पोस्ट्स

MB NEWS-महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जूनला मतदान

इमेज
  महाराष्ट्रातील  राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जूनला मतदान महाराष्ट्रातील  राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या ६ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी उमेदवारांना ३१ मे पर्यंत अर्ज करता येणार आहे. शिवसेनेचे  संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल,  काँग्रेसचे पी. चिदंबरम, भाजपचे विनय सहस्त्रबुद्धे, पीयुष गोयल आणि विकास महात्मे यांचा राज्यसभा खासदार म्हणून कार्यकाल संपत आहे. तसेच जुलैमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असल्याने त्यापूर्वी  राज्य सभा निवडणूक  होणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.  महाराष्ट्रातील या ६ जागंवर या खासदारांपैकी पुन्हा राज्यसभेवर कोण निवडून येणार की याठीकाणी नवीन चेहरे दिसणार याची जनतेत उत्सुकता आहे. हे देखील वाचा/पहा🔸 *खासदार संभाजीराजे छत्रपतींची "स्वराज्य" भूमिका !* 🌑 *आ.अमोल मिटकरींना "ते" वक्तव्य भोवणार!* 🌑 *दुर्दैवाने गाठलं* 🌑 _*साठ फूट खोल दरीत कोसळली कार एकाच कुटुंबातील चौघे ठार*_ 🛑 *परळीत माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव ; लक्षवेधी शोभायात्रा.* 🛑 *पंकजा

MB NEWS-धर्मापुरी शिवारातून दोन बैलांची चोरी

इमेज
  धर्मापुरी शिवारातून दोन बैलांची चोरी  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहर व तालुक्यात दररोज चोरींच्या घटनांचे सत्र सुरू अखंडीत सुरू आहे. मोटारसायकल चोरी, घरफोडी, शेतकऱ्यांच्या धान्याची चोरी त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या गुरा ढोरांची चोरी यामुळे वाढत्या चोर्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. धर्मापुरी शिवारातून शेतात बांधल्या दोन बैलांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.         याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी कैलास हनुमंत गिरी रा.धर्मापुरी ता.परळी वैजनाथ यांच्या मरळसिध्द देवस्थान परिसरातील शेतात बांधलेल्या दोन बैलांची चोरी झाली आहे. फिर्यादी आपल्या शेतात तीन बैल व एक म्हैस बांधून घरी धर्मापुरी येथे गेले असतांना दि.10 ते 11 च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन बैल चोरून नेले. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञान चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो.ना.वाले हे करीत आहेत. हे देखील वाचा/पहा🔸 *खासदार संभाजीराजे छत्रपतींची "स्वराज्य" भूमिका !* 🌑 *आ.अमोल मिटकरींना "ते" वक्तव्य भोवणार!* 🌑 *दुर्दैवाने गाठलं* 🌑 _*साठ फूट खोल दरी

MB NEWS-गोविंद सारस्वत अपघाती मृत्यू प्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इमेज
  गोविंद सारस्वत अपघाती मृत्यू प्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- गणेशपार भागातील सर्वपरिचित व मनमिळाऊ असलेल्या गोविंद सारस्वत यांचा अपघाती मृत्यू दि.09 मे रोजी चेंबरी विश्रामगृहा समोरील रस्त्यावर झाला होता. या प्रकरणी संभाजीनगर पोलिसात दि.11 मे रोजी अज्ञात  वाहनचालक विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                गोविंद हिरालाल सारस्वत वय 53 वर्ष रा.जंगमगल्ली गणेशपार याची मोटारसायकल क्रमांक एम.एच.44 पी 7956 वरून येत असतांना कोणत्या तरी अज्ञात वाहनचालकाने याच्या ताब्यातील वाहन हायगाईने निष्काळजीपणे चालवून मोटारसायकला जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन गोविंद सारस्वत मृत्यू पावले. या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संभाजीनगर पोलिसात कलम 304 अ, 279,427 भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार होळंबे हे करीत आहेत. हे देखील वाचा/पहा🔸 *खासदार संभाजीराजे छत्रपतींची "स्वराज्य" भूमिका !* 🌑 *आ.अमोल मिटकरींना "ते" वक्तव्य भोवणार!* 🌑 *दुर्दैवाने गाठलं* 🌑 _*साठ फूट खोल दरीत कोसळली कार एकाच कुटुंबातील चौघे ठ

MB NEWS-अतिशय दुःखद: बाजरीचं खळं करताना मळणी यंत्रात अडकून महिलेचा गेला जीव

इमेज
  अतिशय दुःखद: बाजरीचं खळं करताना मळणी यंत्रात अडकून महिलेचा गेला जीव   गेवराई - उन्हाळी बाजरीचे खळे चालू असतांना तोल जाऊन मळणी यंत्रात गेल्याने महिलेचे शीर धडावेगळे होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील संगम जळगांव येथे आज गुरुवारी (दि.१२) सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली.    सुमित्रा सुदाम पांगरे (वय ३०) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. संगम जळगांव येथे गुरुवारी सकाळी बाजरीचे खळे मळणी यंत्राद्वारे चालू होते. यावेळी मळणी यंत्रात बाजरी टाकत असतांना सुमित्रा यांचा तोल गेलाआणि मळणी यंत्राने त्यांना आतमध्ये ओढले. त्यात सुमित्रा यांचे शीर धडावेगळे झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हे देखील वाचा/पहा🔸 *खासदार संभाजीराजे छत्रपतींची "स्वराज्य" भूमिका !* 🌑 *आ.अमोल मिटकरींना "ते" वक्तव्य भोवणार!* 🌑 *दुर्दैवाने गाठलं* 🌑 _*साठ फूट खोल दरीत कोसळली कार एकाच कुटुंबातील चौघे ठार*_ 🛑 *परळीत माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव ; लक्षवेधी शोभायात्रा.* 🛑 *पंकजाताई मुंडेंचा मतदारसंघात सर्वस्पर्शी दौरा* 🔸 *जनतेचं प्रेम अन् विश्वास तसुभरही कमी नाही ; सो

MB NEWS-पं.स.सदस्य ज्ञानोबा मुंडे यांना पितृशोक;पाटलोबा मुंडे यांचे निधन

इमेज
  पं.स.सदस्य ज्ञानोबा मुंडे यांना पितृशोक;पाटलोबा मुंडे यांचे निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील जिरेवाडी येथील जुन्या पिढीतील वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत पाईक असलेले ज्येष्ठ नागरिक पाटलोबा मुंडे यांचे आज दि.12 मे रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. पंचायत समितीचे सदस्य ज्ञानोबा (माऊली) मुंडे यांचे ते वडील होत.             दिवंगत पाटलोबा मुंडे हे अतिशय धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. जिरेवाडी येथील जुन्या पिढीतील एक ज्येष्ठ व दानशूर व्यक्तीमत्व म्हणून ते सर्वपरिचित होते. वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत पाईक व दर महिना पंढरपूरचे वारी करणारे निस्सीम वारकरी होते. धार्मिक व सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले. वृध्दपकाळाने त्यांची वयाच्या 105 व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात चार मुले, चार मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जिरेवाडी येथे आज सायंकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.  त्यांच्या निधनाने मुंडे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे. हे देखील वाचा/पहा🔸 *खासदार संभाजीराजे छत्रपतींची "स्वराज्य"

MB NEWS-राष्ट्रीय महिला आयोगाकडून महाराष्ट्र पोलिसांना कारवाईचे निर्देश

इमेज
  आ.अमोल मिटकरींना "ते" वक्तव्य भोवणार! राष्ट्रीय महिला आयोगाकडून महाराष्ट्र पोलिसांना कारवाईचे निर्देश मुंबई.....          राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीच्या सभेत कन्यादानाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत पंधरा दिवसात योग्य ती कारवाई करून त्याबाबत आम्हाला माहिती द्या, असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आ.अमोल मिटकरींना "ते" वक्तव्य भोवणार अशी शक्यता आहे.           भिवंडीतल्या भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्या नीता वैभव भोईर यांनी राष्ट्रीय महिला आयोगात मिटकरींच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. प्रत्यक्षात असा कोणताही संदर्भ नाही व अमोल मिटकरींनी केलेलं वक्तव्य हे हिंदूधर्मातील समस्त महिला वर्गाचा अपमान करणारं आणि खिल्ली उडवणारं आहे. तेव्हा याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी नीता भोईर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली होती. महिला आयोगाने भोईर यांच्या तक्रारीची दखल घेतली असून राज्य पोलीस महासंचालकांना याविषयी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.अमोल मिटकरींचं वक्तव

MB NEWS-राज्यसभा अपक्ष लढणार; सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याची साद

इमेज
  खासदार संभाजीराजे छत्रपतींची "स्वराज्य" भूमिका ! राज्यसभा अपक्ष लढणार; सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याची साद पुणे.......         ” मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाही. यामुळे राज्यसभा निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. मला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा “, अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केली. त्यांनी ‘ स्वराज्य ‘ या संघटनेची स्थापना करत असल्याची घोषणाही केली आहे.       खासदार संभाजीराजे छत्रपती  यांचा राज्यसभेच्या सदस्यपदाचा कार्यकाल ३ मे रोजी संपला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज (दि.१२) आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, तर मला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा. मी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविणार असे मत व्यक्त करत स्वराज्य या नवीन संघटना स्थापनेची त्यांनी घोषणा केली. या संघटनेअंतर्गत शिवप्रेमी, शाहूप्रेंमीना एका छताखाली आणणार असल्याचेही ते म्हणाले. संभाजीराजेंनी ” एकला चलो रे”… चा नारा देत, अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. हे देखील वाचा/पहा🔸 *खासदार संभाजीराजे छत्रपतींची &quo