इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी बबनभाऊ गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त सलग 14 दिवस राबविण्यात आली निर्जुतीकरण मोहिम*

 *कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी बबनभाऊ गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त सलग 14 दिवस राबविण्यात आली निर्जुतीकरण मोहिम*




*परळी (प्रतिनिधी)*

जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहर आणि तालुक्यात सुरू झालेली निर्जुंतीकरण (जंतुनाशक) फवारणी सलग 14 दिवस चालली असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या माध्यमातून कोरोना योद्धा होत अनेक गाव व शहराच्या काना कोपऱ्यात फवारणीच्या माध्यमातून कोरोनाला अटकाव घालण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांना सहकार्य केले आहे.

वाढदिवसानिमित्त नेहमीच आगळे वेगळे उपक्रम राबविण्याची व जनतेला सहकार्य होईल असे काम करण्याची चांगली परंपरा जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते यांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जपली आहे. 5 सप्टेंबरला बबनभाऊ गित्ते यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केल्यानंतर परळी शहर आणि तालुक्यातील सुमारे 50 पेक्षा अधिक गावात सार्वजनिक स्थळी जनक्रांती सेनेच्या वतिने निर्जुंतीकरण मोहीम राबविण्यात आली. ट्रॅक्टर किंवा मिळेल त्या वाहनाच्या माध्यमातून जनक्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात निर्जुतुकीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक ठिकाणी गाव मोठे असल्याने सलग दोन दिवस मोहिम त्या ठिकाणी राबविण्यात आली. 

परळी शहरात मोंढा, बाजारपेठ, रेल्वे स्टेशन, बसस्थानक आदी सार्वजनिक ठिकाणासह परळी शहरानजीक असलेल्या गाव आणि वस्ती परिसरातही निर्जुतुकीकरण करण्यात आले. जनक्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी राबविलेल्या आगळया वेगळया व तेवढ्याच उपयुक्त असलेल्या औषध फवारणीच्या या मोहिमेचे मनापासून स्वागत करीत त्यंाचे आभार व्यक्त केले. 


*चांगली परंपरा*

बबनभाऊ गित्ते जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष असून वाढदिवस किंवा इतर महत्वाच्या दिवसानिमित्त लोकोउपयोगी उपक्रम राबविण्याची त्यांची परंपरा आहे. कोरोना लॉकडाऊन कालावधीत अनेक ठिकाणी गरजूंना अन्नधान्य देण्यात आले असून कोरोनाचा अटकाव करण्यासाठी गावस्तरावर चांगली स्वच्छता मोहीम व तेथे कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होवू नये यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले. निर्जुंतीकरण मोहिमेत सलग 14 दिवस शेकडो कार्यकर्ते मनापासून सक्रीय सहभागी झाले होते. बबनभाऊ गित्ते यांनी एका चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून चांगली परंपरा सर्वांसमोर ठेवली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या