जागृती नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात


सरत्या आर्थिक वर्षात संस्थेस 46.37 लाखांचा नफा : प्रा. गंगाधर शेळके



परळी (प्रतिनिधी)...

   

       येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेची  35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 24   सप्टेंबर रोजी सकाळी 11:00 वा. येथील भागवत पॅलेस च्या सभागृहामध्ये जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. शोभाताई शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली असून सरत्या आर्थिक वर्षात जागृती पतसंस्थेस 46.37 लाखांचा नफा झाल्याची माहिती जागृती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गंगाधर शेळके सर यांनी दिली आहे.


  याबाबत माहिती अशी की मराठवाड्याच्या आर्थिक तथा सहकार क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या जागृती नागरी सहकारी पतसंस्थेची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 24 सप्टेंबर रोजी संचालक मंडळ, विविध मान्यवर, सभासद, हितचिंतक आदींच्या उपस्थितीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ तथा उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने कर्मचाऱ्यांनी केला. त्यानंतर प्रस्ताविक करताना अहवाल वाचन व संस्थेचा अर्थिक लेखाजोखा तथा प्रगतीचा आलेख संस्थेच्या अध्यक्षा प्रा. शोभाताई शेळके यांनी मांडला. बँकेच्या वतीने ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या सुलभ सोनेतारण, वाहनतारन, आदिसह विविध सुविधांची माहिती देण्यात आली. 


     यावेळी पुढे बोलताना जागृती नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक प्रा गंगाधर शेळके सर यांनी सांगितले की, संस्थेच्या परळीतील मुख्य शाखेसह अंबाजोगाई व सिरसाळा येथे शाखा कार्यरत असून घाटनांदुर ची शाखा प्रस्तावित आहे. संस्थेमध्ये जवळपास 22 कर्मचारी आणि 25 पिग्मी एजंट असे जवळपास 47 कर्मचारी कार्यरत आहेत. संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांच्या सौजन्य पुर्ण सेवेमुळे बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचे  सांगितले.  जागृती नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक उलाढाल 236.15 कोटी रुपये असून संस्थेकडे 73 कोटींच्या ठेवी जमा आहेत. 2022 ते 2023 या आर्थिक वर्षामध्ये संस्थेस 46.37 लाखांचा नफा झाला असून संस्थेची इतर ठिकाणची गुंतवणूक 46.99 कोटी रुपये असल्याची माहिती प्रा. शेळके सर यांनी दिली.


     जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांच्या गुणवंत पाल्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे देत त्यांचा सत्कार देखील संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी संस्थेचे मा.संचालक विजयकुमार देशमुख तथा विद्यमान संचालक वैजनाथराव सोळंके व प्रा. अवस्थी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


   याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गंगाधर शेळके सर, संस्थेचे अध्यक्षा प्रा. शोभाताई शेळके, सचिव वसंतराव सूर्यवंशी कोषाध्यक्ष संतोष चव्हाण, संचालक सर्वश्री ॲड प्रकाश मराठे, लक्ष्मण कोठावळे, वैजनाथराव सोळंके, राहुल शेळके, श्रीमती चंद्रकला मगर, चंद्रकांत टाक, मारुती बोबडे, शेख गफार, आदींसह फाउंडर मेंबर, सभासद, हितचिंतक, वकील डॉक्टर्स आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. या सभेच्या यशस्वीतेसाठी जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व कर्मचारी वर्ग व पिग्मी एजंट यांनी परिश्रम घेतले. या सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी हेमंत कुलकर्णी यांनी केली.

-------------------------------------------------------

Click- ■ *परळी तालुक्यातही शेतात लागवड केलेल्या गांजावर छापा*

Click-■ *सरत्या आर्थिक वर्षात संस्थेस 46.37 लाखांचा नफा : प्रा. गंगाधर शेळके*

Click:■ *ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट*

Click- ● *परळीत ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा*

Click-● *पिकांच्या नैसर्गिक नुकसानाबाबत तक्रारीसाठी विमा कंपनीकडे अशी करा तक्रार*


Click:■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द*

Click:*गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अनिता संजय कुकडे*

Click:■ *राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार*

Click:■ *आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा*

Click:■ *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम*

Click: ■ *भिवा बिडगर यांच्याकडून शिवम फड यांचा सत्कार*

Click: ■ *हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर*





Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*

Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------










----------------------------------------------------

Click:■ *ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन*

Click:■ *गाड्या रद्दचा निर्णय मागे: रद्द करण्यात आलेल्या नांदेड-पुणे- नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या पूर्ववत धावणार*

Click:■ *आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा*

Click:■ *परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान*




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार