MB NEWS-गौरी गणपती महोत्सव स्पर्धांचे शानदार सोहळ्यात बक्षीस वितरण

 परळीत  स्त्रीशक्तीचे विराट दर्शन : सात्विक सांस्कृतिक कार्यक्रम व गौरी गणपती महोत्सव स्पर्धांचे शानदार सोहळ्यात बक्षीस वितरण







सुसंस्कृत, सजग व सात्विक समाज निर्मिती  ही नेतृत्व करणारांची खरी जबाबदारी - पंकजाताई मुंडे



पंकजाताईंचे सर्व उपक्रम हे येणाऱ्या पिढ्यांना सकारात्मक दिशा देणारे - खा.डॉ. प्रितमताई मुंडे


परळी वै ।दिनांक २७।

केवळ राजकीय लाभ पाहून समाजाला दिशाहीन बनवण्यापेक्षा एक सुसंस्कृत, सजग व सात्विक समाज निर्मिती होण्याच्या दृष्टीकोनातून कार्यक्रम राबविणे ही नेतृत्व करणारांची खरी जबाबदारी असते असे प्रतिपादन भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केले तर पंकजाताईंचे सर्व उपक्रम हे येणाऱ्या पिढ्यांना सकारात्मक दिशा देणारे असल्याचे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले.


गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व टर्निंग पॉईंटच्या वतीने परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या गौरी गणपती महोत्सव स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका शानदार समारंभात आज बक्षीस वितरण करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. अक्षता मंगल कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर नगरसेविका सौ.उमाताई समशेट्टे, डॉ. शालिनी कराड, जयश्रीताई मुंडे,सुचिता पोखरकर यांची उपस्थिती होती.


*महिलांच्या उपस्थितीचा उच्चांक*

-------------

या कार्यक्रमाच्या निमित्ताने परळीत महिलांच्या उपस्थितीचा उच्चांक ठरणारा समारंभ बघायला मिळाला. या निमित्ताने परळीत स्त्रीशक्तीचे विराट दर्शन झाले. बक्षीस वितरणा बरोबरच परळीच्या एव्हरग्रीन  टीम व परभणीच्या अबोली जोशी यांच्या मैत्री ग्रुपने कौटुंबिक नाते उलगडणारा, पारंपरिक गीत नृत्याचा सात्विक सांस्कृतिक कार्यक्रम  सादर केला.प्रारंभी दीप प्रज्वलन, गौरी गणपती पुजन व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रीतमताई मुंडे यांचा नवदुर्गांचे प्रतिक म्हणून उपस्थित महिलांपैकी  नऊ महिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परिक्षक प्रतिनिधी म्हणून मीना नितीन चौधरी , स्पर्धक प्रतिनिधी म्हणून सुरेश पोरवाल, ज्योतीताई गुळवे यांनी मनोगत व्यक्त केले आहे.प्रास्ताविकपर मनोगत खा.डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी केले. 


*खा.डॉ. प्रीतमताई मुंडे*

-----------

प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करतांना खा.डाॅ. प्रितमताई म्हणाल्या, परळीला एक सुसंस्कृत, सात्विक व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा एक प्रयत्न म्हणून टर्निंग पाँईटच्या माध्यमातून असो की गौरी गणपती महोत्सव स्पर्धा आयोजित करुन पंकजाताई मुंडे प्रयत्न करीत असतात.येणाऱ्या पिढ्यांना एक दुरगामी सकारात्मक दिशा देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्याचा प्रयत्न पंकजाताई मुंडे करतात आपण सर्वांनी या चळवळीत सहभागी होऊन त्यांना शक्ती दिली पाहिजे.


 *पंकजाताई मुंडे*

---------

स्त्रीरूप हे पवित्र मानले जाते.त्यामुळेच आपल्याकडे स्त्रीशक्तीची पुजा करण्याची परंपरा आहे. एरव्ही अतिशय प्रेमळ असलेली मायमाऊली प्रसंगी दुर्गाही बनते.त्यामुळे महिलाच खऱ्या अर्थाने सुसंस्कारित समाज जबाबदारीने घडवत असते.मुलांच्या पालन पोषणापासून त्याला स्वत:च्या पायावर उभे करण्यापर्यंत आईएवढी काळजी अन्य कोणीही घेत नसते.मुलाच्या सुखातच आई सुख मानत असल्याने आईची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. मातृत्व शक्तीसारखी जगाच्या पाठीवर दुसरी कोणतीही शक्ती नाही, या शक्तीचा मनापासून आदर केलाच पाहिजे असा आपला आग्रह असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

       राजकारण करताना केवळ राजकीय लाभ आणि मतांचे गणित लावून निरर्थक सवंग झगमगाटी कार्यक्रम घेणे हे नेतृत्व कर्णधराचे  काम नाही तर समाजाला  आपण कोणती सकारात्मक दिशा देतो याचा विचार करुन एक सुसंस्कृत, सजग व सात्विक समाज निर्माण होईल या दृष्टीकोनातून उपक्रम घेणे ही नेतृत्वाची खरी जबाबदारी असते.हीच जबाबदारी पार पाडण्याचा आपला नेहमी प्रयत्न राहिला आहे व यापुढेही राहणार असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व टर्निंग पॉईंट टीमने अथक परिश्रमातून अतिशय देखणी अशी ही स्पर्धा आयोजित केली आणि परळी शहरातून या स्पर्धेला भरभरून प्रतिसादही मिळाला. ही परळीतील सांस्कृतिक चळवळ वाढण्यासाठी अशाच विविध उपक्रमांमध्ये मोठा प्रतिसाद भविष्यातही द्यावा असे आवाहन यावेळी पंकजाताई मुंडे यांनी केले.


   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अर्चना सावंत व प्रा.आर्या मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर शालिनी कराड यांनी केले. कार्यक्रमास  स्पर्धक, भाजपा पदाधिकारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*उर्मिला  मंत्री ठरल्या प्रथम बक्षिसांच्या मानकरी*

-----------

गौरी गणपती स्पर्धा महोत्सव अंतर्गत चार प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात महालक्ष्मी मखर सजावट व देखावा स्पर्धेत उर्मिला मंत्री हया प्रथम बक्षिसांच्या मानकरी ठरल्या, त्यांना डबल डोअर फ्रिज बक्षिस देण्यात आले. उर्वरित स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे *महालक्ष्मी मखर सजावट व देखावा*- द्वितीय मंगल लांडगे (ओहन), ज्योती गुळवे (स्मार्ट फोन) तर उत्तेजनार्थ शुभांगी जातकर, विजया मेनकुदळे, सुवर्णा क्षीरसागर, शीतल पांचाळ, नयन टाक, मंगलबाई शिंदे, सिध्दी आरबुने, माधुरी मराठे, शोभा दौंड, भारती दहिवाळ (सर्वांना टोस्टर), *घरगुती गणेश सजावट* - प्रथम - अनिल आदुडे, द्वितीय- सुरेश पोरवाल, तृतीय- कृष्णा दहातोंडे, उत्तेजनार्थ- राशी वानखेडे, संतोष कापसे, धोंडीराम दहातोंडे, प्रिया संघई, श्रध्दा स्वामी, *बाल गणेश मंडळ* प्रथम - एनसीसी बाल गणेश मंडळ, द्वितीय- सिध्दीविनायक बाल गणेश मंडळ, तृतीय- बाल गणेश मंडळ, उत्तेजनार्थ- शिवाजीनगर बाल गणेश, विघ्नहर्ता मंडळ, शास्त्री बाल गणेश, एकदंत बाल गणेश, वक्रतुंड गणेश मंडळ, *मंगलमूर्ती मिरवणूक देखावा* प्रथम - पदमावती गणेश मंडळ, द्वितीय- राजस्थानी गणेश मंडळ, नवकिरण गणेश, उत्तेजनार्थ- हनुमान शक्ती गणेश मंडळ, महाराणा प्रताप गणेश, जयहिंद गणेश मंडळ

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार