MB NEWS:भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीचे 23 मे रोजी आयोजन
भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीचे 23 मे रोजी आयोजन
बीड (जि.मा.का.)
जिल्हयातील शासकीय कर्मचा-यांविरूध्द प्राप्त होणा-या तक्रारींबाबत पाठपुरावा करण्यासाठी जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती स्थापन करण्यात आलेली असून या समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 23 मे, 2023 रोजी दुपारी 12-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
शासकीय अधिकारी, कर्मचा-यांविरूध्द भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असल्यास नागरिकांनी जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीसमोर व्यक्तीशः उपस्थित राहून पुराव्यासह लेखी स्वरूपात मांडाव्यात. सदर तक्रारीसोबत पुरावे जोडले गेले नसल्यास अशा तक्रारी समितीमध्ये घेतल्या जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा