MB NEWS:पैठण ते पंढरपूर (पालखी मार्ग) भूसंपादनाबाबत आवाहन

 

पैठण ते पंढरपूर (पालखी मार्ग) भूसंपादनाबाबत आवाहन



बीड, दि,9 :- (जि.मा.का.) शिरुर कासार तालुका व पाटोदा तालुका अंतर्गत सर्व जनतेस आवाहन केले आहे. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग क्र. 752/ई पैठण ते पंढरपूर (पालखी मार्ग) अंतर्गत शिरुर कासार तालुक्यातील 9 गावे व पाटोदा तालुक्यातील 7 गावातील जमीन संपादीत होत असून त्या करीता उपजिल्हाधिकारी भुसंपादन ल.पा.बीड हे सक्षम प्राधिकारी (CACL) आहेत. व कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद यांचे अधिनस्त सदर राष्ट्रीय महामार्ग आहे.

सदर राष्ट्रीय महामार्ग 752/ई करीता शासन निर्णय दि. 12.05.2015, 30.09.2015  व 25.01.2017 नुसार थेट खरेदीने भुसंपादन प्रक्रिया प्रस्तावित आहे. सदर प्रक्रिया ही संपादित संघ म्हणून कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद यांच्या अंतर्गत व अधिनस्त आहे. या करिता कोणीही खाजगी व्यक्ती यांच्याशी संपर्क न करता काही अडचन किंवा तक्रार असल्यास कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद व (CACL) म्हणजेच उपजिल्हाधिकारी भुसं. ल.पा.बीड यांचे कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी (भूसं) ल.पा. बीड यांनी केले आहे.

*-*-*-*-*-*-*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला