इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व टर्निंग पॉईंटच्या वतीने आयोजित गौरी गणपती महोत्सव स्पर्धा:उर्मिला मंत्री ठरल्या प्रथम बक्षिसांच्या मानकरी

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व टर्निंग पॉईंटच्या वतीने  आयोजित गौरी गणपती महोत्सव स्पर्धा


उर्मिला  मंत्री ठरल्या प्रथम बक्षिसांच्या मानकरी



गौरी गणपती स्पर्धा महोत्सव अंतर्गत चार प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात महालक्ष्मी मखर सजावट व देखावा स्पर्धेत उर्मिला मंत्री हया प्रथम बक्षिसांच्या मानकरी ठरल्या, त्यांना डबल डोअर फ्रिज बक्षिस देण्यात आले.

 उर्वरित स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

महालक्ष्मी मखर सजावट व देखावा- द्वितीय मंगल लांडगे (ओहन), ज्योती गुळवे (स्मार्ट फोन) तर उत्तेजनार्थ शुभांगी जातकर, विजया मेनकुदळे, सुवर्णा क्षीरसागर, शीतल पांचाळ, नयन टाक, मंगलबाई शिंदे, सिध्दी आरबुने, माधुरी मराठे, शोभा दौंड, भारती दहिवाळ (सर्वांना टोस्टर),

  घरगुती गणेश सजावट - प्रथम - अनिल आदुडे, द्वितीय- सुरेश पोरवाल, तृतीय- कृष्णा दहातोंडे, उत्तेजनार्थ- राशी वानखेडे, संतोष कापसे, धोंडीराम दहातोंडे, प्रिया संघई, श्रध्दा स्वामी, 

बाल गणेश मंडळ- प्रथम - एनसीसी बाल गणेश मंडळ, द्वितीय- सिध्दीविनायक बाल गणेश मंडळ, तृतीय- बाल गणेश मंडळ, उत्तेजनार्थ- शिवाजीनगर बाल गणेश, विघ्नहर्ता मंडळ, शास्त्री बाल गणेश, एकदंत बाल गणेश, वक्रतुंड गणेश मंडळ, 

मंगलमूर्ती मिरवणूक देखावा- प्रथम - पदमावती गणेश मंडळ, द्वितीय- राजस्थानी गणेश मंडळ, नवकिरण गणेश, उत्तेजनार्थ- हनुमान शक्ती गणेश मंडळ, महाराणा प्रताप गणेश, जयहिंद गणेश मंडळ

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!