पोस्ट्स

MB NEWS:अंबाजोगाई स्वाराती मधील 90 पैकी 27 अहवाल पॉझिटिव्ह तर गेल्या चोवीस तासात एका रुग्णाचा मृत्यू

इमेज
  अंबाजोगाई स्वाराती मधील 90 पैकी 27 अहवाल पॉझिटिव्ह तर गेल्या चोवीस तासात एका रुग्णाचा मृत्यू  अंबाजोगाई ,प्रतिनिधी..      स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई येथे गेल्या चोवीस तासात दाखल झालेल्या रुग्णांचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 29 रोजी मध्यरात्री बारा पर्यंत प्राप्त झालेल्या अहवालाची संख्या 90  इतकी आहे. तर स्वाराती मध्ये घेण्यात आलेल्या 90 पैकी 27 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 63 अहवाल निगेटिव्ह आले आहेत पैकी एका 45 वर्षीय परळी तालुक्यातील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. स्वाराती मधील गेल्या 24 तासात कोरणा रुग्णांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे :एकूण भरती झालेल्या रुग्णांची संख्या 145, गंभीर रुग्णांची संख्या 25, सामान्य ते मध्यम स्थिती रुग्णसंख्या 84 ,निगेटिव्ह रुग्णसंख्या अठरा, संशयित रुग्ण संख्या 18 आहे. आज पर्यंत या रुग्णालयात एकूण 12 7 17 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे .त्यापैकी 33 48 रुग्णांची कोविड चाचणी करण्यात आली पैकी 669 अहवाल  पॉझिटिव्ह आले तर 26 79 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.

MB NEWS:युसुफ वडगाव येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र वाघमारे यांचा कोरोनाने मृत्यू

इमेज
  युसुफ वडगाव येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र वाघमारे यांचा कोरोनाने मृत्यू ------------------------------------------------ केज प्रतिनिधी. :- केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र वाघमारे वय ५४ वर्ष यांचा आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी दुपारी २:०० वाजता कोरोना विषाणू विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्व त्यांचे पोलीस कर्मचारी आणि नागरिकात हळहळ व्यक्त होत आहे. बीड पोलीस परिवाराच्या वतीने या कोविड यौद्ध्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

MB NEWS:सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी शेतकऱ्याला 50 हजार रुपये हेक्टरी तात्काळ नुकसानभरपाई द्या- वसंत मुंडे

इमेज
  सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी शेतकऱ्याला 50 हजार रुपये हेक्टरी तात्काळ नुकसानभरपाई द्या- वसंत मुंडे     परळी(प्रतिनिधी) महाराष्ट्रात खरीप पेरणीला शेतकऱ्यांनी सोयाबीनची  बियाणे  अनेक कंपनीचे खरेदी करून पेरणी केली .यामध्ये 90% कंपनीची निकृष्ट बियाणे  निघाल्याचा  आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी शासनाकडे केला होता. त्यावर  तात्काळ लाखो शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे अर्ज केले. त्यामुळे शासनाला  सोयाबीन बियाणे निकृष्ट संदर्भात शेतकऱ्याच्या शेतात जाऊन सोयाबीन उगवले नाही यासंदर्भात  पंचनामे करण्यासाठी स्वतः कृषी विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले.  त्यावेळेस शासनाच्या लक्षात आले की अनेक कंपन्यांनी सोयाबीन बियाणे मध्ये निकृष्ट दर्जाचे पुरवल्यामुळे उगवण झाली नाही त्यावेळेस अनेक शेतकऱ्यांनी अनेक कंपन्या वर स्वतः गुन्हे नोंद करण्याची मागणी केली व स्वतः शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले . त्यानंतर  राज्यात 11 कंपन्यांवर 83 गुन्हे दाखल झाले व त्यांचे परवाने  रद्द केले   पण  कायमस्वरूपी  या बोगस कंपनीला  शासनाने  कायदेशीर कारवाई

