दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-राष्ट्रीय महिला आयोगाकडून महाराष्ट्र पोलिसांना कारवाईचे निर्देश

 आ.अमोल मिटकरींना "ते" वक्तव्य भोवणार!



राष्ट्रीय महिला आयोगाकडून महाराष्ट्र पोलिसांना कारवाईचे निर्देश

मुंबई.....

         राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीच्या सभेत कन्यादानाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत पंधरा दिवसात योग्य ती कारवाई करून त्याबाबत आम्हाला माहिती द्या, असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आ.अमोल मिटकरींना "ते" वक्तव्य भोवणार अशी शक्यता आहे.

          भिवंडीतल्या भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्या नीता वैभव भोईर यांनी राष्ट्रीय महिला आयोगात मिटकरींच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. प्रत्यक्षात असा कोणताही संदर्भ नाही व अमोल मिटकरींनी केलेलं वक्तव्य हे हिंदूधर्मातील समस्त महिला वर्गाचा अपमान करणारं आणि खिल्ली उडवणारं आहे. तेव्हा याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी नीता भोईर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली होती. महिला आयोगाने भोईर यांच्या तक्रारीची दखल घेतली असून राज्य पोलीस महासंचालकांना याविषयी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.अमोल मिटकरींचं वक्तव्य हिंदूंच्या आणि महिलावर्गाच्या भावना दुखावणारे असून त्यांच्यावर IPC च्या कलम 354 & 509 अंतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी नीता भोईर यांनी केली होती. आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या निर्देशांनंतर पोलीस महासंचालक याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

     दरम्यान, भाजप नेते सुनील देवधर यांनी याप्रकरणी ट्वीट करत राष्ट्रीय महिला आयोगाचे आभार मानले आहेत. ''कन्यादानाविषयीच्या विकृत वक्तव्याची दखल घेऊन पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश दिल्याबदद्ल राष्ट्रीय महिला आयोगाचे आभार. उद्धव ठाकरेंना समस्त हिंदू विवाहित महिलांच्या सन्मानाचे गांभीर्य व पोलिसांना कणा असेल तर त्यांनी आता मिटकरींविरोधात कठोर कारवाई करावी.'' असे ट्विट भाजप नेते सुनील देवधर यांनी केले आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

*खासदार संभाजीराजे छत्रपतींची "स्वराज्य" भूमिका !*


🌑 *आ.अमोल मिटकरींना "ते" वक्तव्य भोवणार!*


🌑 *दुर्दैवाने गाठलं* 🌑 _*साठ फूट खोल दरीत कोसळली कार एकाच कुटुंबातील चौघे ठार*_


🛑 *परळीत माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव ; लक्षवेधी शोभायात्रा.*


🛑 *पंकजाताई मुंडेंचा मतदारसंघात सर्वस्पर्शी दौरा* 🔸 *जनतेचं प्रेम अन् विश्वास तसुभरही कमी नाही ; सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोगही प्रभावी!*


*40 हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरिक्षक चतुःर्भूज*


*दुर्दैवी: ऊसाला आग लाऊन शेतकऱ्यांची गळफास घेवुन आत्महत्या*


• _परिचारिका दिन विशेष_• *परळी तालुक्याचा भूमिपुत्र बजावतोय गेल्या आठ वर्षापासून पुणे येथे परिचारिका म्हणून कर्तव्य*


🔸 _*मौंजीबंधना नंतर बटूच्या पाया पडण्याची रीत आहे.काय आहे यामागची धार्मिक कारण मीमांसा?.....*_


*ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्येस शासन-प्रशासन जवाबदार - कॉ अजय बुरांडे*


🛑 *गुरुचरणी संपूर्ण समर्पण करण्याचा संस्कार म्हणजे व्रतबंध -प्रज्ञाचक्षु विद्याभुषण ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज*


*MPSC:राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर*


*प्रज्ञाचक्षु विद्याभूषण ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज यांनी घेतले प्रभु वैद्यनाथ दर्शन*

----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis


🔸 MB NEWS/माझी बातमी🔸




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....