MB NEWS:सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी शेतकऱ्याला 50 हजार रुपये हेक्टरी तात्काळ नुकसानभरपाई द्या- वसंत मुंडे

 सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी शेतकऱ्याला 50 हजार रुपये हेक्टरी तात्काळ नुकसानभरपाई द्या- वसंत मुंडे    



परळी(प्रतिनिधी) महाराष्ट्रात खरीप पेरणीला शेतकऱ्यांनी सोयाबीनची  बियाणे  अनेक कंपनीचे खरेदी करून पेरणी केली .यामध्ये 90% कंपनीची निकृष्ट बियाणे  निघाल्याचा  आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी शासनाकडे केला होता. त्यावर  तात्काळ लाखो शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे अर्ज केले. त्यामुळे शासनाला  सोयाबीन बियाणे निकृष्ट संदर्भात शेतकऱ्याच्या शेतात जाऊन सोयाबीन उगवले नाही यासंदर्भात  पंचनामे करण्यासाठी स्वतः कृषी विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले.

 त्यावेळेस शासनाच्या लक्षात आले की अनेक कंपन्यांनी सोयाबीन बियाणे मध्ये निकृष्ट दर्जाचे पुरवल्यामुळे उगवण झाली नाही त्यावेळेस अनेक शेतकऱ्यांनी अनेक कंपन्या वर स्वतः गुन्हे नोंद करण्याची मागणी केली व स्वतः शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले . त्यानंतर  राज्यात 11 कंपन्यांवर 83 गुन्हे दाखल झाले व त्यांचे परवाने  रद्द केले   पण  कायमस्वरूपी  या बोगस कंपनीला  शासनाने  कायदेशीर कारवाई करण्याची मागणी  काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी  केली आहे .शेतकऱ्याकडून  अनेक तक्रारी मध्ये  बोगस बियाणे ,खते ,औषधे पुरवणाऱ्या  कंपन्या वर  चौकशी  करून  कलम 420 बोगस बियाणे भरून बियाणे कायदा 19 66 आणि बियाणे नियंत्रण आदेश 1983 मधील तरतुदीचा भंग केलेला आहे. हे चौकशीमध्ये सिद्ध झाले. त्यामुळे शासनाने तात्काळ सर्व शेतकऱ्यांची बोगस बियाणे संदर्भात दखल घेऊन रीतसर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले .त्यांचे परवाने कंपनीचे रद्द केले म्हणजे यावर शेतकऱ्याचे समाधान नाही. तर शेतकऱ्याचे जे नुकसान सोयाबीन पेरणी चे झालेले आहे. त्या शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपये मदत करण्याची विनंती शेतकऱ्यांनी अनेक वेळेस शासनाला केली आहे. यास सर्व शी कृषी खात्याची गुणनियंत्रण विभाग हा जबाबदार आहे. कारण अनेक कंपनीशी साटेलोटे करून अपात्र सोयाबीनचे बोगस बियाणे पात्र करून घेतले व शेतकऱ्यांना ते बियाणे बाजारपेठेत चढ्या भावाने विकत घेऊन पेरणी केली परंतु यामुळे शेतकरी दोन्ही बाजूने आर्थिक संकटात सापडला कृषी खात्याची यंत्रणा जबाबदार आहे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दि.19/ 3 /2019 व दि.20 ऑगस्ट 2019 तसेच दि.23/ 6/ 2020 ला कृषी विभागाकडे शासनस्तरावर खते ,बी-बियाणे ,औषधी, बोगस पुरवणारी टोळकं कंपनीचा आहे अशी तक्रार काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केली आहे त्यामध्ये चौकशी मध्ये सिद्ध झाले असून  खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यावर अनेक कंपन्या जीवाशी खेळत आहेत अनेक खते, औषधे ,बियाणे 90% अप्रमाणित आहेत हे विविध चौकशीमध्ये सिद्ध झालेले आहे .तरीही कृषी विभाग  व शासन त्यांची पाठराखण करीत आहे असा आरोप वसंत मुंडे यांनी केला. शेतकऱ्यावर नुकसान भरपाई तात्काळ वाटप करण्यात यावी कारण अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जन्य परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे .अशा वेळेस पिक विमा ,बोगस बियाणे ,अतिवृष्टी चे नुकसान शेतकऱ्याला तात्काळ वाटप केले तर खरीप  हंगामास पेरणीसाठी मदत होईल अशी विनंती शासनाकडे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !