इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:वे.शा.स.ज्योतिषाचार्य अनंत शास्त्री जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार सोहळा

 २५ मे रोजी समर्थ प्रतिष्ठानचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा


वे.शा.स.ज्योतिषाचार्य अनंत शास्त्री जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार सोहळा

परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.२३ - समर्थ प्रतिष्ठान द्वारा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे प्रतीवर्षा प्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत होत असल्याने या सोहळ्याला अनन्य साधारण महत्व आहेच.वे.शा.स.ज्योतिषाचार्य अनंत शास्त्री जोशी यांच्या उपस्थितीत यंदाचा सोहळा होणार आहे.यंदाच्या सोहळ्यासाठी २४ बटूंची नोंदणी प्रतिष्ठान कडे करण्यात आली आहे.साधुसंतांची आशिर्वादपर उपस्थिती व शिस्तबद्ध नियोजनामुळे हा उपनयन संस्कार सोहळा राज्यभरात प्रसिद्ध आहे.

          

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे ज्या सोळा संस्कारांचा उल्लेख आहे त्यातील एक महत्त्वाचा म्हणजे उपनयन संस्कार,प्रतिवर्ष नित्यनेमाने सामुदायिकरीत्या हा सोहळा समर्थ प्रतिष्ठान आयोजीत करत असते.यंदा २५ मे २०२३, मित्ती जेष्ठ शु ०६ शके १९४५ गुरूवार रोजी सकाळी १० वाजून ४५ मिनीटांच्या पावन मुहूर्तावर उपनयन संस्कार वैद्यनाथ दर्शन मंडप,परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे.माजलगाव येथील वे.शा.स.ज्योतिषाचार्य अनंत शास्त्री जोशी यांचे मार्गदर्शन यावेळी उपस्थितांना मिळणार आहे.या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समर्थ प्रतिष्ठान परळी वैजनाथ तर्फे करण्यात आले आहे.


- चौकट -


*याआधी अनेक संत महंतांचे बटूंना लाभले आशिर्वाद* 


याआधी समर्थ प्रतिष्ठान द्वारा आयोजित केलेल्या उपनयन संस्कार सोहळ्यातील बटूंना आशीर्वाद देण्यासाठी करवीर पीठाचे शंकराचार्य प.पु. विद्यानृसिंह भारती,जगद्गुरू द्वारा आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज,

संकेश्वर पिठाधिश्वर विद्या नरसिंह भारती स्वामीजी,उमरखेड संस्थानचे प.पु. माधवानंद महाराज, बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज,ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर, प्रज्ञाचक्षु विद्याभुषण हभप मुकुंदकाका जाटदेवळेकर,प.पु. मोहनबुवा रामदासी, विरसणी संस्थानचे पं.पु बापु महाराज विरसणीकर,नाशिक काळाराम मंदिर संस्थानचे महंत सुधीरदास पुजारी, ज्योतिषाचार्य अतुल भगरे गुरूजी, वेदशास्ञ संपन्न घनपाठी शशांक कुलकर्णी, भागवताचार्य सच्चिदानंद शेवडे,बसवकल्याण दत्त संस्थानचे माधवानंद सरस्वती महाराज आदि संत महंतांची उपस्थिती लाभली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट