थ प्रतिष्ठान द्वारा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे प्रतीवर्षा प्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज,वे.शा.स.ज्योतिषाचार्य अनंत शास्त्री जोशी यांच्या उपस्थितीत यंदाचा सोहळा होणार आहे.यंदाच्या सोहळ्यासाठी २४ बटूंची नोंदणी प्रतिष्ठान कडे करण्यात आली आहे.साधुसंतांची आशिर्वादपर उपस्थिती व शिस्तबद्ध नियोजनामुळे हा उपनयन संस्कार सोहळा राज्यभरात प्रसिद्ध आहे.

          

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे ज्या सोळा संस्कारांचा उल्लेख आहे त्यातील एक महत्त्वाचा म्हणजे उपनयन संस्कार,प्रतिवर्ष नित्यनेमाने सामुदायिकरीत्या हा सोहळा समर्थ प्रतिष्ठान आयोजीत करत असते.आज २५ मे २०२३, मित्ती जेष्ठ शु ०६ शके १९४५ गुरूवार रोजी सकाळी १० वाजून ४५ मिनीटांच्या पावन मुहूर्तावर उपनयन संस्कार वैद्यनाथ दर्शन मंडप,परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे.

बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज,माजलगाव येथील वे.शा.स. ज्योतिषाचार्य अनंत शास्त्री जोशी यांचे मार्गदर्शन यावेळी उपस्थितांना मिळणार आहे.या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समर्थ प्रतिष्ठान परळी वैजनाथ तर्फे करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या