वाचा : ✍️ चंद्रशेखर फुटके यांचा विशेष ब्लॉग >>>>●जनता द्यायची मनातून सन्मान: असे होते आदर्श नेतृत्व कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे

 जनता द्यायची मनातून सन्मान: असे होते आदर्श नेतृत्व कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे

स टी महामंडळाच्या बसच्या सीटवर 'आमदार/ खासदार यांच्यासाठी राखीव' असे लिहिलेले वाचल्यानंतर तुम्हाला हसू येते ना? तुम्ही असा विचार करता की हे लोक कधी एसटीने प्रवास करणार? पण आपल्याच बीड जिल्ह्याचे माजी खासदार कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे हे नेहमी एसटीने प्रवास करायचे... सर्वसामान्य माणसासाठी लढा देणारे अप्पा सर्वसामान्यांसोबत राहायचे... त्यांच्या समस्या आप्पांना न सांगताच समजायच्या.... शिक्षणा वाचून तरणोपाय उपाय नाही हे अप्पांनी ओळखले होते म्हणूनच मोह्यासारख्या ग्रामीण भागातून त्यांनी शिक्षणाची दारे सर्वसामान्यांना खुली करून दिली..... 


भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत आप्पांनी निजामाविरुद्ध संघर्ष केला, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात आप्पांची भूमिका प्रमुख होती... रझाकराच्या काळात आप्पांच्या मागोवा पोलिसांनी केला, सर्वसामान्य जनतेने आप्पांना अटक होऊ दिली नाही... हे आपलं नेतृत्व आहे हे जनतेने मान्य केलेले होते म्हणूनच आप्पांना जनतेतून संरक्षण मिळत होते...  सध्याच्या काळात बऱ्याचदा जनतेवर नेतृत्व लादले जाते.... 


सर्वहारा मनुष्य, कामगार, मजूर, शेतकरी, शेतमजूर यांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बीड जिल्ह्याचे नेतृत्व आप्पांनी केले. परळी तालुक्यातील मोहा सारख्या ग्रामीण भागातील उदयास आलेली ही तोफ बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून पुढे संसदेत धडाडत राहिली. बडेजावपणाचा लवलेशही आप्पांच्या अंगी कधी जाणवला नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न दिल्लीच्या संसदेपासून ते बीड जिल्ह्याच्या कलेक्टर पर्यंत मांडताना त्यांनी सर्वसामान्य माणसाला कधीही आपली बॅगही धरू दिली नाही... एसटीतून उतरून आपली बॅग सांभाळत कलेक्टर ऑफिस पर्यंत आपल्या बाजूने दमदार पाऊल टाकत चालत जाणारा हा मनुष्य म्हणजे खासदार आहे हे ओळखायला बऱ्याचदा लोकांना उशीर व्हायचा... आणि मग नवल वाटून त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त व्हायचा.


महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या रूपाने त्यांनी ग्रामीण भागात आणलेली शिक्षणाची गंगा आता आजूबाजूला आपली मुळे धरत आहे... 

महाराष्ट्र विद्यालय मोहाच्या प्रांगणात आप्पांचा अंत्यविधी झाला... आप्पांच्या कारकिर्दीचा मोह्याच्या ग्रामस्थांना नेहमीच अभिमान वाटतो.... येत्या एक ऑक्टोबरला आप्पांचा स्मृतिदिन आहे, या निमित्ताने गावकऱ्यांनी एकत्र येत आप्पा आणि त्यांचे सहकारी यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी, त्यांची प्रेरणा पुढील पिढीने कायम घ्यावी यासाठी, स्मारकाच्या रुपात कलाकृतीमध्ये त्यांना कायम करून ठेवले आहे... आप्पा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एक प्रकारे ग्रामस्थांनी आगळीवेगळी अशी आदरांजली वाहिली आहे... 


महाराष्ट्र विद्यालय मोहाच्या प्रांगणामध्ये एक ऑक्टोबरला होणाऱ्या या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची विनंती मोहा ग्रामस्थांनी आपणास केली आहे.


एकीकडे नेत्यांबद्दल अविश्वास जनतेमध्ये वाढत असताना जनतेच्या मनातलं खरं नेतृत्व कसं होतं हे प्रत्यक्ष पाहायचं असेल तर एक ऑक्टोबरच्या या सोहळ्यात तुम्ही नक्की सहभागी व्हायला हवं... 

           


 ✍️चंद्रशेखर फुटके, संपर्क सुत्र 93250 63512

---------------------------------------------------


           ●अधिक बातम्या वाचा व पहा●

-------------------------------------------------------

Click-■ *3 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील परळीत*

Click- ■ *परळी तालुक्यातही शेतात लागवड केलेल्या गांजावर छापा*

Click-■ *सरत्या आर्थिक वर्षात संस्थेस 46.37 लाखांचा नफा : प्रा. गंगाधर शेळके*

Click:■ *ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट*

Click- ● *परळीत ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा*

Click-● *पिकांच्या नैसर्गिक नुकसानाबाबत तक्रारीसाठी विमा कंपनीकडे अशी करा तक्रार*





Click:■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द*

Click:*गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अनिता संजय कुकडे*

Click:■ *राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार*

Click:■ *आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा*

Click:■ *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम*

Click: ■ *भिवा बिडगर यांच्याकडून शिवम फड यांचा सत्कार*

Click: ■ *हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर*



Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*

Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------










----------------------------------------------------

Click:■ *ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन*

Click:■ *गाड्या रद्दचा निर्णय मागे: रद्द करण्यात आलेल्या नांदेड-पुणे- नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या पूर्ववत धावणार*

Click:■ *आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा*

Click:■ *परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान*




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?