MB NEWS:युसुफ वडगाव येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र वाघमारे यांचा कोरोनाने मृत्यू
युसुफ वडगाव येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र वाघमारे यांचा कोरोनाने मृत्यू
------------------------------------------------
केज प्रतिनिधी. :- केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र वाघमारे वय ५४ वर्ष यांचा आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी दुपारी २:०० वाजता कोरोना विषाणू विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्व त्यांचे पोलीस कर्मचारी आणि नागरिकात हळहळ व्यक्त होत आहे. बीड पोलीस परिवाराच्या वतीने या कोविड यौद्ध्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा