MB NEWS:परळीत वा-यासह झाला पाऊस ; शहरातील वीज गुल ! जोरदार वार्यामुळे वीज वाहिन्या तुटल्या ; दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर सुरू:लाईट लवकर येण्याचा भरोसा नाही

 परळीत  वा-यासह झाला पाऊस ; शहरातील वीज गुल !

जोरदार वार्यामुळे वीज वाहिन्या तुटल्या ; दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर सुरू:लाईट लवकर येण्याचा भरोसा नाही




परळी वै….

परळी तालुक्यात  पावसाने आज जोरदार हजेरी लावली आहे.  सोसाट्याच्या वार्यामुळे वीजवाहक तारा अनेक ठिकाणी तुटून पडल्या आहेत.त्यामुळे शहरात  वीज गायब झाली आहे. वीजपुरवठा सुरळीत चालू करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू असल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.परंतु शहरातील वीज पुरवठा कधी सुरू होईल याची निश्चित वेळ नाही.

           आज सायंकाळी सात वा. सुमारास अचानक वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली. पावसाने समाधान दिले मात्र खंडीत वीज पुरवठयाने नागरिकांची चांगलीच तगमग झाली.डाबी येथील सब स्टेशन मध्ये बिघाड झाला.  हा बिघाड  दुरुस्त केल्यानंतर त् परळी शहरातील  बिघाड शोधून तो दुरुस्त केल्यानंतर लाईट येणार आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार