पोस्ट्स

MB NEWS:*नंदनजचे उपसरपंच योगीराज गुट्टे यांचे निधन* *_धार्मिक क्षेत्रासह सर्व स्तरात मोठा जनसंपर्क असलेले व सर्व परिचित व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड_*

इमेज
 *नंदनजचे उपसरपंच योगीराज गुट्टे यांचे निधन*    *_धार्मिक क्षेत्रासह सर्व स्तरात मोठा जनसंपर्क असलेले व सर्व परिचित व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड_* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       परळी तालुक्यातील सर्व परिचित असलेले  नंदनजचे उप सरपंच योगीराज गुट्टे यांचे मंगळवारी (दि.८) सायं.७ वा.सुमरास निधन झाले.धार्मिक क्षेत्रासह सर्व स्तरात मोठा जनसंपर्क असलेले व सर्व परिचित व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सर्व स्तरातून शोकभावना व्यक्त होत आहेत.         राजकीय,सामाजिक क्षेत्रातील सक्रिय असलेले योगीराज गुट्टे यांचा धार्मिक क्षेत्रात मोठा वावर होता.केवळ परळी तालुक्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील विविध ठिकाणी त्यांची किर्तन भजन आदींना उपस्थिती असायची.वारकरी,भजनी मंडळ, किर्तनकार, प्रवचनकार महाराज मंडळी यांच्याशी त्यांचा दांडगा संपर्क होता.कोणत्याही धार्मिक कार्यक्रम व उपक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग होता.राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. परळी तालुक्यातील सर्वंकष जबाबदार व आदरणीय व्यक्तीमत्त्वांमधिल एक तारा त्यांच्या निधनाने निखळला आहे.  

MB NEWS:*विविध योजनांचा लाभ मिळण्याकरिता बचत गटाचे कार्यालय मोलाची भूमिका निभावू शकते-संतोष शिंदे*

इमेज
  *विविध योजनांचा लाभ मिळण्याकरिता बचत गटाचे कार्यालय मोलाची भूमिका निभावू शकते-संतोष शिंदे*  परळी वैजनाथ,प्रतिनिधी....      बचत गटांना मार्गदर्शन करणे तसेच विविध योजनांचा लाभ मिळण्याकरिता बचत गटाचे कार्यालय मोलाची भूमिका निभावू शकते असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केले.       ना. धनंजय मुंडे हे मतदार संघातील महिला सक्षमीकरण करण्यासाठी आग्रही भूमिका घेतात.या अनुषंगाने महिलांनी स्वतःचा उद्योग सुरु करावा  यासाठी प्रोत्साहन व सहकार्य करण्याची भूमिका घेऊन संतोष शिंदे यांनी परळी वाडसावित्री येथील ग्रह उद्द्योग आणि बचत गट ला भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी सौ.सुलक्षणा वाघमारे  यांच्या पुढाकारातून वडसावित्री नगर भागात महिला गृहउद्योग बचत गटांच्या माध्यमातून कार्यालय सुरु करण्यात आले आहे .बचत गटांना मार्गदर्शन करणे तसेच विविध योजनांचा लाभ मिळण्याकरिता बचत गटाचे कार्यालय मोलाची भूमिका निभावू शकते.कोरोनाच्या प्रदूर्भाव असल्याने सध्या मास्क हा आपल्याला अविभाज्य घटक झालेला असल्याने बचत गटांना मास्कचेही उत्पादन करावे अशी अपेक्षा

MB NEWS:परळीत वा-यासह झाला पाऊस ; शहरातील वीज गुल ! जोरदार वार्यामुळे वीज वाहिन्या तुटल्या ; दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर सुरू:लाईट लवकर येण्याचा भरोसा नाही

इमेज
 परळीत  वा-यासह झाला पाऊस ; शहरातील वीज गुल ! जोरदार वार्यामुळे वीज वाहिन्या तुटल्या ; दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर सुरू:लाईट लवकर येण्याचा भरोसा नाही परळी वै…. परळी तालुक्यात  पावसाने आज जोरदार हजेरी लावली आहे.  सोसाट्याच्या वार्यामुळे वीजवाहक तारा अनेक ठिकाणी तुटून पडल्या आहेत.त्यामुळे शहरात  वीज गायब झाली आहे. वीजपुरवठा सुरळीत चालू करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू असल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.परंतु शहरातील वीज पुरवठा कधी सुरू होईल याची निश्चित वेळ नाही.            आज सायंकाळी सात वा. सुमारास अचानक वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली. पावसाने समाधान दिले मात्र खंडीत वीज पुरवठयाने नागरिकांची चांगलीच तगमग झाली.डाबी येथील सब स्टेशन मध्ये बिघाड झाला.  हा बिघाड  दुरुस्त केल्यानंतर त् परळी शहरातील  बिघाड शोधून तो दुरुस्त केल्यानंतर लाईट येणार आहे.

MB NEWS:भूमी अभिलेख कार्यालयाच्या सेवा ऑनलाईन*

इमेज
 *भूमी अभिलेख कार्यालयाच्या सेवा ऑनलाईन* बीड, 09 (जिमाका) :-भूमी अभिलेख कार्यालयाच्या सेवा ऑनलाईन करण्यातआल्या असून  लोकसेवा हक्क कायदा अंतर्गत अधिसूचित  २० आहेत. सेवा महाऑनलाईन प्रणालीवर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कलम 9 मधील तरतुदीनुसार माहिती प्राप्त करण्याविषयी प्रथम अपिलाच्या निर्णय 30 दिवसात व व्दित्तीय अपिलावर निर्णय 45 दिवसाच्या आत देणे बंधकारक आहे.विविध सेवा व ते मिळणे विषयी शासनाकडून निर्धारित दिवस यांची माहिती पुढील प्रमाणे आहे. नक्कल पुरविणे, (01).मिळकत पत्रिका : 3दिवस,(02).मिळकत पत्रिका मुंबई उपनगर जिल्हा पडताळणी :30दिवस, (03).टिपण क्षेत्रबुक प्रति बुक शेतपुस्तक,जवाब,काटे, फाळणी ,ही फ्रॉ.नं 4. आकार फोड, स्कीम उतारा आकारबंद गट नकाशा मोजणी नकाशा चौकशी नोंदवही इत्यादी अभिलेख 5.दिवस (04) अपील निर्णयाचा नकला : 3 दिवस  मोजणी प्रकरणे  (05) अति अति तातडीची प्रकरणे : 15 दिवस  (06) अति तातडी प्रकरणात : 60 दिवस (07) तातडी प्रकरणे : 90 दिवस (08) साधी प्रकरणे : 180 दिवस (09) पोट हिस्सा मोजणी नंतर परिपूर्ण प्रकरणामध्ये आकारफोड मंजूर करणे : 30 दिवस (आकार फोड /क.जा.प.तयार करणे) (

MB NEWS:उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आवाहन*

इमेज
 *उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आवाहन* बीड, 09 (जिमाका) :- मागील काही काळात झालेल्या शासकीय महसूल हानी व बोगस वाहन नोंदणी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जुन्या मॅन्यूल स्वरूपात असणाऱ्या आर.सी. , टॅक्स संगणकावर नोंद घेताना कार्यालयातील अभिलेख तपासूनच त्यांची नोंद घेण्यात येते. ज्या प्रकरणात अभिलेख पडताळणी होणार नाही, त्या प्रकरणात वाहन मालक व वाहनांची खातरजमा करूनच निर्णय घेतला जाईल. सर्व नागरिकांच्या माहितीकरीता असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,बीड तर्फे करण्यात आले आहे.    *-*-*-*-*

MB NEWS:पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करा* *एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

इमेज
 *पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करा*  *एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*  मुंबई : माथेरानचे पत्रकार संतोष पवार यांचा मृत्यू सरकारी यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झालेला असल्याने त्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाव्दारे केली आहे.. संतोष पवार यांच्या कुटुंबियांना सरकारने पन्नास लाख रूपयांची मदत करावी अशी मागणी देखील देशमुख यांनी केली आहे.. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  संतोष पवार यांना सकाळी श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना कर्जत येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.. मात्र तेथे व्हेंटिलेटर नसल्याने त्यांना डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये नेण्याचे ठरले. 108 क्रमांकांच्या अ‍ॅम्ब्युलन्समधून त्यांना घेऊन जात असताना ऑक्सिजन संपला, मात्र नवीन सिलेंडर स्टाफला लावता आले नाही आणि संतोष पवार यांचं निधन झाले.. केवळ सरकारी यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे त्यांचं निधन झाल्याने या प्रकरणाची चौकशी करून जबाबद

MB NEWS:बीड जिल्ह्यात 166 तर परळीत 24 कोरोना रुग्ण

इमेज
 *बीड जिल्हा कोरोना अपडेटस्:* *_बीड जिल्ह्यात 166 तर परळीत 24 कोरोना रुग्ण_*

MB NEWS:जलयुक्त शिवारच्या ०.१७% कामाचं मूल्यमापन अचूक कसं?', कॅगच्या अहवालावर भाजपचा सवाल

इमेज
 *⭕जलयुक्त शिवारच्या ०.१७% कामाचं मूल्यमापन अचूक कसं?', कॅगच्या अहवालावर भाजपचा सवाल⭕*     मुंबई : फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजना असफल झाल्याचा ठपका कॅगने ठेवला. पण कॅगच्या या ठपक्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. 'राज्यात जलयुक्त शिवारची एकूण जितकी कामं झाली, त्यातील केवळ ०.१७ टक्के कामे आणि तीही विशिष्ट भागात अभ्यासून योजनेचे मूल्यमापन करणे गैर आहे. त्यामुळे या योजनेच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताच येऊ शकत नाही', असं आशिष शेलार म्हणाले आहेत.      राज्यात जलयुक्त शिवारची एकूण ६,४१,५६० कामे झाली. त्यापैकी कॅगने १,१२८ कामं तपासली. म्हणजेच केवळ ०.१७ टक्के कामांवरून संपूर्ण जलयुक्त शिवारचे मूल्यमापन विश्वासार्ह कसे ठरेल? याचा अर्थ ९९.८३ टक्के कामं तपासलीच नाहीत. जलयुक्त शिवारची कामे २२,५८९ गावांमध्ये झाली. त्यातील कॅगने फक्त १२० गावं तपासली. म्हणजे फक्त ०.५३ टक्के गावं पाहिली गेली. ९९.४७ टक्के गावांमध्ये न जाताच तयार केलेला अहवाल वस्तुस्थितीदर्शक कसा मानायचा? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.     या अहवालात भ्रष्टाचारचा एकही आरोप नाही. कामे ९८ टक

MB NEWS:*अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्या प्रकरणी टाळाटाळ होत असल्याने नंदकुमार चिखले यांचे दि. १० पासून न.प. समोर अमरण उपोषण*

इमेज
 *अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्या प्रकरणी टाळाटाळ होत असल्याने नंदकुमार चिखले यांचे  दि. १० पासून न.प. समोर अमरण उपोषण* परळी वैजनाथ - (प्रतिनिधी)  चंद्रकांत लक्ष्मणराव चिखले यांनी परळी नगर परिषद येथे सफाई कर्मचारी म्हणून बारा वर्षे सेवा केल्या नंतर सेवा चालू असतानाच दिनांक - १/९/२०१५ रोजी पाणीपुरवठा मोटार पंपाचे काम करत असताना त्यांचा मृत्यू झाला. लाड कमिटीच्या शिफारशी नुसार सेवेतील मयत कर्मचाऱ्याच्या जागी कुटुंबातील व्यक्तीस सेवेत सामावून घेणे अपेक्षित असताना, वडिलांच्या जागी परळी वैजनाथ नगर परिषदेत नौकरी मिळण्यासाठी नंदकुमार चिखले यांनी दिनांक ०२/११/२०१५ रोजी अर्ज केला परंतु उडवा उडवीच्या उत्तरा शिवाय पदरात काहीही पडले नाही. न.प.कडे विनंती अर्ज करून ५ वर्ष झाली तरी त्यावर कसल्याच प्रकारे विचार केला गेला नाही. हा माझ्या कुटुंबावर जाणीवपूर्वक केलेला अन्याय नाही का ? असा सवाल नंदकिशोर चिखले यांनी केला. माझे वडील सेवेत असताना मयत झाल्यानंतर परळी वैजनाथ नगर परिषदेकडे येणे असलेली " सेवा उपदान रजा रोकिकरण, फरकाची रक्कम, पदोन्नतीतील फरकाची रक्कम " अद्यापही दिली गेली नाही. या बाबत वे

MB NEWS:*विनामास्क फिरणारांवर चाप बसवण्यासाठी कारवाया ; आज २९ जणांवर कारवाई-७३०० दंडाची वसुली* *परळीत दंडवसुलीसाठी पाच विशेष पथकांची नियुक्ती*

इमेज
 *विनामास्क फिरणारांवर चाप बसवण्यासाठी  कारवाया ; आज २९ जणांवर कारवाई-७३०० दंडाची वसुली* *परळीत दंडवसुलीसाठी पाच विशेष पथकांची नियुक्ती* _--------------------------------------------------------------- परळी नगर परिषद व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने मास्क न वापरलेबाबत शहरात मोहीम राबवली  एकूण 5 पथक एकूण कारवाई  29 एकूण दंड वसूल  7300 ------------------------------------------------------------ परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     कोविड संसर्गापासून बचाव करण्यासाठी व संसर्ग रोखण्यासाठी नियमांची पायमल्ली होणे घातक ठरत आहे.कोविडविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी परळी नगर परिषद काटेकोरपणे दंडात्मक कारवाई करत आहे.       विनामास्क फिरणारांवर चाप बसवण्यासाठी नगर परिषदेच्या धडाधड कारवाया सुरू करण्यात आलेल्या आहेत.परळीत दंडवसुली जोरात सुरू आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे प्रशासनाचे आवाहन आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी व नियमांचे पालन करावे असे आवाहन नगर परिषद प्र.मुख्याधिकारी बाबुराव रुपनर यांनी केले आहे.

MB NEWS: *जलयुक्त शिवार अभियानात वाया घालवलेल्या १० हजार कोटींना जबाबदार कोण? बोगस कारभार अखेर कॅगने उघडा केला - धनंजय मुंडे* *जलयुक्तच्या कारभारावर कॅगने ओढले ताशेरे*

इमेज
 *जलयुक्त शिवार अभियानात वाया घालवलेल्या १० हजार कोटींना जबाबदार कोण? बोगस कारभार अखेर कॅगने उघडा केला - धनंजय मुंडे* *जलयुक्तच्या कारभारावर कॅगने ओढले ताशेरे* मुंबई (दि. ०९) ---- : केवळ पक्षातील ठेकेदारांना पोसण्याच्या उद्देशाने भाजप सरकारने गवगवा केलेल्या अशास्त्रीय जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारावर आज कॅगच्या अहवालातून ताशेरे ओढण्यात आले आहेत. याबाबत आम्ही वेळोवेळी विरोध नोंदवून यातील भ्रष्टाचार उघड केला होता, या अभियानात सुमारे १० हजार कोटी रुपये वाया घालवले याला जबाबदार कोण? असा सवाल राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार ही योजना अपयशी ठरल्याचे 'कॅग'कडून नमूद करण्यात आले आहे. या योजनेवर ९६३४ कोटी रुपये खर्च करूनही पाण्याची गरज  भागवण्यात व भूजल पातळी वाढवण्यात अपयश आल्याचे कॅगने म्हटले आहे. 'कॅग'चे हे ताशेरे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. जलयुक्त शिवार ही देवेंद्र फडणवीस व तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची महत्त्वाकांक्षी योजना होती. तत्कालीन सर

MB NEWS:शासनाने तत्काळ अध्यादेश काढून विशेष अधिवेशन बोलवावे* *आता मराठा समाज आरपारची लढाई लढून आरक्षण मिळवल्या शिवाय शांत बसणार नाही - केशव साबळे पाटील

इमेज
 *शासनाने तत्काळ अध्यादेश काढून विशेष अधिवेशन बोलवावे* *आता मराठा समाज आरपारची लढाई लढून आरक्षण मिळवल्या शिवाय शांत बसणार नाही - केशव साबळे पाटील * परळी वैजनाथ, प्रतिनिधी... सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणाचा विषय पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करून शिक्षण व नोकर भरतीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. हा निर्णय अतिशय दुःखद व खेद जनक आसुन समाजाचे मोठे नुकसान होईल. मराठा आरक्षण उपसमीतीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या  नाकर्तेपणामुळे समाजाचे खुप मोठे नुकसान झाले आहे. सरकारला आमची आजूनही विनंती आहे तातडीने मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढून विशेष अधिवेशन घेण्यात यावे. नसता मराठा समाज कदापि माफ करणार नाही. आता मराठा समाज आरपार लढाई लढून आपला हक्क मिळवल्या शिवाय शांत बसणार नाही. आरक्षण हा आमचा हक्क आहे व तो आम्ही मिळवूच.  --------केशव साबळे  पाटील-------            ===================

MB NEWS: *दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध - धनंजय मुंडे* *अंध व्यक्ती व विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न*

इमेज
 *दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध - धनंजय मुंडे* *अंध व्यक्ती व विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न* मुंबई (दि. ०९) ---- : एमआरईजीएस, नरेगा या योजनांमध्ये अंध व्यक्तींसाठी रोजगाराच्या संधी राखीव ठेवणे, ऑनलाईन शिक्षणासाठी टीव्ही किंवा तत्सम साधने उपलब्ध करून देणे यासह अंध विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र योजना तयार करणे आदी विषयी चर्चा झाली असून अंध दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध आहे असे मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच 'नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड' च्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केले आहे. पुढील आठवड्यात राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत वेबिनार द्वारे बैठक घेऊन एमआरईजीएस व नरेगा योजनांमधील रोजगाराच्या संधी बाबत चर्चा करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटले आहे.  या बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम,सचिव शाम तांगडे, आयुक्त प्रवीण दराडे , उपसचिव दिनेश डिंगळे, दिव्यांग आयुक्त प्र

MB NEWS:कंगना मुंबईत येताच मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख !

इमेज
  कंगना मुंबईत येताच मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख ! _"आज माझं घर तुटलंय, उद्या तुझा घमंड तुटेल, असे म्हणत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला."_ मुंबई :आज माझं घर तुटलंय, उद्या तुझा घमंड तुटेल, असे म्हणत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुंबई पोलिसांच्या सुरक्षेत कंगना घरी पोहोचली. मुंबईत येताच तिने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. या व्हिडिओत तिने उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे.  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धमकी दिल्याचा आरोप करत कंगनाने मुंबईचा अपमान केला होता. मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटू लागलेय, असे तिने म्हटले होते. शिवाय पोलिसांवरही अविश्वास दाखवल्याने तिच्यावर टिका झाली. राऊत यांनी कंगनाला मुंबईत येण्यास रोखले होते. परंतु, कंगनाने आपण ९ सप्टेंबरला मुंबईत येऊन दाखवू, असा निर्णय घेतला. त्यानुसार, ती आज हिमाचल प्रदेशमधून मुंबई विमानतळावर दाखल झाली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी कंगना विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी रिपाइंचे

MB NEWS:मातोश्री प्रतिष्ठान तर्फे कोविड सेंटर च्या कर्मचाऱ्यांना औषधांचे वितरण

इमेज
 मातोश्री प्रतिष्ठान तर्फे कोविड सेंटर च्या कर्मचाऱ्यांना औषधांचे वितरण परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि.९ - परळीत गेले दोन महिन्यांपासून कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मातोश्री सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने औषधांच्या किट चे वाटप करण्यात आले.प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव जगताप व मार्गदर्शक सतीश जगताप यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन केले गेले होते. गेल्या ६ महिन्यापासून परळीत कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे.शहरात सुरू असलेल्या कोविड सेंटरवर मोठ्या प्रमाणात कोरोना बधितांवर उपचार केले जात आहेत. यासाठी अंदाजे २० वर डॉक्टर, कर्मचारी वर्ग काम करत आहे.या कोरोना योद्ध्यांना कोरोना विरुद्ध लढण्यासाठी मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने विटामिन - डी आणि त्याच्यासोबत इतर औषध असलेले ४० कीटचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ.अर्शद शेख, डॉ.कृष्णा फड,राहुल फड,अश्विनी झांबरे,ज्योती हिरवे,विकी हिरवे यांच्यासह इत्यादी उपस्थित होते.मातोश्री प्रतिष्ठान नेहमीच असा मदतीचा हात देईन असे प्रतिपादन वैभव जगताप यांनी यावेळ

MB NEWS:रामकिशन दराडे यांचे दुःखद निधन:

इमेज
  रामकिशन दराडे यांचे दुःखद निधन: बाळासाहेब दराडे यांना पितृशोक  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील वंजारवाडीचे माजी सरपंच रामकिसन भाऊसाहेब दराडे यांचे दुःखद निधन झाले आहे. भाजपचे युवक नेते बाळासाहेब दराडे यांचे ते वडील होत.        वंजारवाडी (ता. परळी वैजनाथ) येथील रहिवासी, जुने जाणते कार्यकर्ते आणि माजी सरपंच रामकिसन दराडे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यातच त्यांची राहत्या घरी आज बुधवार दि. ९ सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजण्याचे सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय अंदाजे ७० वर्षे होते. भाजपचे युवक नेते बाळासाहेब दराडे यांचे ते वडील होत.       स्व. रामकिसन दराडे यांच्या पार्थिवावर आज सकाळी वंजारवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.       स्व. रामकिसन दराडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.  राख सावडण्याचा कार्यक्रम        दरम्यान स्व. रामकिसन दराडे यांचा राख सावडण्याचा कार्यक्रम उद्या शुक्रवारी सकाळी ७.३० होणार असल्याचे कुटुंबींयांनी सांगितले.

MB NEWS: *वाण धरणातून डाव्या व उजव्या कालव्यातून रोटेशन पद्धतीने शेतीसाठी पाणी द्या, खरीप पिकांचे नुकसान पंचनामे करा - परळीत शेतकरी संघटनेचे निवेदन*

इमेज
 *वाण धरणातून डाव्या व उजव्या कालव्यातून रोटेशन पद्धतीने शेतीसाठी पाणी द्या, खरीप पिकांचे नुकसान पंचनामे करा - परळीत शेतकरी संघटनेचे निवेदन* परळी वैजनाथ,प्रतिनिधी...    वाण धरणातून डाव्या व उजव्या कालव्यातून रोटेशन पद्धतीने शेतीसाठी पाणी द्या, खरीप पिकांचे नुकसान पंचनामे करा आदी मागण्यांचे निवेदन परळीत शेतकरी संघटनेने दिले आहे.       शेतकरी संघटनेच्या वतीने  परळी तहसीलदार  व कार्यकारी अंभियता माजलगाव पाटबंधारे विभाग  यांना  वाण धरणाचे पाणी डाव्या व ऊजव्या कालव्याव्दारे एक रोटेशन पाणी शेतीस देण्यात यावे म्हणून निवेदन  देण्यात  आले . या निवेदनावर शेतकरी संघटना युवा आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष कैलास सोळंके यांच्यासह नागोराव सोळंके, प्रभाकर सोळंके, पांडुरंग सातभाई, त्र्यंबक सोळंके,शाम कोळी, रविंद्र काकडे आदी शेतकऱ्यांची नावे आहेत.मागण्या मान्य कराव्या अन्यथा शेतकऱ्यांसह आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

MB NEWS:सुप्रीम कोर्टाची मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती*

इमेज
 *सुप्रीम कोर्टाची मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती* _मराठा आरक्षण नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी सध्या लागू करता येणार नाही. मात्र, अगोदर देण्यात आलेल्या पदव्युत्तर प्रवेशांमध्ये बदल करण्यात येऊ नये, असा महत्त्वाचा निर्णय न्यायालयानं दिला आहे._ नवी दिल्ली.....         नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असं सांगत न्यायालयानं आरक्षणाच्या अंमलबजावणीला तूर्तास स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर झालेल्या सुनावणीत न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे.         न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांच्या तीन सदस्यीय खंठपीठासमोर याचिकांवर सुनावणी सुरू होती. या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंठपीठासमोर घेण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूनं आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणीही करण्यात आली होती. न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे घेण्याच

MB NEWS: *विनामास्क फिरणारांवर चाप बसवण्यासाठी नगर परिषदेच्या धडाधड कारवाया !* *परळीत दंडवसुली जोरात; नागरिकांनी नियमांचे पालन करावे - प्रशासनाचे आवाहन*

इमेज
 *विनामास्क फिरणारांवर चाप बसवण्यासाठी नगर परिषदेच्या धडाधड कारवाया !* *परळीत दंडवसुली जोरात; नागरिकांनी नियमांचे पालन करावे - प्रशासनाचे आवाहन* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     कोविड संसर्गापासून बचाव करण्यासाठी व संसर्ग रोखण्यासाठी नियमांची पायमल्ली होणे घातक ठरत आहे.कोविडविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी परळी नगर परिषद काटेकोरपणे दंडात्मक कारवाई करत आहे.       विनामास्क फिरणारांवर चाप बसवण्यासाठी नगर परिषदेच्या धडाधड कारवाया सुरू करण्यात आलेल्या आहेत.परळीत दंडवसुली जोरात सुरू आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे प्रशासनाचे आवाहन आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी व नियमांचे पालन करावे असे आवाहन नगर परिषद प्र.मुख्याधिकारी बाबुराव रुपनर यांनी केले आहे.

MB NEWS:शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे सर्वंकष माहितीकोष तयार करावे

इमेज
 शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे सर्वंकष माहितीकोष तयार करावे बीड, दि,9 :- (जि.मा.का.)  राज्य शासनाच्या सेवेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष दरवर्षी अद्ययावत करण्यात येणार आहे. या माहितीकोषामध्ये नियमित आस्थापनेवरील व नियमित्तेतर आस्थापनेवरील कर्मचारी (कार्यव्ययी आस्थापनेवरील, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी इ.) तसेच तदर्थ तत्वावर नेमणूका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची माहिती 1 जुलै 2020 या संदर्भ दिनांकास अनुसरुन गोळा करण्यात येणार आहे. जिल्हयातील शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करण्याची कार्यवाही जिल्हा सांख्यिकी कार्यालय, (जिल्हा सांख्यिकी कार्यालय, पद्मजा बिल्डींग, सुभाष रोड, बीड फोन नं. 02442-222371) मार्फत करण्यात येणार आहे. सर्वकष माहितीकोष तयार करणेकरिता आवश्यक असणारी ऑनलाईन संगणकीय आज्ञावली महाराष्ट्र शासनाच्या www.mahasdb.maharashtra.gov.in या वेबसाईटवर User ID व Password दि. 1 सप्टेंबर 2020 ते दि. 15 सप्टेंबर 2020 या कालावधीत प्राप्त करुन घेणेसाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी या कार्यालयाशी तात्काळ संपर्

MB NEWS:पैठण ते पंढरपूर (पालखी मार्ग) भूसंपादनाबाबत आवाहन

इमेज
  पैठण ते पंढरपूर (पालखी मार्ग) भूसंपादनाबाबत आवाहन बीड, दि,9 :- (जि.मा.का.) शिरुर कासार तालुका व पाटोदा तालुका अंतर्गत सर्व जनतेस आवाहन केले आहे. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग क्र. 752/ई पैठण ते पंढरपूर (पालखी मार्ग) अंतर्गत शिरुर कासार तालुक्यातील 9 गावे व पाटोदा तालुक्यातील 7 गावातील जमीन संपादीत होत असून त्या करीता उपजिल्हाधिकारी भुसंपादन ल.पा.बीड हे सक्षम प्राधिकारी (CACL) आहेत. व कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद यांचे अधिनस्त सदर राष्ट्रीय महामार्ग आहे. सदर राष्ट्रीय महामार्ग 752/ई करीता शासन निर्णय दि. 12.05.2015, 30.09.2015  व 25.01.2017 नुसार थेट खरेदीने भुसंपादन प्रक्रिया प्रस्तावित आहे. सदर प्रक्रिया ही संपादित संघ म्हणून कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद यांच्या अंतर्गत व अधिनस्त आहे. या करिता कोणीही खाजगी व्यक्ती यांच्याशी संपर्क न करता काही अडचन किंवा तक्रार असल्यास कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद व (CACL) म्हणजेच उपजिल्हाधिकारी भुसं. ल.पा.बीड यांचे कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी (भूसं) ल.पा.

MB NEWS: *दै.परळी प्रहार वर्धापणदिन: वाचक, हितचिंतक व नागरीकांचा शुभेच्छांचा वर्षाव!* _भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी संपादक राजेश साबणे यांचा केला सत्कार_

इमेज
 *दै.परळी प्रहार वर्धापणदिन: वाचक, हितचिंतक व नागरीकांचा शुभेच्छांचा वर्षाव!* _भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी संपादक राजेश साबणे यांचा केला सत्कार_ परळी वैजनाथ,प्रतिनिधी....   दै.परळी प्रहार वर्धापणदिनानिमित्त वाचक, हितचिंतक व नागरीकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.विविध राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान ,भाजयुमोजिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी संपादक राजेश साबणे यांचा  सत्कार केला.यावेळी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष संभाजी मुंडे,प्रा..प्रविण फुटके, महादेव गित्ते, पैलवान मुरलीधर मुंडे, सातभाई, आदी उपस्थित होते.यावेळी निळकंठ चाटे यांनी संपादक राजेश साबणे यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी सदीच्छा व्यक्त केल्या .

MB NEWS:कंगनाचे ऑफिस पाडणे अनावश्यक होते; शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले*

इमेज
 *कंगनाचे ऑफिस पाडणे अनावश्यक होते; शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले* मुंबई, प्रतिनिधी... बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणौतचे कार्यालय अनधिकृत बांधकामामुळे मुंबई महापालिकेने हातोडा उगारला आहे. यामुळे शिवसेना आणि कंगना वाद आता आणखी चिघळला असून या कारवाईवर आता भाजपासह राष्ट्रवादीनेही प्रश्न उपस्थित केला आहे. शरद पवार यांनी सांगितले की, कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई अनावश्यक होती. तिला बोलण्यासाठी आता संधी दिली आहे. मुंबईमध्ये कित्येक अनधिकृत बांधकामे आहेत. आता अधिकाऱ्यांनी हा निर्णय का घेतला हे पहावे लागेल. प्रत्येकाला माहिती आहे की, मुंबई पोलीस सुरक्षेसाठी काम करते. यामुळे कंगना सारख्या लोकांना प्रसिद्धी देता नये, अशा शब्दांत पवार यांनी शिवसेनेचे कान टोचले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाआघाडीचे सरकार आहे. तर मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा ताबा आहे.  कंगना आज मुंबईत पोहोचण्याआधीच महापालिकेने तिच्या ऑफिसवर हातोडा मारायला सुरुवात केली होती. मुंबईची पीओकेशी तुलना करणे कंगना राणौतला भोवले. आज मुंबई महानगरपालिकेने कंगनाला जोरदार दणका देत, तिच्या मुंबईतील पाली हिल येथील

MB NEWS:कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईला उच्च न्यायालयाची स्थगिती; महापालिकेकडं मागितलं उत्तर* -----------------------------------

इमेज
  *कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईला उच्च न्यायालयाची स्थगिती; महापालिकेकडं मागितलं उत्तर* -----------------------------------  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धमकी दिल्याचा आरोप करताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यापासून अभिनेत्री कंगना रणौतवर टीकेची झोड उठली आहे. यासोबतच मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवल्यानेही मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर सोशल मीडियावर कंगनाला सेलिब्रेटींसह सर्वसामान्य मुंबईकरांनी कंगनाला ट्रोल केलं होतं. यावेळी कंगनाला काही जणांनी मुंबईत पुन्हा येऊ नको अशा धमक्याही देण्यात आल्या. त्यांच्या या धमक्यांना उत्तर देताना कंगनाने आपण मुंबईत येणार असून कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा असं आव्हानच दिलं होतं.

MB NEWS:धनंजय मुंडेंची कार्यअहवाल सादर करण्याची परंपरा अखंडपणे सुरूच!* *कोरोनावर मात केल्यानंतर जून ते ऑगस्ट या दरम्यानच्या कामकाजाचा लेखाजोखा खा. शरदचंद्र पवार व राज्यातील जनतेसमोर मांडला*

इमेज
 *धनंजय मुंडेंची कार्यअहवाल सादर करण्याची परंपरा अखंडपणे सुरूच!* *कोरोनावर मात केल्यानंतर जून ते ऑगस्ट या दरम्यानच्या कामकाजाचा लेखाजोखा खा. शरदचंद्र पवार व राज्यातील जनतेसमोर मांडला* मुंबई (दि. ०७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दरमहिन्याला सामाजिक न्याय विभाग, पालकमंत्री म्हणून बीड जिल्हा स्तरावर व परळी या त्यांच्या मतदारसंघात केलेले महत्वपूर्ण कामकाज, घेतलेले निर्णय व कोरोनाविषयक उपाययोजना आदींचा लेखाजोखा अहवाल स्वरूपात मांडण्याची सुरू केलेली परंपरा अखंडित ठेवली आहे.  आज (दि. ०७) रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांनी कोरोनावर मात केल्यानंतर जून ते ऑगस्ट २०२० या काळात केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा अहवाल स्वरूपात सादर केला आहे. हा कार्य अहवाल राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री तथा रा. कॉ. चे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, अन्य पक्षश्रेष्ठी यांनाही सादर केला जाणार असून, त्यांच्या कार्यालया