पोस्ट्स

MB NEWS- 🔘 नौकरीची संधी: परभणी -कृषी महाविद्यालयात ३२ रिक्त जागांसाठी अर्ज करा

इमेज
 🔘 नौकरीची संधी: परभणी -कृषी महाविद्यालयात ३२ रिक्त जागांसाठी अर्ज करा परभणी.......             कृषी महाविद्यालय, पाथरी जिल्हा परभणी येथे प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2022 आहे. • पदाचे नाव - प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक • पद संख्या - 32 जागा • शैक्षणिक पात्रता - मूळ जाहिरात वाचावी • नोकरी ठिकाण- परभणी • अर्ज पद्धती - ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) ई-मेल पत्ता -  pathricoa@gmail.com • अर्ज पाठविण्याचा पत्ता - प्राचार्य, कृषी महाविद्यालय, पाथरी जि. परभणी - 431506 • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 मे 2022 अधिकृत वेबसाईट  www.vnmkv.ac.in -  • PDF जाहिरात-  https://cutt.ly/tGxK6Fi ------------------------------------------------------------------ हे देखील वाचा/पहा🔸 क्लिक करा व वाचा: ⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात* Click: *लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाई

MB NEWS-संयम व निग्रहाचा संस्कार: सारीबा शेखने ठेवला पहिला रोजा

इमेज
  संयम व निग्रहाचा संस्कार: सारीबा शेखने ठेवला पहिला रोजा परळी (प्रतिनिधी):  दि. ३० एप्रिल २२ .....      रोजा (उपवास) करणे हा मानवाला संयम व निग्रह (सब्र) देणारा संस्कार आहे. यामुळे बालवयापासून रोजा ठेवण्याला विशेष महत्त्व आहे.सारीबा आरेफ शेख हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा शुक्रवारी (दि.२९ एप्रिल) पुर्ण केला. सद्या रमजानचा पवित्र  महिना सुरू आहे. इस्लाम धर्मात रोजा हा विशेष विधी मानला जातो.         सारीबा शेख हिने वयाच्या नवव्या वर्षी जीवनातील पहिला रोजा ठेवला. उन्हाची प्रचंड तीव्रता असताना सारीबा शेख हिने आत्मविश्वास व श्रद्धेने  पहिला रोजा ठेवून आपल्या आयुष्यातील रोजा ठेवण्यास सुरूवात केली आहे. सामाजिक सलोखा रहावा यासाठी तिने विशेष प्रार्थना केली. कमी वयात रोजा ठेवल्याने तिचे कौतुक होत असून कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे. कामगार कल्याण केंद्राचे केंद्र संचालक आरेफ शेख यांची सारीबा शेख  ही मुलगी आहे. ------------------------------------------------------------------ हे देखील वाचा/पहा🔸 क्लिक करा व वाचा: ⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात* Click: *लाचख

MB NEWS-आजचे राशिभविष्य दि.३० एप्रिल २०२२

इमेज
  आजचे राशिभविष्य दि.३० एप्रिल २०२२ मेष ः इच्छापूर्तीचा दिवस. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. मनोरंजनात दिवस जाईल. मनःस्वास्थ्य उत्तम राहील. वृषभ ः कृतीशून्य असल्यामुळे कामांत अडचणी येतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. कोणतेही आश्वासन, शब्द देऊ नका. कामाला लागावे. मिथुन ः व्यापारीवर्गासाठी लाभदायक दिवस. नवीन गोष्टी अंगीकाराल. कामांना गती मिळेल. विवाह विषयक सुवार्ता ऐकायला मिळेल. कर्क ः कार्यसिद्धी योग. कौटुंबिक समस्या संवादाने सुटतील. मनासारख्या घटना घडतील. वरिष्ठांची मर्जी राखाल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. प्रतिष्ठा वाढेल. सिंह ः सहजपणाने कार्य करा. भावनाप्रधान होण्याचे प्रसंग निर्माण होतील. खोट्या आमिषांना बळी पडू नका. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. कन्या ः क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. दुसर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्या. जुने आजार उद्भवतील. जवळच्या लोकांकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. तूळ ः आवडत्या व्यक्तींना वेळ द्याल. गैरसमज दूर होतील. प्रश्न मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. वृश्चिक ः सज्जनांचा सहवास ल

MB NEWS-नगर-आष्टी दरम्यान रेल्वेमार्गाचे 7 मे रोजी अधिकृत उद्घाटन

इमेज
  नगर-आष्टी दरम्यान रेल्वेमार्गाचे 7 मे रोजी अधिकृत उद्घाटन मुंबई.......         नगर-आष्टी दरम्यान नव्याने सुरुवात होणारी रेल्वे 7 मे  रोजी सुरू होणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री  रावसाहेब दानवे यांनी मुंबईत आज (दि.२९) जाहीर केले.मुंबई येथे आयोजित भायखळा रेल्वे स्थानकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा, भाजपच्या शायना एन सी, रेल्वेचे जनरल मनेजर अनिल कुमार लाहोटी आदी उपस्थित होते.           नगर- बीड -परळी रेल्वे मार्गावरील आष्टी पर्यंतचे  काम पूर्ण झालेले आहे.आष्टी ,सोलापूरवाडी आणि नारायणडोह हे तीन स्टेशन पूर्ण झाले आहेत. गेल्या महिन्यात या ट्रॅकवर रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने संपूर्ण तपासणी करण्यात आली. या ट्रॅकवर १२० प्रती तास वेगाने मोठी रेल्वे धावली. त्यामुळे या ट्रॅकवरील रेल्वेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या रेल्वेचे उद्घाटन  केंद्रीय  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे आणि नगरचे खासदार डॉ सुजय विखे यांच्या प्रमुख  उपस्थितीत ७ मे रोजी होणार आहे.यावेळी रेल्वेचे अधिकारी उ

MB NEWS-परळीत बसवेश्वर जयंती निमित्त परमरहस्य पारायण सोहळ्याला प्रारंभ

इमेज
  परळीत बसवेश्वर जयंती निमित्त परमरहस्य पारायण सोहळ्याला प्रारंभ  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त परळी वैजनाथ येथील कल्याणकारी हनुमान मंदिर येथे परमरहस्य पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्याला आज दि.२९ रोजी  ष, ब्र श्री.१०८ नंदकेश्वर शिवाचार्य महाराज पूर्णा व गुरुलिंग स्वामी यांच्या शुभहस्ते प्रारंभ झाला.       महात्मा बसवेश्वर जयंती  निमित्ताने कल्याणकारी हनुमान मंदिराच्या  सभामंडपामध्ये दिनांक, 29 / 4 /2022 ते 3 /5  /2022 या कालावधीत सकाळी वेळ 9 ते 12 परमरहस्य पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आज दि.२९ रोजी ष, ब्र श्री.१०८ नंदकेश्वर शिवाचार्य महाराज पूर्णा व गुरुलिंग स्वामी यांच्या शुभहस्ते प्रारंभ झाला. ष, ब्र श्री.१०८ नंदकेश्वर शिवाचार्य महाराज पूर्णा यांचे प्रवचन झाले. आजचे यजमान श्री रमेश आप्पा काळे व सौ सुनिता रमेश आप्पा काळे यांच्या शुभहस्ते पूजा व महाआरती करण्यात आली.यावेळी वीरशैव समाजाच्या वतीने ष. ब्र. श्री १०८ नंदकेश्वर स्वामी यांचा सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाला सतिश आप्पा भूमकर ,सुरेश आप्पा बेलाळे, विरभद्र आप्पा काळे ,वै

MB NEWS-लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

इमेज
  लाचखोर सहायक उपनिरीक्षका सह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात  अंबाजोगाई : दाखल गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे 25 हजारांची लाचेची मागणी केली. तडजोडअंती 15 हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केले. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईकावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने जिल्हा पोलीस दलातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.  नितीन चंद्रकांत चौरे (वय 33, पोलीस नाईक), प्रमोद प्रताप सेंगर (ठाकूर) (वय 51 सहा.पोलीस उपनिरीक्षक) अशी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीसांची नावे आहेत. चौरे व सेंगर यांनी तक्रारदारास त्यांचे कुटुंबियांवर शेतीचे कारणावरून दाखल गुन्ह्यात तपासात मदत करून, पोलीस ठाण्यातच जामीन करण्यासाठी व प्रतिबंधक कारवाई तहसीलदार कार्यालय अंबाजोगाई येथेच करण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 15 हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले. ही लाच 28 फेब्रुवारी 2022 रोजी मागितली होती. 2 मार्च 2022, 3 मार्च  1 एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली. म्हणून याबाबत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन्