पोस्ट्स

वाचा : ✍️ चंद्रशेखर फुटके यांचा विशेष ब्लॉग >>>>●जनता द्यायची मनातून सन्मान: असे होते आदर्श नेतृत्व कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे

इमेज
  जनता द्यायची मनातून सन्मान: असे होते आदर्श नेतृत्व कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे ए स टी महामंडळाच्या बसच्या सीटवर 'आमदार/ खासदार यांच्यासाठी राखीव' असे लिहिलेले वाचल्यानंतर तुम्हाला हसू येते ना? तुम्ही असा विचार करता की हे लोक कधी एसटीने प्रवास करणार? पण आपल्याच बीड जिल्ह्याचे माजी खासदार कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे हे नेहमी एसटीने प्रवास करायचे... सर्वसामान्य माणसासाठी लढा देणारे अप्पा सर्वसामान्यांसोबत राहायचे... त्यांच्या समस्या आप्पांना न सांगताच समजायच्या.... शिक्षणा वाचून तरणोपाय उपाय नाही हे अप्पांनी ओळखले होते म्हणूनच मोह्यासारख्या ग्रामीण भागातून त्यांनी शिक्षणाची दारे सर्वसामान्यांना खुली करून दिली... ..  भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत आप्पांनी निजामाविरुद्ध संघर्ष केला, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात आप्पांची भूमिका प्रमुख होती... रझाकराच्या काळात आप्पांच्या मागोवा पोलिसांनी केला, सर्वसामान्य जनतेने आप्पांना अटक होऊ दिली नाही... हे आपलं नेतृत्व आहे हे जनतेने मान्य केलेले होते म्हणूनच आप्पांना जनतेतून संरक्षण मिळत होते...  सध्याच्या काळात बऱ्याचदा जनतेवर नेतृत्व

3 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील परळीत

इमेज
  3 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील परळीत परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         मराठा आरक्षणासंदर्भात एल्गार करून संपूर्ण राज्यात मराठा आरक्षण चळवळीला प्रवाही करून मराठा आरक्षणाचा मुद्दा अंतिम टप्प्याच्या निर्णय प्रक्रियेपर्यंत घेऊन येणारे मनोज जरांगे पाटील हे दि. 3 ऑक्टोबर रोजी परळी येथे येणार आहेत.          संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालेले मनोज जरांगे पाटील हे विविध ठिकाणी संवाद दौरा करत आहेत. या अनुषंगाने दि.3 ऑक्टोबर रोजी ते बीड जिल्हा दौरा करत असून परळी तालुक्यातील सिरसाळा व परळी येथे ते भेट देऊन समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत. 3 ऑक्टोबर रोजी सिरसाळा येथे सकाळी साडेअकरा वाजता तर दुपारी दोन वाजता मनोज जरांगे पाटील परळी मध्ये नागरिकांची व समाज बांधवांची भेट घेणार आहेत. ------------------------------------------------------- Click-  ■ *परळी तालुक्यातही शेतात लागवड केलेल्या गांजावर छापा* Click- ■ *सरत्या आर्थिक वर्षात संस्थेस 46.37 लाखांचा नफा : प्रा. गंगाधर शेळके* Click: ■ *ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट* Click-  ● *परळीत ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर राज्

