इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:अंबाजोगाई स्वाराती मधील 90 पैकी 27 अहवाल पॉझिटिव्ह तर गेल्या चोवीस तासात एका रुग्णाचा मृत्यू

 अंबाजोगाई स्वाराती मधील 90 पैकी 27 अहवाल पॉझिटिव्ह तर गेल्या चोवीस तासात एका रुग्णाचा मृत्यू 



अंबाजोगाई ,प्रतिनिधी..

     स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई येथे गेल्या चोवीस तासात दाखल झालेल्या रुग्णांचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 29 रोजी मध्यरात्री बारा पर्यंत प्राप्त झालेल्या अहवालाची संख्या 90  इतकी आहे. तर स्वाराती मध्ये घेण्यात आलेल्या 90 पैकी 27 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 63 अहवाल निगेटिव्ह आले आहेत पैकी एका 45 वर्षीय परळी तालुक्यातील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. स्वाराती मधील गेल्या 24 तासात कोरणा रुग्णांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे :एकूण भरती झालेल्या रुग्णांची संख्या 145, गंभीर रुग्णांची संख्या 25, सामान्य ते मध्यम स्थिती रुग्णसंख्या 84 ,निगेटिव्ह रुग्णसंख्या अठरा, संशयित रुग्ण संख्या 18 आहे. आज पर्यंत या रुग्णालयात एकूण 12 7 17 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे .त्यापैकी 33 48 रुग्णांची कोविड चाचणी करण्यात आली पैकी 669 अहवाल  पॉझिटिव्ह आले तर 26 79 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या