इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS: डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांची आरोग्य विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड

 डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांची आरोग्य विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड




अंबाजोगाई (प्रतिनिधी)--

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांची महाराष्ट्र शासनाच्या नाशिक येथील आरोग्य विद्यापीठाने वैद्यकशास्त्र या विषयातील अभ्यास मंडळावर निवड केली आहे.

    डॉ. सिध्देश्वर बिराजदार हे येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात गेली अनेक वर्षे मेडिसीन विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मेडिसीन विषयातील अध्यापनासोबतच -हदय विकार व मेडिसीन विभागाशी संबंधित असलेल्या आजारांवर प्रभावी उपचार करणारे एक निष्णात डॉक्टर म्हणून डॉ सिध्देश्वर बिराजदार यांची ओळख आहे.

मेडिसीन विभागातील त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नाशिक येथील आरोग्य विद्यापीठाने त्यांची अभ्यास मंडळावर निवड केली आहे. 

     सदरील नियुक्तीबद्दल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, आ. नमिता मुंदडा, विधानसभेचे माजी सदस्य संजय दौंड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, माजी मंत्री ऍड. पंडीतराव दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, बाजार समितीचे सभापती ऍड. राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता आबा पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर वडमारे, प्रा. पंडीत कराड, प्रा. शांतिनाथ बनसोडे, डॉ. सुरेश आरसुडे स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.राकेश जाधव व इतरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या