■ परळीत अनुभवता येणार तिरंदाजीचा थरार!

 ■ परळीत अनुभवता येणार तिरंदाजीचा थरार!


परळीत ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा



_ना.धनंजय मुंडे,ना.संजय बनसोडे, आ.सतीश चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन_ 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      मराठवाडा मुक्ति संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परळी वैजनाथ येथे प्रथमच महाराष्ट्र राज्य आर्चरी असोसिएशन, बीड जिल्हा आर्थरी असोसिएशन व बीड जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीयआर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा (वरिष्ठ गट) ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर  या कालावधीत होणार आहेत. 

        आर्चरी (धनुर्विद्या)हा खेळ ऑलंपिक मधील एक महत्त्वाचा खेळ असून शासन नोकरीमध्ये असणाऱ्या ५% कोट्यामध्ये आर्चरीसाठी स्वतंत्र कोटा आहे. महाराष्ट्र आर्चरी (धनुर्विद्या) असोसिएशनच्या वतीने या राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होणार असून परळीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतून महाराष्ट्राची नॅशनल आर्चरी टीम निवडली जाणार आहे.या स्पर्धेत राज्यभरातून सातशे ते आठशे खेळाडू सहभागी होणार आहेत.फाऊंडेशन स्कूल प्लेग्राऊंड, परळी वैजनाथ येथे ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर  या स्पर्धा होणार आहेत. 

       शनिवार, ३० सप्टेंबर २०२३ सायं. ५:०० वा. या स्पर्धेचे उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.ना. धनंजय मुंडे  (कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते उद्घाटन होणार असुन ना. संजय बनसोडे  (क्रिडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य) व आ.सतीश चव्हाण (संभाजीनगर पदवीधर मतदार संघ ) यांची विशेष उपस्थिती लाभणार  आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन संजय दौंड (माजी आमदार), राजेश्वर चव्हाण (जिल्हाध्यक्ष रा.कॉ. पाटी, बीड),वाल्मिक अण्णा कराड(गटनेता न.प. परळी वैजनाथ), श्रीमती. सुहासिनी देशमुख (जिल्हा क्रीडा अधिकारी, बीड),श्रीमती नम्रता चाटे(उपविभागीय अधिकारी, परळी वैजनाथ ), अजय मुंडे (गटनेता - जिल्हा परिषद, बीड),त्रिंबक कांबळे (मुख्याधिकारी न.प. परळी ) श्री. वैजनाथ सोळंके(तालुकाध्यक्ष रा.काॅ. परळी वै.) ऋषीकेश लोमटे (शहरप्रमुख शिवसेना, अंबाजोगाई),विजयप्रकाश तोतला(अध्यक्ष-चिंतामणी एज्युकेशन ट्रस्ट), गोविंद शेळके (ज्येष्ठ पत्रकार एबीपी माझा),सौ. गीतांजली कुलकर्णी (कै. प्रमोद महाजन इंग्लीश स्कूल) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

        तरी या सोहळ्यास व स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन  स्वागताध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी (शहराध्यक्ष-राकाँ पार्टी, परळी वैजनाथ मा. नगराध्यक्ष न.प. परळी वैजनाथ) यांच्यासह प्रशांत देशपांडे (अध्यक्ष महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन), प्रमोद चांदुरकर (सचि महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन),राजेश कराड( अध्यक्ष बीड जिल्हाआर्चरी असोसिएशन), शैलेश कुलकर्णी (सचिव बीड जिल्हाआर्चरी असोसिएशन), एस.पी. मुंडे (तालुकाध्यक्ष शारीरीक शिक्षक संघ), विलास आरगडे (शहराध्यक्ष शारीरीक शिक्षक संघ) व परळी तालुका शारिरीक शिक्षक संघटना यांच्यावतीने करण्यात आले आहे.

क्रिडा शिक्षकांचा जीवनगौरव व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचा होणार सन्मान

      दरम्यान, या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात परळीत क्रिडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या दत्ताप्पा ईटके,सुभाष नाणेकर व अमर देशमुख या क्रिडा शिक्षकांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.त्याचबरोबर परळी तालुक्यातील राष्ट्रीय पातळीवर विविध क्रिडा प्रकारात कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.


-----------------------------------------------------

Click:■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द*

Click:*गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अनिता संजय कुकडे*

Click:■ *राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार*

Click:■ *आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा*

Click:■ *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम*

Click: ■ *भिवा बिडगर यांच्याकडून शिवम फड यांचा सत्कार*

Click: ■ *हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर*





Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*

Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------










----------------------------------------------------

Click:■ *ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन*

Click:■ *गाड्या रद्दचा निर्णय मागे: रद्द करण्यात आलेल्या नांदेड-पुणे- नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या पूर्ववत धावणार*

Click:■ *आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा*

Click:■ *परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान*




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार