इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-दोन दिवसाच्या शोध मोहीमेनंतर "त्या" वाहून गेलेल्या चिमुकल्याचा लागला शोध

 दोन दिवसाच्या शोध मोहीमेनंतर "त्या" वाहून गेलेल्या चिमुकल्याचा लागला शोध 



गेवराई — शाळेतून घरी जाणारा एक 3 वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेल्याची दुर्दवी घटना सोमवारी ता. 26 रोजी दुपारी घडली होती. पहिल्या दिवशी शोध मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, रात्र झाल्यावर मोहीम थांबवण्यात आली. दुसऱ्या दिवशी, मंगळवार ता. 27 रोजी सकाळीच शोध कार्य सुरू करण्यात आले. प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यानी केलेल्या अथक परिश्रमानंतर सायं पाच वाजता विद्रूपा नंदीच्या किनारी घटनास्थळा पासून पाचशे मीटर अंतरावर कु. बंटी ज्ञानेश्वर क्षीरसागर ( वय वर्ष 3 ) याचा मृतदेह आढळून आला. त्या चिमुकल्या मुलाचा मृतदेह दिसताच जमावाला गहिवरून आले.

सोमवारी अकरा वाजता गेवराई शहरात जोरदार पाऊस पडल्याने नाल्यांना पूर आला होता. नाली दिसली नाही. त्यामुळे, दोन मुला पैकी एक मुलगा अचानक पडून वाहून गेल्याचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. शहरात झालेल्या जोरदार पावसाने नाला भरून वाहत होता. याच नाल्यात पडून तो वाहून गेला आहे. सदरील नाल्याचे पाणी विद्रुपा नदीला जावून मिळते त्यामुळे मुलाचा शोध घेणे सुरु होते. परंतू, सायंकाळपर्यंत मुलाचा शोध लागला नव्हता. रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती.
घटना स्थळी तहसिलदार सचिन खाडे व प्रशाकीय अधीकारी उपस्तिथ होते. घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. दुपारी एक वाजता वाहून गेलेला मुलगा रात्री आठ वाजेपर्यंत सापडला नव्हता. मंगळवार ता. 27 रोजी सायंकाळी पाच वाजता विद्रूपा नदीपात्रात बंटीचा मृतदेह आढळून आला. तहसीलदार सचिन खाडे, पो. उपनिरीक्षक संदिप काळे, पो. उपनिरीक्षक संतोष जंजाळ, तलाठी माणिक पांढरे, महसूल चे जितू लेंडाळ, अमोल होंडे, अनिल कांबळे, नपचे भागवत येवले, एकनाथ लाड,
दिपक लिंबोरे, किशोर बल्लया, युवा नेते शिवराज पवार व त्यांच्या मित्रांनीयांनी शोध मोहीमेत सहभाग घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या