इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS:पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करा* *एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

 *पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करा* 

*एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी* 



मुंबई : माथेरानचे पत्रकार संतोष पवार यांचा मृत्यू सरकारी यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झालेला असल्याने त्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाव्दारे केली आहे.. संतोष पवार यांच्या कुटुंबियांना सरकारने पन्नास लाख रूपयांची मदत करावी अशी मागणी देखील देशमुख यांनी केली आहे..

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 

संतोष पवार यांना सकाळी श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना कर्जत येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.. मात्र तेथे व्हेंटिलेटर नसल्याने त्यांना डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये नेण्याचे ठरले. 108 क्रमांकांच्या अ‍ॅम्ब्युलन्समधून त्यांना घेऊन जात असताना ऑक्सिजन संपला, मात्र नवीन सिलेंडर स्टाफला लावता आले नाही आणि संतोष पवार यांचं निधन झाले.. केवळ सरकारी यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे त्यांचं निधन झाल्याने या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार व्यक्तींना कठोर शासन व्हावं अशी मागणी करण्यात आली आहे..

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील कार्यक्रमात बोलताना कोरोनानं निधन झालेल्या पत्रकारास पन्नास लाख रूपयांची मदतीची घोषणा केली होती.. त्यानुसार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना देखील पन्नास लाख रूपयांची मदत मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे..

३१ जुलै नंतर राज्यात कोरोनानं १४ पत्रकारांचं निधन झालं आहे, २५ पेक्षा जास्त पत्रकारांवर उपचार सुरू आहेत आणि 250 पेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाची बाधा झालेली आहे.. ही संख्या सातत्यानं वाढत असल्याने सरकारने पत्रकारांच्या उपचाराची विशेष व्यवस्था करावी अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे..

निवेदनावर विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी आदिंच्या स्वाक्षरया आहेत...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट