MB NEWS:*नंदनजचे उपसरपंच योगीराज गुट्टे यांचे निधन* *_धार्मिक क्षेत्रासह सर्व स्तरात मोठा जनसंपर्क असलेले व सर्व परिचित व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड_*

 *नंदनजचे उपसरपंच योगीराज गुट्टे यांचे निधन*

   *_धार्मिक क्षेत्रासह सर्व स्तरात मोठा जनसंपर्क असलेले व सर्व परिचित व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड_*


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      परळी तालुक्यातील सर्व परिचित असलेले  नंदनजचे उप सरपंच योगीराज गुट्टे यांचे मंगळवारी (दि.८) सायं.७ वा.सुमरास निधन झाले.धार्मिक क्षेत्रासह सर्व स्तरात मोठा जनसंपर्क असलेले व सर्व परिचित व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सर्व स्तरातून शोकभावना व्यक्त होत आहेत.

        राजकीय,सामाजिक क्षेत्रातील सक्रिय असलेले योगीराज गुट्टे यांचा धार्मिक क्षेत्रात मोठा वावर होता.केवळ परळी तालुक्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील विविध ठिकाणी त्यांची किर्तन भजन आदींना उपस्थिती असायची.वारकरी,भजनी मंडळ, किर्तनकार, प्रवचनकार महाराज मंडळी यांच्याशी त्यांचा दांडगा संपर्क होता.कोणत्याही धार्मिक कार्यक्रम व उपक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग होता.राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. परळी तालुक्यातील सर्वंकष जबाबदार व आदरणीय व्यक्तीमत्त्वांमधिल एक तारा त्यांच्या निधनाने निखळला आहे.

        दिवंगत योगीराज गुट्टे मृत्युसमयी सुमारे ५९ वर्ष वयाचे होते.त्यांच्या पश्चात तीन भाऊ,पत्नी,दोन मुले, एक मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्व स्तरात शोकभावना व्यक्त होत आहे.दिवंगत योगीराज गुट्टे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !