दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS: दु:खद वार्ता-लोणीच्या श्री.सखाराम महाराज संस्थानचे मठाधिपती परम पूज्य नाना महाराज यांना देवाज्ञा !

 लोणीच्या श्री.सखाराम महाराज संस्थानचे मठाधिपती परम पूज्य नाना महाराज यांना देवाज्ञा !



वाशीम.....

मेहकर पासून 50 किमी अंतरावर असलेल्या वाशीम जिल्ह्यातील लोणी येथील श्री.सखाराम महाराज संस्थानचे मठाधिपती परम पूज्य नाना महाराज जोशी यांचे आज सकाळी आठ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने लोणी येथे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. 

प.पू.  नाना महाराज उर्फ रामकृष्ण गोविंदराव जोशी हे 1962 पासून श्री सखाराम महाराज संस्थानचे मठाधिपती होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी तसेच मोठा परिवार आहे. श्री सखाराम महाराज संस्थानची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात असून दरवर्षी लोणी येथे कार्तिक वद्य अमावास्येला सखाराम महाराज पूण्यतिथी निमित्ताने मोठी यात्रा भरते. तर या घटनेनंतर आज दुपारी साडे बारा वाजता परम पूज्य नाना महाराज यांच्या भावजई श्रीमती सविता बाळकृष्ण जोशी (वय 69) यांचे ही लोणी येथेच दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....