MB NEWS:ग्रामीण पोलिसांची वाहतुक करणार्या राखेच्या अवैध वाहनांवर दंडात्मक कारवाई

इमेज
ग्रामीण पोलिसांची  वाहतुक करणार्या राखेच्या  अवैध  वाहनांवर दंडात्मक कारवाई  परळी (प्रतिनीधी)   राखेची  वाहतुक करणार्या  वाहनांवर परळी ग्रामीण पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.औष्णीक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणारी  राख वाहतुक सर्रासपणे होत असताना कुठलीच कारवाई होत नव्हती.परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पो.नि. शिवलाल पुरभे यांच्या आदेशानुसार  हरिदास गित्ते,शिवाजी गोपाळघरे, शहानिक गित्ते,विष्णु घुगे आदी कर्मचार्यांनी दुपारपासुन परळी शहरात येत असलेल्या राखेची अवैध  वाहतुक करणार्या टिप्परची तपासणी करत व ज्यांच्याकडे राख वाहतुकीचा परळी औ.वि.केंद्राकडून आलेला परवाना नसेल अशा टिप्परवर दंडात्मक कारवाई केली. 

MB NEWS:जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील प्रलंबित प्रकरणे एक महिन्याच्या आत निकाली काढा - धनंजय मुंडे यांचे निर्देश

इमेज
 * जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील प्रलंबित प्रकरणे एक महिन्याच्या आत निकाली काढा - धनंजय मुंडे यांचे निर्देश* *अंतरिम ऑनलाईन कार्यप्रणालीच्या ६ महिन्याच्या कामकाजाचा घेतला समग्र आढावा*  मुंबई (दि. २९) ---- : जात प्रमाणपत्र पडताळणी अंतरिम ऑनलाईन प्रक्रिया नागरिकांचा वेळ व चकरा वाचविण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. जिल्हा निहाय आकडेवारी पाहिली असता जवळपास ३५ हजारच्या वर प्रकरणे प्रलंबित आहेत. ही सर्व प्रकरणे एक महिन्याच्या आत निकाली काढण्याचे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व जिल्ह्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया वेब पोर्टलच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन पद्धतीने कार्यरत असून, या प्रक्रियेच्या ६ महिन्यांच्या कामकाजाचा आढावा आज ना. मुंडे यांनी घेतला. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव श्याम तागडे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मजित गजभिये तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे प्रमुख अधिकारी ऑनलाईन वेबिनार

MB NEWS: दु:खद वार्ता-लोणीच्या श्री.सखाराम महाराज संस्थानचे मठाधिपती परम पूज्य नाना महाराज यांना देवाज्ञा !

इमेज
  लोणीच्या श्री.सखाराम महाराज संस्थानचे मठाधिपती परम पूज्य नाना महाराज यांना देवाज्ञा ! वाशीम..... मेहकर पासून 50 किमी अंतरावर असलेल्या वाशीम जिल्ह्यातील लोणी येथील श्री.सखाराम महाराज संस्थानचे मठाधिपती परम पूज्य नाना महाराज जोशी यांचे आज सकाळी आठ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने लोणी येथे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.  प.पू.  नाना महाराज उर्फ रामकृष्ण गोविंदराव जोशी हे 1962 पासून श्री सखाराम महाराज संस्थानचे मठाधिपती होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी तसेच मोठा परिवार आहे. श्री सखाराम महाराज संस्थानची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात असून दरवर्षी लोणी येथे कार्तिक वद्य अमावास्येला सखाराम महाराज पूण्यतिथी निमित्ताने मोठी यात्रा भरते. तर या घटनेनंतर आज दुपारी साडे बारा वाजता परम पूज्य नाना महाराज यांच्या भावजई श्रीमती सविता बाळकृष्ण जोशी (वय 69) यांचे ही लोणी येथेच दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

MB NEWS:कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी बबनभाऊ गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त सलग 14 दिवस राबविण्यात आली निर्जुतीकरण मोहिम*

इमेज
 * कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी बबनभाऊ गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त सलग 14 दिवस राबविण्यात आली निर्जुतीकरण मोहिम* *परळी (प्रतिनिधी)* जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहर आणि तालुक्यात सुरू झालेली निर्जुंतीकरण (जंतुनाशक) फवारणी सलग 14 दिवस चालली असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या माध्यमातून कोरोना योद्धा होत अनेक गाव व शहराच्या काना कोपऱ्यात फवारणीच्या माध्यमातून कोरोनाला अटकाव घालण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांना सहकार्य केले आहे. वाढदिवसानिमित्त नेहमीच आगळे वेगळे उपक्रम राबविण्याची व जनतेला सहकार्य होईल असे काम करण्याची चांगली परंपरा जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते यांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जपली आहे. 5 सप्टेंबरला बबनभाऊ गित्ते यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केल्यानंतर परळी शहर आणि तालुक्यातील सुमारे 50 पेक्षा अधिक गावात सार्वजनिक स्थळी जनक्रांती सेनेच्या वतिने निर्जुंतीकरण मोहीम राबविण्यात आली. ट्रॅक्टर किंवा मिळेल त्या वाहनाच्या माध्यमातून जनक्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात निर्जुतुकीक

MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.२९ दुपारी १२ वाजता प्राप्त अहवाल....

इमेज
  बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.२९ दुपारी १२ वाजता प्राप्त अहवाल.... जिल्ह्यात तब्बल १४६ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. ८९२ अहवाल प्राप्त झाले. परळीत ०७ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. जिल्ह्यात ७४६ रिपोर्ट निगेटिव्ह. ------------------

MB NEWS: *स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कारवाई करा - धनंजय मुंडे*

इमेज
 *स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कारवाई करा - धनंजय मुंडे* *ऊसतोड कामगारांची नोंदणी व अन्य प्रक्रिया येत्या काही दिवसातच सुरू करण्याचे निर्देश* *राज्य शासन स्तरावर बैठका व हालचालींना वेग!* मुंबई (दि. २९) ---- : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची रचना, घटना इत्यादी आकृतिबंध तयार करून महामंडळ कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कारवाई करावी. प्राथमिक स्तरावर ऊसतोड कामगारांची नोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणीची प्रक्रिया येत्या काही दिवसातच सुरू करण्यात यावी यासाठी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंबंधीची महत्वपूर्ण बैठक ना. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाली. या बैठकीस आ. संजय दौंड, सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव श्याम तागडे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टी चे महासंचालक धम्मजित गजभिये, ग्रामविकास विभागाचे उपसचिव श्री. जोशी, कामगार विभागाचे उपसचिव, सहकार विभागाचे उपसचिव श्री. घाडगे, साख

MB NEWS: स्पाॅट न्युज-धर्मापुरी फाट्यावर भिषण अपघात; मोटारसायकलस्वार जागेवर ठार

इमेज
धर्मापुरी फाट्यावर भिषण अपघात; मोटारसायकलस्वार जागेवर ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी   धर्मापुरी फाट्यावर भिषण अपघात झाला असुन मोटारसायकलस्वार जागेवर ठार झाल्याची घटना आत्ता ६.५० वा.घडली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. धर्मापुरी फाट्याजवळ एक मोटारसायकल स्वार जात असताना गाडी स्लिप झाली आणि खाली पडला व पाठीमागून येणाऱ्या एका मोठ्या वाहनाची धडक बसली.या भिषण आपघातात मोटारसायकल स्वार जागीच गतप्राण झाला. मयत नांदेड चा असल्याचे प्रथमदर्शनी समजते.ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचुन वाहतूक पुर्ववत केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

MB NEWS:केज पोलीसांची अकरा हातभट्ट्यावर धाडसी कार्यवाही !

इमेज
  केज पोलीसांची अकरा हातभट्ट्यावर धाडसी कार्यवाही ! ----------------------------------------------- केज प्रतिनिधी. :- केज पोलीस स्टेशन हद्दीत धाडसी कार्यवाही करीत बाराशे लिटर गावठी दारू तयार करण्याचे रसायन नष्ट करून देशी दारू असा सुमारे ४० हजार रू. चा मुद्देमाल ताब्यात घेतला. या बाबतची माहिती अशी की दि. २७ सप्टेंबर रोजी पोलिस स्टेशन हद्दतील बोरगाव, नांदूरघाट, हनुमंत पिंप्री, डोणगाव, येवता व केज या ठिकाणी कार्यवाही करून १२२० लिटर दारू बनविण्याचे रसायन, १११ दारू बॉटल्स आणि १७ लिटर हातभट्टीची तयार दारू असा एकूण ४० हजार ४४८ रु. मुद्देमाल ताब्यात घेत दारू बनविण्याचे रसायन नष्ट केले.  या प्रकरणी मुंबई दारू बंदी कायद्याचे कलम ६५ ई नुसार कल्याण बापु शिंदे, रुक्मीणबाई बापु शिंदे आणि सुबराव मोतीराम पवार रा. बोरगांव तसेच बालाबाई बबन शिंदे, निलाबाई पोपट शिंदे रा.नांदुरघाट त्याच प्रमाणे सुग्रीव रुपला शिंदे, राजेंद्र लाला शिंदे रा.हनुमंत पिंपरी आणि शारुबाई शिवाजी काळे, उषाबाई भिमा काळे रा. डोणगांव व विकास लिंबाजी निर्मळ रा.येवता आणि रंजना राहुल शिंदे रा.फुलेनगर केज यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले

MB NEWS:आयपीएलवर सट्टा लावणारे पाच जण जेरबंद १ लाख ७६ हजाराचा माल केला जप्त

इमेज
  आयपीएलवर सट्टा लावणारे पाच जण जेरबंद १ लाख ७६ हजाराचा माल केला जप्त परळी ()- सध्या आयपीएल टुर्नामेंट सुरू असून त्यावर काही जण सट्टा लावतात. खंडोबा मंदिर परिसरामध्ये सट्टा सुरू असल्याची माहिती संभाजीनगर पोलिसांना झाल्यानंतर रात्री अकरा वाजता त्या ठिकाणी धाड टाकून पाच जणांना अटक करण्यात आली. या लोकांकडून १ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.     गेल्या काही दिवसांपासून आयपीएल टुर्नामेंट सुरू आहे. आयपीएलच्या सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. खंडोबा मंदिर परिसराच्या बाजुला आयपीएलवर सट्टा लावला जात असल्याची माहिती संभाजीनगर पोलिसांना झाल्यानंतर रात्री अकरा वाजता पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली. या वेळी चार जणांना अटक करण्यात आली. या जुगार्‍यांकडून १ लाख ७६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई बाळासाहेब पवार, चांद मेंडके, भताने, ऐटवाड, सानप, दुर्गे यांनी केली. 

MB NEWS:खाजगी डॉक्टरांकडुन होणारी कोरोना रुग्णांची हेळसांड थांबवा - सलीम अध्यक्ष

इमेज
  खाजगी डॉक्टरांकडुन होणारी कोरोना रुग्णांची हेळसांड थांबवा - सलीम अध्यक्ष        (बीड) प्रतिनिधी : राज्यभरात वाढत चाललेली कोराना रुग्ण संख्या अत्यंत चिंताजनक असून, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने चांगले उपचार दिले जात असतानाच अधिगृहित करण्यात आलेल्या खाजगी डॉक्टर व रुग्णालयाकडून मात्र कोराना बाधीतांच्या उपचारासाठी निर्धारित करण्यात आलेल्या दरपत्राका एैवजी अत्यंत मनमानीप्रमाणे शुल्क आकारणी होत असून ॲडव्हान्स म्हणून लाख ते दिड लाख्‍ रुपये जमा करण्याची सूचना चक्क फलक लावून केली जात आहे. सलीम अध्यक्ष युवा मंच संस्थापक अध्यक्ष सलीम शेख यांनी रुग्णा विषयी होणारी आडवनूक व आकारण्यात येणारे चुकीचे शुल्क याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.            राज्य भरात कोरोना बाधीत रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी बेड्स अनेक ठिकाणी कमी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यभरातील खाजगी दवाखाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अधिगृहित केले आहेत. परंतु अनेक ठिकाण कोरोना बाधीतांवरल उपचारासाठी देण्यात आलेल्या शासन मान्य दरानुसार रउपचार होतांना दिसुन येत नाही. क

MB NEWS:पंढरपूर ब्रेकिंग...भागवतार्च वा.ना. उत्पात यांचे निधन..

इमेज
  भागवतार्च वा.ना. उत्पात यांचे  निधन. पंढरपूर.... माजी नगराध्यक्ष , मंदिर समिती सदस्य वासुदेव नारायण उत्पात यांचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन.समस्त उत्पात समाजाचे चेअरमन  , सावरकर भक्त म्हणून त्यांची ओळख.    भागवताचार्य वा ना उत्पात (वय ८०) यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. ते पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष होते. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर माजी सदस्य होते. समस्त उत्पात समाजाचे नेतृत्व म्हणून ते वारकरी संप्रदायात परिचित होते.  वासुदेव नारायण तथा वा. ना. उत्पात यांनी कवठेकर आणि द. ह. कवठेकर प्रशालेत शिक्षक म्हणून अनेक वर्षे काम केले. कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते. पंढरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद तसेच श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली. ते कट्टर सावरकर भक्त म्हणून ओळखले जात असत. स्व. अनंतराव आठवले तथा स्वामी वरदानंद भारती यांचा त्यांना अनेक वर्षे सहवास लाभला.  स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही त्यांनी भूषवले होते. पंढरपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाची त्यांनी स्थापना केली.

MB NEWS:आरपीआय (एकतावादी) चे अनुसूचित जाती-जमातीच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन (Video news)

इमेज
  आरपीआय (एकतावादी) चे अनुसूचित जाती-जमातीच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन  परळी (प्रतिनिधी) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या जिल्हा कमिटी च्या वतीने व बीड जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली परळी उपजिल्हा कार्यालयाच्या प्रांगणात दि.२८ सप्टेंबर रोजी खेड्या-पाड्यातून आलेले असंख्य रिपाइं चेकार्यकर्ते तसेच इतर समाज बांधव हातात निळे ध्वज घेऊन घोषणा देत सारा परिसर दणाणून गेला होता. यावेळी, सन १९६८ पासून आजपर्यंत कसत असलेल्या जमिनी नावे करून मिळाव्यात, रमाई घरकुलाची ग्रा.पं. ठरावाची अट रद्द करावी, ऊसतोड मजुरांना ४०० रुपये हमीभाव देण्यात यावा, भोगवट्याच्या जमिनी नावे करण्यात याव्या, वाद्य कलाकारांना मानधन देण्यात यावे, रमाई घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करावा, मागासवर्गीयांना गाव तेथे स्मशानभूमी देण्यात यावी, पानशेन्द्रा येथील धर्मांध जातीवाद्यांना फाशीची शिक्षा द्यावी, ऍट्रॉसिटी विरोधात दरोड्याचे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर कार्यवाहीक करण्यात यावी, अशा विविध अनुसूचित जाती-जमातीच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान मोदी सरकारच्या अन्यायकारक नवीन शेतकरी विधेयक आणि कामग

MB NEWS:बीड जिल्ह्यात ८३९७ हे.क्षेत्र बाधित; मराठवाड्याततीन लाख २८ हजार १५० हेक्टर पिकांचे नुकसान; नुकसानभरपाई ची प्रतिक्षा

इमेज
बीड जिल्ह्यात ८३९७ हे.क्षेत्र बाधित; मराठवाड्याततीन लाख २८ हजार १५० हेक्टर पिकांचे नुकसान; नुकसानभरपाई ची प्रतिक्षा औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा अतिवृष्टीमुळे विभागातील प्राथमिक पाहणीअंती जिरायत, बागायत व फळपिके असे तीन लाख २८ हजार १५० हेक्टर पिकांचे (३३ टक्क्यांपेक्षा अधिक) नुकसान झाले. सर्वाधिक तीन लाख २० हजार ९२६ हेक्टर पिकांची नासाडी औरंगाबाद विभागात झाली आहे, तर लातूर विभागामध्ये सात हजार २३४.९ हेक्टर पिके पावसामुळे वाया गेले आहेत. यंदा औरंगाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक १७३.३ टक्के पाऊस झाला आहे. त्या पाठोपाठ जालना जिल्ह्यातही दीडशे टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. लातूरच्या तुलनेत औरंगाबाद विभागात पाऊसही अधिक झाल्यामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. विभगातील १८९६ बाधित गावांमधील ४ लाख ९८ हजार ५७३ शेतकऱ्यांचा खरीप पावसाने बुडवला, तर लातूर जिल्ह्यातील दोन गावांमधील १४ हजार ८६४ शेतकऱ्यांना नुकसान झाले. अद्याप विभागात पंचनामे सुरूच असून अद्याप पावसाचे दोन आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे येत्या कालावधीत अधिक पाऊस झाला तर नुकसानीच्या हेक्टरमध्ये भर पडू शकते. आतापर्य

MB NEWS:शिवव्याख्याते ज्ञानेश्वर सोळंके यांची महाराष्ट्र वकृत्व परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी निवड

इमेज
  शिवव्याख्याते ज्ञानेश्वर सोळंके यांची महाराष्ट्र वकृत्व परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी निवड दिंद्रुड प्रतिनिधी माजलगाव तालुक्यातील नाखलगाव येथील ज्ञानेश्वर भागवतराव सोळंके यांची महाराष्ट्र वकृत्व परिषदेच्या मराठवाडा विभाग उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष प्राचार्य शिवराज आनंदकर यांनी ज्ञानेश्वर सोळंके यांच्या निवडीचे प्रमाणपत्र नुकतेच दिले असून नाकलगाव सह परिसरातील सांप्रदायिक, अध्यात्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील जनतेने सोळंके यांचे अभिनंदन केले आहे.    ज्ञानेश्वर भागवतराव सोळंके हे बाल व्याख्याते म्हणून बीड जिल्ह्यात सुप्रसिद्ध आहेत. किर्तन, प्रवचन, शिव व्याख्यान आदी कलांमध्ये पारंगत असलेले सोळंके हे वयाच्या पाचव्या वर्षापासून अध्यात्मिक क्षेत्रात काम करतात. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनपटावर बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात शिव व्याख्यान देत ज्ञानेश्वर सोळंके यांनी मोठा चाहतावर्ग उभा केला आहे.

MB NEWS:सोयाबीनची निकृष्ट बियाणे; ११ कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

इमेज
  * ⭕सोयाबीनची निकृष्ट बियाणे; ११ कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द*                      -----------------------------------      पुणे : सोयाबीनच्या निकृष्ट बियाणांचा पुरवठा केल्यावरून कृषी आयुक्त कार्यालयाने राज्यातील ११ बियाणे कंपन्यांचा विक्री परवाना कायमचा रद्द केला. राज्यात १ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी बियाणांबाबत तक्रार केली. ७७ तक्रारींच्या सुनावणीनंतर ही कारवाई झाली असून आणखी ४१ तक्रारींची सुनावणी लवकर होणार आहे, अशी माहिती कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिली.    खरीप हंगामासाठी कंपन्यांनी शेतकऱ्यांना या बियाणांचा पुरवठा केला होता. त्याची उगवणच झाली नाही. त्यामुळे काही शेतकºयांनी तक्रारी केल्या. त्याची दखल घेत कृषी आयुक्त कार्यालयाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाने बियाणांची तपासणी केली. त्यात बियाणांमध्ये कमतरता आढळली. त्यामुळे तक्रारदार शेतकºयांच्या शेतातील बियाणांचा पंचनामा करून त्या कंपन्यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात येत आहे. निकृष्ट बियाणांमुळे राज्यातील सोयाबीनच्या ४३ लाख हेक्टरपैकी २० टक्के क्षेत्र बाधित होणार आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, अहमदनगर जिल्हे तसेच अन्य

MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.२८ दुपारी १२.३० वाजता प्राप्त अहवाल....

इमेज
  बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.२८ दुपारी १२.३० वाजता प्राप्त अहवाल.... जिल्ह्यात तब्बल १७१ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. ८९५अहवाल प्राप्त झाले. परळीत १४ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. जिल्ह्यात ७२४ रिपोर्ट निगेटिव्ह. ------------------

MB NEWS:तुळजापूरचा नवरात्रोत्सव रद्द करण्याचा मंदिर संस्थानचा निर्णय*

इमेज
 *⭕ तुळजापूरचा नवरात्रोत्सव रद्द करण्याचा मंदिर संस्थानचा निर्णय*                                        -----------------------------------       तुळजापूर..... कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं तुळजापुरातला चैत्री पौर्णिमा यात्रेपाठोपाठ नवरात्र महोत्सवही रद्द करण्यात आला आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थानच्या बैठकीत हा निर्णय घेतला. यामुळे पुजारी वर्गासोबतच तुळजापूर शहरातील व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या 6 महिन्यापासून तुळजाभवानी मंदिर बंद असल्याने अर्थिक अडचणीत सापडलेल्या शहरवासियांना मंदिर उघडण्याचे वेध लागले होते. जागतिक महामारी कोरोनाचा फटका तुळजाभवानी मातेच्या वर्षातील सर्वात मोठा उत्सव शारदीय नवरात्र महोत्सवाला बसला आहे. गर्दी टाळण्यासाठी नवरात्र महोत्सव कालावधीत भाविकांना शहराबाहेरच अडविण्यात येणार आहे. कोरोनाचा पहिला फटका चैत्र पौर्णिमेला बसला होता. त्यानंतर उन्हाळा सुट्टी, लग्नसराई या कालावधीत मंदिर बंद असल्याने पुजारी, व्यावसायिकांचे आर्थिक नियोजन कोलमडले. सर्वांच्या आशा आगामी नवरात्र महोत्सवावर होत्या. मात्र, नवरात्र महोत्सवही भाविकांशिवाय होणार

MB NEWS:*IPL 2020: राजस्थानचा ‘रॉयल’ कारभार! पंजाबवर रोमहर्षक विजय*

इमेज
  *IPL 2020: राजस्थानचा ‘रॉयल’ कारभार! पंजाबवर रोमहर्षक विजय* पंजाबविरूद्धच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण राजस्थानचा पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय पूर्णपणे फसला.पण राजस्थानचा पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय पूर्णपणे फसला. मयंक अग्रवालचं धमाकेदार शतक आणि लोकेश राहुलचं अर्धशतक यांच्या बळावर पंजाबने २० षटकात २ बाद २२३ धावा ठोकल्या आणि राजस्थानला विजयासाठी डोंगराएवढं आव्हान दिलं. पंजाबकडून मयंक अग्रवाल आणि राहुल सलामीला आले. त्यांनी सुरूवातीपासूनच फटकेबाजीला सुरूवात केली. आठव्या षटकात या दोघांनी पंजाबला शतकी मजल मारून दिली. त्यानंतर आधी मयंक आणि मग राहुलने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर फटकेबाजी डोस वाढवत दोघांनी प्रत्येक चेंडू सीमापार पाठवण्याचा चंगच बांधल. मयंक अग्रवालने आपल्या IPL कारकिर्दीतील पहिलंवहिलं शतक ठोकलं. त्याने सामन्यात ५० चेंडूत १०६ धावांची खेळी केली. त्यात १० चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. मयंक बाद झाल्यावर मॅक्सवेल आणि राहुलने फटकेबाजी सुरूच ठेवली. राहुल हवेत फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाला. त्याने ५

MB NEWS:सहशिक्षक अनंत देशमुख यांचे निधन •कुटुंबाचा आधारवड हरपला

इमेज
सहशिक्षक अनंत देशमुख यांचे निधन                   •कुटुंबाचा आधारवड हरपला परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : न्यू हायस्कूल थर्मल परळी येथील सहशिक्षक अनंत बालासाहेब देशमुख (मोहेकर) यांचे  दि.२६ सप्टेंबर रोजी निधन झाले. मृत्यू समयी वय ४५ वर्ष होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई व भाऊ असा भरगच परिवार आहे. अनंत बालासाहेब देशमुख (मोहेकर) हे कोविड १९ साठी पंचायत समिती परळी येथे आरोग्य विभागात कर्तव्य बजावत असताना दि.१२.९.२० रोजी कोरोना बाधित आढळल्याने अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारासाठी ऍडमिट झाले व उपचार सुरू असतानाच दि.२६.९.२० शनिवार रोजी संध्याकाळी ८.०० च्या दरम्यान दुःखद निधन झाले. परिवारातील जबाबदार अशा सरांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा अक्षरशः डोंगर कोसळला आहे. या दुःखात राष्ट्रवादी शिक्षक संघटना सहभागी आहे. कर्तव्य बजावत असताना करोनाची बाधा झाल्यामुळे शिक्षण विभाग व शासनाने याची दखल घेऊन योग्य ती मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

MB NEWS:तारुगव्हाण जवळील गोदावरी नदीवरील पूलावर बघ्यांची गर्दी! भरलेल्या नदीच्या पाण्यासह अनेकांचे फोटोसेशन

इमेज
  तारुगव्हाण जवळील गोदावरी नदीवरील पूलावर बघ्यांची गर्दी! भरलेल्या नदीच्या पाण्यासह अनेकांचे फोटोसेशन पाथरी ःतालुक्यातील तारूगव्हाण जवळील येथील गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध झाला असून त्यामुळे हा महत्वाकांक्षी बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. या बंधार्‍यातील व गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी पाहण्याकरिता मोठ्या प्रमाणावर नागरिक सहकुटूंब गर्दी करीत आहेत. हा तारूगव्हाण बंधारा देखील आता सेल्फी पॉईंट ठरला आहे. जायकवाडी व माजलगाव प्रकल्पातून सोडलेल्या पाण्याने गोदावरी नदीस मोठा पूर आला आहे. रविवारी (दि.27) सकाळी नदीतील पाणी पातळीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शनिवारी दुपारपासून नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढू लागली. रविवारी तर पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली. प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. विशेषतः नदीकाठावरील नागरिकांना सतर्क केले. दरम्यान, मागील आठवड्यातही गोदावरीचे पात्र तुडुंब भरले होते

MB NEWS:फडणवीस-राऊत भेटीनंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये तातडीची बैठक* -----------------------------------

इमेज
 *🛑 फडणवीस-राऊत भेटीनंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये तातडीची बैठक*  -----------------------------------  मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची ग्रँड हयात हॉटेलमध्ये शनिवारी तब्बल २ तास भेट झाली, या भेटीची माहिती सुरुवातीला लपवण्यात आली, परंतु माध्यमांनी याबाबत वृत्त दाखवल्यानंतर संजय राऊत आणि भाजपानेही ही भेट झाल्याचं कबूल केले, परंतु या भेटीमुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. फडणवीस आणि राऊत भेटीमुळे राज्यात शिवसेना-भाजपा पुन्हा जवळ येणार का? अशी चर्चा सुरु झाली. या संपूर्ण घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसही अलर्ट झाली आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी पोहचले आहेत, या दोघांमध्ये राज्यातील प्रश्न आणि सध्या सुरु असणारी परिस्थिती यावर चर्चा होणार आहे. आमच्या भेटीमध्ये गोपनीय असे काही नव्हते. गोपनीय भेट म्हणायला आम्ही काही बंकरमध्ये तर भेटलेलो नाही. या भेटीत सामनातील मुलाखतीबाबत चर्चा झाली. बाकी गोपनीय म्हणायचं तर आम्ही गोपनीय पद्धतीनं भोजन केलं, असा चिमटा राऊत यांनी काढल

MB NEWS:कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, कठोर नियमांना तयार राहा - मुख्यमंत्री*

इमेज
 *🛑 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, कठोर नियमांना तयार राहा - मुख्यमंत्री *                                   -----------------------------------  मुंबई : रात्री दहानंतर व्यवहार बंद करणे, कार्यक्रमांवर आणि गर्दी रोखण्यासाठीचे उपाय योजण्याचे काम चालू आहे, त्यामुळे पुढचे सहा महिने ही बंधने राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच जगभर कोरोना विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल, असे म्हटले जात आहे. आर्थिक चक्र फिरवण्यासाठी तरुण पिढी बाहेर पडू लागली आहे. ती कामावर जात आहे. पण त्यांच्यामुळे घरच्या ज्येष्ठांपर्यंत विषाणू पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता आपल्याला जनजागृतीवर मोठा भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी वेळप्रसंगी कठोर नियम करावे लागतील तर ते करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. कोविडसंदर्भात औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर विभागनिहाय जिल्ह्यांच्या आढावा बैठका मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतल्या. मुख्यमंत्री म्हणाले, ब्रिटन आणि अन्य देशांत आता पुन्हा बंधने घालणे सुरू करण्यात आले आहे. आपण उपचार पद्धतीसाठी मार्गदर्शक सूचनाही तयार केल्या आ