पोस्ट्स

MB NEWS-दोन दिवसाच्या शोध मोहीमेनंतर "त्या" वाहून गेलेल्या चिमुकल्याचा लागला शोध

इमेज
  दोन दिवसाच्या शोध मोहीमेनंतर "त्या" वाहून गेलेल्या चिमुकल्याचा लागला शोध  गेवराई — शाळेतून घरी जाणारा एक 3 वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेल्याची दुर्दवी घटना सोमवारी ता. 26 रोजी दुपारी घडली होती. पहिल्या दिवशी शोध मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, रात्र झाल्यावर मोहीम थांबवण्यात आली. दुसऱ्या दिवशी, मंगळवार ता. 27 रोजी सकाळीच शोध कार्य सुरू करण्यात आले. प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यानी केलेल्या अथक परिश्रमानंतर सायं पाच वाजता  विद्रूपा नंदीच्या किनारी घटनास्थळा पासून पाचशे मीटर अंतरावर कु. बंटी ज्ञानेश्वर क्षीरसागर ( वय वर्ष 3 ) याचा मृतदेह आढळून आला. त्या चिमुकल्या मुलाचा मृतदेह दिसताच जमावाला गहिवरून आले. सोमवारी अकरा वाजता गेवराई शहरात जोरदार पाऊस पडल्याने नाल्यांना पूर आला होता. नाली दिसली नाही. त्यामुळे, दोन मुला पैकी एक मुलगा अचानक पडून वाहून गेल्याचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. शहरात झालेल्या जोरदार पावसाने नाला भरून वाहत होता. याच नाल्यात पडून तो वाहून गेला आहे. सदरील नाल्याचे पाणी विद्रुपा नदीला जावून मिळते त्यामुळे मुलाचा शोध घेणे सुरु होते. परंतू, सायंकाळपर्

MB NEWS-गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व टर्निंग पॉईंटच्या वतीने आयोजित गौरी गणपती महोत्सव स्पर्धा:उर्मिला मंत्री ठरल्या प्रथम बक्षिसांच्या मानकरी

इमेज
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व टर्निंग पॉईंटच्या वतीने  आयोजित गौरी गणपती महोत्सव स्पर्धा उर्मिला  मंत्री ठरल्या प्रथम बक्षिसांच्या मानकरी गौरी गणपती स्पर्धा महोत्सव अंतर्गत चार प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात महालक्ष्मी मखर सजावट व देखावा स्पर्धेत उर्मिला मंत्री हया प्रथम बक्षिसांच्या मानकरी ठरल्या, त्यांना डबल डोअर फ्रिज बक्षिस देण्यात आले.   उर्वरित स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे महालक्ष्मी मखर सजावट व देखावा - द्वितीय मंगल लांडगे (ओहन), ज्योती गुळवे (स्मार्ट फोन) तर उत्तेजनार्थ शुभांगी जातकर, विजया मेनकुदळे, सुवर्णा क्षीरसागर, शीतल पांचाळ, नयन टाक, मंगलबाई शिंदे, सिध्दी आरबुने, माधुरी मराठे, शोभा दौंड, भारती दहिवाळ (सर्वांना टोस्टर),   घरगुती गणेश सजावट - प्रथम - अनिल आदुडे, द्वितीय- सुरेश पोरवाल, तृतीय- कृष्णा दहातोंडे, उत्तेजनार्थ- राशी वानखेडे, संतोष कापसे, धोंडीराम दहातोंडे, प्रिया संघई, श्रध्दा स्वामी,  बाल गणेश मंडळ-  प्रथम - एनसीसी बाल गणेश मंडळ, द्वितीय- सिध्दीविनायक बाल गणेश मंडळ, तृतीय- बाल गणेश मंडळ, उत्तेजनार्थ- शिवाजीनगर बाल गणेश, विघ्नहर्ता मंडळ, शास्त्री बाल

MB NEWS-गौरी गणपती महोत्सव स्पर्धांचे शानदार सोहळ्यात बक्षीस वितरण

इमेज
  परळीत  स्त्रीशक्तीचे विराट दर्शन : सात्विक सांस्कृतिक कार्यक्रम व गौरी गणपती महोत्सव स्पर्धांचे शानदार सोहळ्यात बक्षीस वितरण सुसंस्कृत, सजग व सात्विक समाज निर्मिती  ही नेतृत्व करणारांची खरी जबाबदारी - पंकजाताई मुंडे पंकजाताईंचे सर्व उपक्रम हे येणाऱ्या पिढ्यांना सकारात्मक दिशा देणारे - खा.डॉ. प्रितमताई मुंडे परळी वै ।दिनांक २७। केवळ राजकीय लाभ पाहून समाजाला दिशाहीन बनवण्यापेक्षा एक सुसंस्कृत, सजग व सात्विक समाज निर्मिती होण्याच्या दृष्टीकोनातून कार्यक्रम राबविणे ही नेतृत्व करणारांची खरी जबाबदारी असते असे प्रतिपादन भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केले तर पंकजाताईंचे सर्व उपक्रम हे येणाऱ्या पिढ्यांना सकारात्मक दिशा देणारे असल्याचे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व टर्निंग पॉईंटच्या वतीने परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या गौरी गणपती महोत्सव स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका शानदार समारंभात आज बक्षीस वितरण करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. अक्षता मंगल कार्यालयात हा कार्यक्रम संप

MB NEWS-दसऱ्याच्या तयारीला लागा, भगवान भक्तीगडावर भेटू ' - पंकजा मुंडेंचे आवाहन

इमेज
  दसऱ्याच्या तयारीला लागा, भगवान भक्तीगडावर भेटू ' - पंकजा मुंडेंचे आवाहन परळी वैजनाथ.....     पंकजा मुंडे यांनी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ पोस्ट करुन दसरा मेळाव्या संदर्भात आपल्या समर्थकांना खास आवाहन केले आहे. व्हिडिओमध्ये सुरुवातीला पंकजा मुंडे यांनी नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच, दसरा म्हणजे, आपल्या स्वाभिमानाचा दिवस, आपल्या आवडीचा दिवस, आपल्या सर्वांच्या शक्ती आणि भक्तीच्या संगमाचा दिवस. आपण सर्वांनी दसऱ्याच्या तयारीला लागा आणि दसऱ्याच्या दिवशी मेळाव्यात भेटूया, असे आवाहन केले.        कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून मुंडेंचा दसरा मेळावा अतिशय साध्या पद्धतीने झाला होता. मात्र यावर्षी परवानगी मिळाल्याने हा मेळावा मोठ्या प्रमाणात  साजरा केला जाणार आहे. त्याच अनुषंगाने संत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव मध्ये मेळाव्याची मोठी तयारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी च पंकजा मुंडे यांनी या तयारीचा एक व्हिडिओही शेअर केला होता.21 सप्टेंबर रोजी शेअर केलेल्या व्हिडिओत पंकजा मुंडे म्हणाल्या होता, 'कोरोनामुळे अधूरे राहिलेले काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्

MB NEWS-लाचखोर तलाठ्यासह खाजगी इसम बीड एसीबीच्या जाळ्यात

इमेज
  लाचखोर तलाठ्यासह खाजगी इसम बीड एसीबीच्या जाळ्यात अंबाजोगाई / टॅक्स पावती न देता 7/12 फेरफार नोंद करण्यासाठी तलाठ्याने दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडअंती सात हजार रुपये खाजगी इसमाच्या हस्ते स्वीकारताना दोघांनाही बीड एसीबीने सोमवारी (दि.26) अंबाजोगाई शहरात रंगेहाथ पकडले. प्रफुल्ल (विक्की)सुहासराव आरबाड (वय 30 रा.प्रशांतनगर, अंबाजोगाई) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तर नजीरखान उमरद राजखान पठाण (वय 43 रा.फ्लॉवर्स क्वार्टर अंबाजोगाई) असे खाजगी इसमाचे नाव आहे. तक्रारदाराने खरेदी केलेल्या प्लॉटची 7/12 फेरफार नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे कागदपत्रे सादर केली. टॅक्स पावती न देता 7/12 फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी प्रफुल्ल आरबाड यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली. त्यानंतर सोमवारी (दि.26) बीड एसीबीने सापळा लावला. लाचखोर तलाठी आरबाड व त्यासोबत सोबत खाजगी नजीरखान उमरद राजखान पठाण यांनी दुचाकीवर बसून तक्रारदारास त्यांच्या पाठीमागे येण्यास सांगितले. अंबाजोगाईतील एका बिअरबार समोर गाडी थांबवून दुचाकीवर पाठीमागे बसलेले पठाणकडे पैसे देण्यास सांगितले. पठाणने पंचास

MB NEWS-साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भाररत्न पुरस्कार द्या

इमेज
  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भाररत्न पुरस्कार द्या सकल मातंग समाजाचा परळीत भव्य विराट मोर्चा परळी (प्रतिनिधी) सकल मातंग समाजाच्या वतीने परळी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा त्याचबरोबर परळी शहरातील बस स्टँड समोरील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा तात्काळ बसवावा या मागणीसाठी हा विराट मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना अभिवादन करण्यात आले. संत भगवान बाबा चौक मार्गे हा मोर्चा तहसील कडे जाऊन धडकला. मातंग समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या शासनाने तात्काळ मार्गी न लावल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव पारित करून केंद्र सरकारला शिफारस करावी. केंद्र सरकारने एकमताने हा प्रस्ताव मंजूर करून अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार घोषित करावा. परळीच्या बस स्टँड

MB NEWS -नवरात्री विशेष: देवी मातेच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन करून खरी दुर्गा पूजा साजरी करावी

इमेज
  नवरात्री विशेष: देवी मातेच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन करून  खरी दुर्गा पूजा साजरी करावी - श्री. आशुतोष महाराजजी             -श्री . आशुतोष महाराजजी, (संस्थापक एवं संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान) ------------------------------------------------------------ तिन्ही जगाची देवी! त्रिभुवनेश्वरी, वरदान देणारी - वरदाता!  चक्र धारण केलेली - महाचक्रधारिणी ! दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणारी - दुर्गती नाशिनी ! दुर्गासारखी ढाल बनून आपल्या भक्तांचे रक्षण करणारी माँ दुर्गा! आईला दहा प्रहारधारिणी हे ही नाव दिले आहे. कारण त्यांच्या दहा हातांमध्ये दहा शस्त्रे/वस्तू आहेत, जी प्रतीकात्मक आणि अर्थपूर्णही आहेत! माँ दुर्गेच्या हातात शंख - एकीकडे माँ दुर्गेचे बाह्य जगतातील प्रकटीकरण म्हणजे वाईटाच्या अंताची घोषणा आहे. त्याच वेळी, तेच शंख हे आंतरिक जगात गुंजत असलेल्या शाश्वत संगीताचे प्रतीक आहे. तो अनंत ध्वनी, जो एक ब्रह्मज्ञानी आकांक्षी स्वतःमध्ये ऐकू शकतो, जेव्हा त्याला पूर्ण गुरूंच्या ज्ञान-दीक्षाद्वारे आईचे खरे स्वरूप कळते. कमळ हे आतील जगामध्ये अमृताचे प्रतिनिधित्व करते. त्याचबरोबर बाह्य वातावरणात, माये

MB NEWS-नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमांसह विविध स्पर्धांचे आयोजन-भोजराज पालिवाल

इमेज
  भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाची आज उत्साहात स्थापना नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमांसह विविध स्पर्धांचे आयोजन-भोजराज पालिवाल परळी/प्रतिनिधी भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाच्या दुर्गादेवीची आज सोमवार दि.26 सप्टेंबर रोजी श्री व सौ. गजराज पालीवाल यांच्या हस्ते विधीवत पूजा करून स्थापना करण्यात आली. आज सोमवारी भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक  तथा शिवसेना मा.शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गादेवीची उत्साहपूर्ण वातावरणात स्थापना करण्यात आली. यावेळी दुर्गादेवीची शहराच्या प्रमुख मार्गावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. श्री व सौ.गजराज पालीवाल यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.  यावेळी प्रमुख मार्गदर्शक  तथा शिवसेना मा.शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांनी सांगितले की, नवरात्रीचे नऊ दिवस भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने विविध धार्मीक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून याचसोबत विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. यावेळी भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक भोजराज पालीवाल, महेश केेंद्रे, डॉ.तुषार पिंपळे, धीरज बाहेती, सतिश चौधरी, जरीचंद

MB NEWS-शेतकरी आंदोलनात तहसीलला ठोकले होते कुलूप: आमदार धनंजय मुंडेंसह सहकाऱ्यांची आरोपातून निर्दोष मुक्तता

इमेज
  शेतकरी आंदोलनात तहसीलला ठोकले होते कुलूप: आमदार धनंजय मुंडेंसह सहकाऱ्यांची आरोपातून निर्दोष मुक्तता  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...           सन 2016 मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन करत तत्कालीन विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सहकाऱ्यांनी तहसील कार्यालयाला कुलूप लावले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा निकाल लागला असून परळी न्यायालयाने या आरोपातून आमदार धनंजय मुंडे यांच्यासह सहकाऱ्यांना निर्दोष मुक्त केले आहे.      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दि. ७\६\२०१६ रोजी परळी तहसील कार्यालय समोर तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले होते. हातची पिके गेल्याने शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, बँका कर्ज देत नाहीत व जुन्या कर्जाची जाचक पद्धतीने वसुली केली जाते व इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आक्रमक आंदोलन करत आंदोलकांनी तहसील कार्यालयाला कुलूप ठोकले होते. याप्रकरणी आमदार धनंजय मुंडे यांच्या

MB NEWS-श्रीक्षेत्र माहूरगडावर सौ संगीता चौधरी कुलकर्णी यांच्या भक्ती संगीत कार्यक्रमाचे आयोजन

इमेज
  श्रीक्षेत्र माहूरगडावर सौ संगीता चौधरी कुलकर्णी यांच्या भक्ती संगीत कार्यक्रमाचे आयोजन नांदेड,......              श्री.रेणुकादेवी संस्थान श्रीक्षेत्र माहूरगड येथे शारदीय नवरात्र महोत्सवात द्वितीयेला दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी पुण्यातील गायिका सौ.संगीता चौधरी कुलकर्णी यांच्या भक्ती संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.            मागील अनेक वर्षांपासून सातत्याने त्या आपली संगीत सेवा रेणुका मातेच्या चरणी अर्पण करीत आहेत.कोरोना महामारीच्या काळात ज्यावेळी सांस्कृतीक, सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी होती त्याकाळी त्यांनी आपली गाणी गाउन ती संस्थनला पाठविली व रेणुकामातेची सेवा केली. आज होणा-या भक्तीसंगीत कार्यक्रमात त्यांना अनुराधा चौधरी या गायनाची साथ करणार आहेत.तबलाः श्री.प्रशांत गाजरे,संवादिनीःश्री.मंगेश जवळेकर पखवाजःश्री.विश्वेश्वर जोशी तर तालवाद्यांची साथ श्री.गिरीश देशमुख हे करणार आहेत.या कार्यक्रमाचे निवेदन सौ.स्वाती देशपांडे या करणार असुन माहुरगडावर मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या या कार्यक्रमाचा रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त विश्वस्त श्री.रेणु

MB NEWS-देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

इमेज
राज्यात २० हजार पदांसाठी पोलीस भरती होणार; बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा --‐------- मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या बैठकीनंतर महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून आम्ही पोलीस भरतीबाबत निर्णय घेतला आहे. राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार आहेत. ८ हजार पदांबाबत जाहिरात निघाली असून आणखी १२ हजार पदांची जाहिरात लवकरच काढण्यात येईल,' अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. राज्यातील हजारो तरूण गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत होते. काही दिवसांपूर्वी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. सरकारने तत्काळ रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी करत नांदेड येथे तरुणांनी फडणवीस यांना घेराव घातला होता. आता अखेर सरकारने या भरती प्रक्रियेबाबत मोठी घोषणा केली आहे. दुसरीकडे, राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या विविध घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गृहखात्याची बैठक

MB NEWS-विज कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

इमेज
  विज कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा   परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः- विज कामगारांच्या न्याय मागण्या निर्णायक करण्यात याव्यात अन्यथा विज कामगार कृती संयुक्त समितीच्या वतीने बेमुदत धरणे निदर्शने आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.क.मर्या., विभागीय कार्यालय अंबाजोगाई यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या विभागातील कर्मचार्‍यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याबाबत संघटनेने वेळोवेळी आपणास विनंती केलेली आहे. परंतु प्रलंबीत प्रश्नांबाबत कोणतेही निर्णायक कार्यवाही झालेली नाही. या उलट कर्मचार्‍यांवर अनाठायी दंडात्मक कार्यवाही सातत्याने कारणे दाखवा नोटीस देवून कामगारांत दहशत व दबाव तंत्राचा वापर केला जात आहे.  वास्तवीक ज्या कारणांसाठी कार्यवाही बाबत पत्र दिली जात आहेत. त्यासाठी कंपनीने एजन्सीज नेमल्या असून त्यांच्या चूकीची जबाबदारीही कर्मचार्‍यांवर ठेवली जात आहे व वरिष्ठ कार्यालयाने जबाबदारीबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या असताना त्याबाबतही कर्मचान्यांना दोषी धरले जात आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. वास्तवीक का

MB NEWS-बालवाडीतून घरी येताना चिमुकला नाल्यातून गेला वाहून

इमेज
बालवाडीतून घरी येताना चिमुकला नाल्यातून गेला वाहून गेवराई;  :  गेवराई शहरामध्ये सकाळपासून धुवाँधार पाऊस पडत आहे. या पावसाने नद्या-नाल्यांना पाणी आले आहे. दरम्यान, तीन वर्षीय मुलगा बालवाडीतून घरी येत असताना पाय घसरल्याने नाल्यातून वाहून गेल्याची घटना आज (दि.२६) दुपारी घडली. हा मुलगा विद्रुपा नदीमध्ये वाहून गेला असल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी तहसीलदारांसह प्रशासकीय अधिकारी दाखल झाले होते. गेवराई शहरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे चिंतेश्वर गल्लीतील नाल्याला पाणी आले होते. दुपारी बंटी ज्ञानेश्‍वर क्षीरसागर हा तीन वर्षीय मुलगा बालवाडीतून घरी येत होता. त्याचा पाय घसरल्याने तो नाल्यात पडला आणि वाहून गेला. त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सचीन खाडे, सपोनि संतोष जवंजाळ घटनास्थळी दाखल झाले. अद्याप शोधकार्य सुरू आहे.

MB NEWS-चिमुकल्यांसह स्कूलबस मध्ये प्रवास करत पंकजा मुंडे रमल्या शालेय विद्यार्थ्यांत !

इमेज
  चिमुकल्यांसह स्कूलबस मध्ये प्रवास करत पंकजा मुंडे रमल्या शालेय विद्यार्थ्यांत !  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....           भाजपाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांची सर्वस्तरात लोकप्रियता सर्वज्ञात आहे. चिमुकल्या बालकांपासून ते वयोवृद्धापर्यंत पंकजा मुंडे लोकप्रिय नेत्या म्हणून परिचित आहेत. लोकांमध्ये मिसळण्याच्या बाबतीत आणि लोकांना आपलंसं करण्याच्या बाबतीत पंकजा मुंडे नेहमीच अग्रेसर असतात. विशेष म्हणजे त्यांना स्वतःला अतिशय संवेदनशीलपणे व सकारात्मकतेने लोकांना भेटणे, त्यांच्यात मिसळणे आवडते. विविध कार्यक्रम, प्रसंग व वेगवेगळ्या ठिकाणी याचा नेहमीच अनुभव येतो. असाच एक अनुभव आज परळीमध्ये बघायला मिळाला.            पंकजा मुंडे या परळी शहरातून जात असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात होत्या. त्याचवेळेला समोरून एका शाळेची स्कूल बस जात होती. पंकजाताईंना पाहून या स्कूलबसमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी "ताई, ताई "म्हणून आवाज दिले व सर्वांनी ताईंना हात उंचावत अभिवादन केले. या विद्यार्थ्यांचा उत्साहच इतका ओसंडून वाहत होता की पंकजाताईनाही त्यांच्यात सहभागी होण्याचा मोह आवरता आला ना

MB NEWS: नवरात्रोत्सव: गोपाळ आंधळे यांचा माहितीपूर्ण लेख>>>>अर्धनारीनटेश्वर स्वरूपातील परळीची जागृत कालराञी देवी

इमेज
  अर्धनारीनटेश्वर स्वरूपातील परळीची जागृत  कालराञी देवी  -✍️गोपाळ आंधळे,परळी वैजनाथ. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>   शि व, शक्ती आणि भक्ती चा ञिवेणी संगम असलेले बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचे परळी चे धन्वंतरी प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग होय.अनेक कालखंडात अनेक देवी, देवता, ऋषी मूनींच्या आणि साधुसंताच्या वास्तव्याने पुनीत असलेल्या परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्राचा महिमा अनन्यसाधारण आहे. असेच एक अद्भुत आणि देशातील एकमेव ठरणारे अर्धनारीनटेश्वर रूपातील माता कालराञी देवी चे जागृत असलेल्या देवीची माहिती शारदीय नवराञी उत्सवा निमीत्ताने परळी वैद्यनाथ पंचक्रोशीचे अभ्यासक गोपाळ आंधळे यांच्या लेखनीतून  भाविकांसाठी  देत आहोत.        परळी शहरातील जुन्या गावभागतील मांडववेस   रोड वर, भीमनगर  वस्तीत शहराच्या पुर्वेस कालराञी देवी चे पुर्वाभिमुख  अर्धनारीनटेश्वर रूपातील मंदिर आहे.  अर्धनारीनटेश्वर  शिवाचे एक रूप. शिवाच्या शरीराचा उजवा अर्धा भाग पुरुषरूप व डावा अर्धा भाग स्त्रीरूप असल्यामुळे

MB NEWS-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवाडा:चुकारपिंप्री येथे लम्पी लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
  ● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवाडा:चुकारपिंप्री येथे लम्पी लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद सोनपेठ, प्रतिनिधी.....        भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवाडा अंतर्गत भारतीय जनता पार्टी परभणी च्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष तथा संयोजक शिवाजी मव्हाळे यांच्या पुढाकारातून मौजे चुकारपिंप्री  तालुका सोनपेठ येथे आज दिनांक 26 रोजी मोफत लंपी लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.         मौजे चुकारपिंप्री तालुका सोनपेठ येथे पशुंसाठी मोफत लंम्पी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शरद केंद्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा संयोजक शिवाजी मव्हाळे, सुशिल रेवडकर,  जगन्नाथ यादव, राजेश मव्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली  डाॅ. शिवराज मोराळे ,डाॅ. जयतपाळ, , डाॅ.मधुकर नरवाडे आदींसह पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी या मोहिमेत परिश्रम घेत आहेत.         मौज

MB NEWS-महेश धडे यांचे निधन

इमेज
  महेश धडे यांचे निधन परळी (प्रतिनिधी ) येथील समतानगर भागातील रहिवाशी महेश लक्ष्मणराव धडे वय 35 वर्षे यांचे रविवारी दि.25 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.      परळी येथे शिवाजी चौकात त्यांचे स्प्रिंग मोपिंगचे प्रसिद्ध ग्यारेज होते.त्या मुळे ते सर्वांचे सुपरिचित होते. त्यांची अंत्ययात्रा दि.26 रोजी सकाळी 10 वाजता राहते घर समता नगर येथून निघून सार्वजनिक स्मशान भूमीतअंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,आई, भाऊ -वहिणी,विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे.

MB NEWS-पुरुषाचा मृतदेह आढळला ;ओळख पटविण्याबाबत पोलिसांचे आवाहन

इमेज
  पुरुषाचा मृतदेह आढळला ;ओळख पटविण्याबाबत पोलिसांचे आवाहन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          परळी तालुक्यातील टोकवाडी जवळ राज्य रस्त्यावर  एका 40 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून या मृतदेहाची ओळख पटविण्याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.        याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दिनांक 23/92022 रोजी  11.34 वाजण्याच्या सुमारास टोकवाडी जवळ राज्य रस्त्यावर  अंदाजे 40 वर्षिय वयाच्या एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. उंची अंदाजे पाच फूट , सडपातळ, अंगात  पांढर्‍या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅण्ट अशा वर्णनाचा पुरुष मृतदेह आढळून आला आहे. या अनोळखी मयताची ओळख पटविण्यासाठी परळीच्या ग पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन तपासी अधिकारी सहा.पो.नि.डाॅ.व्ही. व्ही. शहाणे यांनी केले आहे.

MB NEWS-संदीप चौंडे यांच्या पुढाकाराने भव्य रक्त तपासणी शिबिर

इमेज
  गोपनपाळे गल्ली, अंबेवेस भागातील रक्त तपासणी शिबिराचे पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उदघाटन;75 जणांची तपासणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा  वाढदिवस संपूर्ण देशभर 'सेवा पंधरवडा' म्हणून साजरा होत असून त्या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून परळीत भव्य मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडेच्या हस्ते उदघाटन केले. यावेळी 72 जणांची तपासणी करण्यात आली आहे.शिबिर भाजपचे युवा नेते संदीप चौंडे यांनी आयोजित केले होते.          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या दरम्यान 'सेवा पंधरवडा' राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  गोपनपाळे गली अंबेवेस परळी वैजनाथ येथे रविवार, दि.25 सप्टेंबर रोजी भव्य मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केले. तरी या कार्यक्रमास

MB NEWS-परळीतील आणखी काही शिवसैनिक शिंदे गटात सामील

इमेज
  परळीतील आणखी काही शिवसैनिक शिंदे गटात सामील         परळी वैजनाथ:-  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, गणेशपार भागातील  शिवसैनिकांनी,शिव सेना मुख्य सचिव संजय मोरे,जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेनेच्या शिंदें गटात तालुका प्रमुख शिवाजी शिंदे,धनंजय गित्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यास गणेशपार भागातील  शिवसेना आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिकांनी जाहीर प्रवेश केला याप्रसंगी, शिवसेनेचे सचिन स्वामी,बालासाहेब देशमुख, दीपक जोशी,संजय कदम गावडे,नवनाथ सरवदे,रमेश लोखंडे,,बालाजी धुमाळ, सागर बुंदले,वैजनाथ लोखंडे, जगन्नाथ कदम,वैजनाथ देशमुख, भागवत कदम,ज्ञानेश्वर डाके,गणेश सारस्वत यांच्या सह असंख्य शिवसैनिकांनी जाहीर प्रवेश केला,

MB NEWS-शिक्षकाने केली मारहाण;संस्थाचालकाने दाखल केला गुन्हा

इमेज
  शिक्षकाने विद्यार्थ्यांना केली मारहाण; संस्थाचालकाने दाखल केला गुन्हा परळी (प्रतिनीधी)   वर्गात येताच विद्यार्थ्यांनी गुड मॉर्निंग म्हणत स्वागत केले पण गुरुजींनी हातात छडी घेत विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना दि.22 रोजी नागनाथ निवासी विद्यालयात घडली.विद्यार्थ्यांना मारहाण का केली याचा जाब विचारणार्या संस्थाचालकास शिवीगाळ करत धक्काबुक्कीही केली.याप्रकरणी  शिक्षकाविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.             वर्गात जाऊन आठवीच्या विद्यार्थ्यांना विनाकारण बेदम मारहाण केल्याची घटना येथील श्री नागनाथ निवासी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात घडली आहे. शाळेतील शिक्षक बालाजी लक्ष्मण फड हे आठवीच्या वर्गात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गेले असता आलेल्या आपल्या गुरुचे विद्यार्थ्यांनी सामुहिकपणे गुड मॉर्निंग म्हणत स्वागत केले.विद्यार्थ्यांच्या या स्वागताचे कौतुक करण्याऐवजी त्यांनी छडी घेत वर्गातील विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली यात एका विद्यार्थ्याच्या हाताला जबर मार लागला.हा प्रकर समजताच मुख्याध्यापकांनी सदरील वर्ग गाठला व फड यांना मारहाणीचा जाब विचारल्यानंतर मारह

MB NEWS- *घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडेंची परळीच्या काळरात्री मंदिरात स्वच्छता* *सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत मंदिरासह बौध्दविहार, साठे समाजमंदिर, दर्ग्यात केली स्वच्छता; शांतीवन स्मशानभूमीत वृक्षारोपण*

इमेज
 *घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडेंची परळीच्या काळरात्री मंदिरात स्वच्छता* *सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत मंदिरासह बौध्दविहार, साठे समाजमंदिर, दर्ग्यात केली स्वच्छता; शांतीवन स्मशानभूमीत वृक्षारोपण* परळी ।दिनांक २५। नवरात्र उत्सवास उद्यापासून सुरवात होत असून घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज शहरातील प्रसिद्ध अशा काळरात्री मंदिरात जाऊन स्वच्छता केली. देवीच्या मंदिराबरोबरच बौध्दविहार, साठे समाजमंदिर, दर्ग्यातही त्यांनी स्वच्छता मोहिम राबवली. भीमनगर भागातील शांतीवन स्मशानभूमीत त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या दरम्यान 'सेवा पंधरवडा' राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज शहरात भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या सेवा उपक्रमात पंकजाताई मुंडे स्वतः सहभागी झाल्या. उद्यापासून देवीचा नवरात्रोत्सव सुरू होत आहे, या पार्श्वभूमीवर पंकजाताईंनी काळरात्री मंदिरात जाऊन मंदिर व परिसराची स्वतः हातात झाडू घेत स्वच्छता केली. भीमनगर भागातील सुगंध कुटी

MB NEWS- ● _पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवाडा_

इमेज
  ● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवाडा खडका येथील कै.राजीव गांधी अनु.जाती जमाती निवासी आश्रमशाळेत शैक्षणिक साहित्य वाटप सोनपेठ, प्रतिनिधी.....        भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवाडा अंतर्गत भाजपचे जनसेवक बाळासाहेब जाधव यांच्यावतीने खडका येथील कै.राजीव गांधी अनु.जाती जमाती निवासी आश्रमशाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.         खडका तालुका सोनपेठ येथील कै.राजीव गांधी अनु.जाती जमाती निवासी आश्रमशाळेत आज दिनांक 25 रोजी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा कै.राजकुमार मव्हाळे ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे हे होते.यावेळी भाजप जनसेवक बाळासाहेब जाधव, पोलीस पाटील वैजनाथ यादव, जगन्नाथ यादव, परमेश्वर यादव , भाजप भ.वि.जा. ज.सेलचे प्रदेश सरचिटणीस वसंत चव्हाण, पत्रकार सुदर्शन डाके, राजेश मव्हाळे, मुख्याध्यापक डि.एल. सोनकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात

MB NEWS- ● *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवाडा: शिर्शी येथे 500 पशुंना मोफत लम्पी लसीकरण*

इमेज
 ● *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवाडा: शिर्शी येथे 500 पशुंना मोफत लम्पी लसीकरण* • _फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय व्हॅनचे उद्घाटन; पं.दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी : 'मन की बात' कार्यक्रमाचे सामुहिक श्रवण_    सोनपेठ, प्रतिनिधी.....        भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवाडा अंतर्गत भारतीय जनता पार्टी परभणी च्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष तथा संयोजक शिवाजी मव्हाळे यांच्या पुढाकारातून मौजे शिर्शी तालुका सोनपेठ येथे आज दिनांक 25 रोजी मोफत लंपी लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर याठिकाणी फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.पं.दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी करण्यात आली तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे सामुहिक श्रवण कार्यक्रम घेण्यात आला.        मौजे शिर्शी तालुका सोनपेठ येथे पशुंसाठी मोफत लंम्पी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सरपंच भागवतराव सोळंके  यांच्या हस्ते झाले. यावेळी प्

MB NEWS-ऊसतोड कामगार, मुकादमांचे प्रश्न सोडविण्यासाठी पंकजाताई मुंडे आग्रही

इमेज
  ऊसतोड कामगार, मुकादमांचे प्रश्न सोडविण्यासाठी पंकजाताई मुंडे आग्रही • मुख्यमंत्र्यांना भेटून विषय मार्गी लावण्याचा बैठकीत दिला शब्द ऊसतोड कामगार माझ्यासाठी जीव की प्राण ; त्यांचेसाठीच माझी लढाई बीड ।दिनांक २४। राज्यातील ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आज आग्रही भूमिका मांडली.  गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच आपण मुख्यमंत्र्यांना भेटून विषय मार्गी लावू असा शब्द त्यांनी कामगार, मुकादमांना दिला.   ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार संघटनांची  बैठक आज मांजरसुंबा (ता. बीड) येथे झाली, त्यावेळी मार्गदर्शन  करतांना त्या बोलत होत्या. ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदारांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी यावेळी चर्चा केली. Click &watch : ■ नवीन आष्टी-नगर रेल्वे उद्घाटन | कार्यक्रमातील असा भावूक प्रसंग | प्रत्येकाचे पाणावले डोळे.     पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, ऊसतोड मजूर हा माझ्यासाठी जीव की प्राण आहे, त्यांचेसाठीची माझी लढाई कुठलेही