केज नंतर आता परळीतही पोलीस कारवाई

इमेज
  परळी तालुक्यातही शेतात लागवड केलेल्या गांजावर छापा परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने नेकनूर पोलीस हद्दीत शेतात लागवड केलेल्या गांजावर केलेल्या बेधडक कारवाईनंतर आता परळी तालुक्यातील ही एका शेतात गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास आल्यानंतर परळी ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे            याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, तालुक्यातील नंदागौळ येथील आरोपी तुळशीराम केरबा गित्ते यांच्या शेतात  गांजाची लागवड करण्यात आल्याच्या माहितीनुसार पोलीसांनी प्रत्यक्ष शिवारात जाऊन छापा टाकला. यामध्ये 22,792 रु. चे 160 गांजा सदृश ओलसर हिरवट मुळाला लागलेल्या मातीसह इलेक्ट्रीक वजण काट्यावर मोजमाप करता 05 किलो 698 ग्रम वजनाची झाडे आढळून आली.याप्रकरणी सहा.पोलीस निरीक्षक नारायण गित्ते यांच्या फिर्यादीवरून  आरोपीविरुद्ध गुरनं 282/2023 कलम  20 (ब) गुंगीकारक औषधी द्रव्ये प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एच.पी.कदम हे करत आहेत.  --------------------------------------
इमेज
  जागृती नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात सरत्या आर्थिक वर्षात संस्थेस 46.37 लाखांचा नफा : प्रा. गंगाधर शेळके परळी (प्रतिनिधी)...            येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेची  35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 24   सप्टेंबर रोजी सकाळी 11:00 वा. येथील भागवत पॅलेस च्या सभागृहामध्ये जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. शोभाताई शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली असून सरत्या आर्थिक वर्षात जागृती पतसंस्थेस 46.37 लाखांचा नफा झाल्याची माहिती जागृती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गंगाधर शेळके सर यांनी दिली आहे.   याबाबत माहिती अशी की मराठवाड्याच्या आर्थिक तथा सहकार क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या जागृती नागरी सहकारी पतसंस्थेची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 24 सप्टेंबर रोजी संचालक मंडळ, विविध मान्यवर, सभासद, हितचिंतक आदींच्या उपस्थितीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ तथा उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने क

सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे ना.धनंजय मुंडेंचे आवाहन

इमेज
 नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने गणेशोत्सवात बुधवारी सायंकाळी ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या प्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे ना.धनंजय मुंडेंचे आवाहन परळी वैद्यनाथ (दि. 26) - कृषिमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करून अत्यंत साध्या पद्धतीने परळी वैद्यनाथ येथे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. प्रतिवर्षी परंपरेचा एक भाग म्हणून ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार (दि. 27) रोजी परळी शहरातील हालगे गार्डन येथे सायंकाळी 8 वा. प्रसिद्ध विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या सुश्राव्य प्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या कीर्तन-प्रबोधन कार्यक्रमाचा लाभ परळी वैद्यनाथ शहरासह परिसरातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.  प्रतिवर्षी विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नाथ प्रतिष्ठाण मार्फत सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी शेतकऱ्यांवर

आबा तुकाराम साखरे यांचे निधन

इमेज
  आबा तुकाराम साखरे यांचे निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे मांडवा येथील रहिवासी आबा तुकाराम साखरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 85 वर्षे होते.        आबा तुकाराम साखरे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यातच आज सोमवार दि. 25 सप्टेंबर रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले.उद्या बुधवारी सकाळी 7 वाजता मांडवा या त्यांच्या गावी राख सावडन्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.      कै.आबा तुकाराम साखरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे, पतवंडे असा भरगच्च परिवार आहे. साखरे कुटुंबाच्या दु:खात एमबीन्युज परिवार सहभागी आहे. ------------------------------------------------------- Click: ■ *ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट* Click-  ● *परळीत ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा* Click- ● *पिकांच्या नैसर्गिक नुकसानाबाबत तक्रारीसाठी विमा कंपनीकडे अशी करा तक्रार* Click: ■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द* Click: *गौर

ब्राझीलच्या कृषी, व्यापार व गुंतवणूक विभागातील वरिष्ठ अधिकारी व राजदूतांचा शिष्टमंडळात समावेश

इमेज
  ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट ब्राझीलच्या कृषी, व्यापार व गुंतवणूक विभागातील वरिष्ठ अधिकारी व राजदूतांचा शिष्टमंडळात समावेश महाराष्ट्र आणि ब्राझील दरम्यान सोयाबीन, कापूस, ऊस आदींच्या संशोधन व व्यापारासंदर्भात झाली चर्चा मुंबई (दि. 26) - आज ब्राझीलच्या राजकीय दूतावासामार्फत ब्राझील सरकारमधील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची मुंबई येथे भेट घेऊन कृषी, कृषी व्यापार व गुंतवणूक आदी विषयांवर चर्चा केली. यावेळी ब्राझीलच्या शिष्टमंडळाने धनंजय मुंडे यांना ब्राझील भेटीचे निमंत्रण दिले आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ब्राझीलच्या शिष्टमंडळातील अधिकाऱ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.  कमी पावसात जास्तीत जास्त उत्पादित होणारे सोयाबीन, वातावरण बदलावर व त्यानुसार शेतीमध्ये केलेले प्रयोग, त्याचे संशोधन, कमी पाण्यात उसाचे अधिकाधिक उत्पादन करणे तसेच बेदाणेची ब्राझीलमध्ये मोठी मागणी असल्याने त्यावरील आयात कर कमी करणे, ब्राझील या देशासोबत तेथील यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या बाबी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण

■ परळीत अनुभवता येणार तिरंदाजीचा थरार!

इमेज
 ■ परळीत अनुभवता येणार तिरंदाजीचा थरार! परळीत ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा _ना.धनंजय मुंडे,ना.संजय बनसोडे, आ.सतीश चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन_   परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       मराठवाडा मुक्ति संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परळी वैजनाथ येथे प्रथमच महाराष्ट्र राज्य आर्चरी असोसिएशन, बीड जिल्हा आर्थरी असोसिएशन व बीड जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीयआर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा (वरिष्ठ गट) ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर  या कालावधीत होणार आहेत.          आर्चरी (धनुर्विद्या)हा खेळ ऑलंपिक मधील एक महत्त्वाचा खेळ असून शासन नोकरीमध्ये असणाऱ्या ५% कोट्यामध्ये आर्चरीसाठी स्वतंत्र कोटा आहे. महाराष्ट्र आर्चरी (धनुर्विद्या) असोसिएशनच्या वतीने या राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होणार असून परळीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतून महाराष्ट्राची नॅशनल आर्चरी टीम निवडली जाणार आहे.या स्पर्धेत राज्यभरातून सातशे ते आठशे खेळाडू सहभागी होणार आहेत.फाऊंडेशन स्कूल प्लेग्राऊंड, परळी वैजनाथ येथे ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर  या

बीड जिल्ह्यात तालुका निहाय प्रतिनिधींची नियुक्ती

इमेज
  पिकांच्या नैसर्गिक नुकसानाबाबत तक्रारीसाठी विमा कंपनीकडे अशी करा तक्रार बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना सुचित करण्यात येते, प्रधानमंत्री फसल बीमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये भारतीय कृषी विमा कंपनी लि. यांच्यामार्फत बीड जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. तरी दरम्यानच्या काळामध्ये पिकांचे स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास,भूस्खलन,गारपीट,ढगफुटी, महापूर, अतिवृष्टी, दीर्घ काळ पाणी साचून झालेले नुकसान व चक्रीवादळ, वीज पडून लागलेली नैसर्गिक आग इत्यादी कारणामुळे पिकाचे नुकसान झाले असेल तर खरीप हंगाम २०२३ मध्ये पिक विमा भरलेल्या शेतकरी बांधवांनी ७२ तासात पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार करावी. नुकसानग्रस्त पीक विमाधारक शेतकरी बांधवांनी वेळीच तक्रारी दाखल कराव्यात. पिक विमा कंपनीला तक्रार देण्यासाठी कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत विकसित क्रॉप इन्शुरन्स अप्लिकेशन गूगल प्ले स्टोर वरून डाऊनलोडकरून घ्यावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयातील खालील विमा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन बीड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, श्री बाबासाहेब जेजुरकर य