प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:*विविध योजनांचा लाभ मिळण्याकरिता बचत गटाचे कार्यालय मोलाची भूमिका निभावू शकते-संतोष शिंदे*

  *विविध योजनांचा लाभ मिळण्याकरिता बचत गटाचे कार्यालय मोलाची भूमिका निभावू शकते-संतोष शिंदे*


 परळी वैजनाथ,प्रतिनिधी....

     बचत गटांना मार्गदर्शन करणे तसेच विविध योजनांचा लाभ मिळण्याकरिता बचत गटाचे कार्यालय मोलाची भूमिका निभावू शकते असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केले.

      ना. धनंजय मुंडे हे मतदार संघातील महिला सक्षमीकरण करण्यासाठी आग्रही भूमिका घेतात.या अनुषंगाने महिलांनी स्वतःचा उद्योग सुरु करावा  यासाठी प्रोत्साहन व सहकार्य करण्याची भूमिका घेऊन संतोष शिंदे यांनी परळी वाडसावित्री येथील ग्रह उद्द्योग आणि बचत गट ला भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी सौ.सुलक्षणा वाघमारे  यांच्या पुढाकारातून वडसावित्री नगर भागात महिला गृहउद्योग बचत गटांच्या माध्यमातून कार्यालय सुरु करण्यात आले आहे .बचत गटांना मार्गदर्शन करणे तसेच विविध योजनांचा लाभ मिळण्याकरिता बचत गटाचे कार्यालय मोलाची भूमिका निभावू शकते.कोरोनाच्या प्रदूर्भाव असल्याने सध्या मास्क हा आपल्याला अविभाज्य घटक झालेला असल्याने बचत गटांना मास्कचेही उत्पादन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या बचतगटाला सर्वतोपरी सहकार्य करु अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या.याप्रसंगी बचतगटाच्या पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या