MB NEWS-शिक्षकाने केली मारहाण;संस्थाचालकाने दाखल केला गुन्हा

 शिक्षकाने विद्यार्थ्यांना केली मारहाण; संस्थाचालकाने दाखल केला गुन्हा

परळी (प्रतिनीधी)
  वर्गात येताच विद्यार्थ्यांनी गुड मॉर्निंग म्हणत स्वागत केले पण गुरुजींनी हातात छडी घेत विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना दि.22 रोजी नागनाथ निवासी विद्यालयात घडली.विद्यार्थ्यांना मारहाण का केली याचा जाब विचारणार्या संस्थाचालकास शिवीगाळ करत धक्काबुक्कीही केली.याप्रकरणी  शिक्षकाविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   
         वर्गात जाऊन आठवीच्या विद्यार्थ्यांना विनाकारण बेदम मारहाण केल्याची घटना येथील श्री नागनाथ निवासी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात घडली आहे. शाळेतील शिक्षक बालाजी लक्ष्मण फड हे आठवीच्या वर्गात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गेले असता आलेल्या आपल्या गुरुचे विद्यार्थ्यांनी सामुहिकपणे गुड मॉर्निंग म्हणत स्वागत केले.विद्यार्थ्यांच्या या स्वागताचे कौतुक करण्याऐवजी त्यांनी छडी घेत वर्गातील विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली यात एका विद्यार्थ्याच्या हाताला जबर मार लागला.हा प्रकर समजताच मुख्याध्यापकांनी सदरील वर्ग गाठला व फड यांना मारहाणीचा जाब विचारल्यानंतर मारहाण केल्याचे सांगितल्यानंतर सदरील शिक्षकावर कारवाई करावी असे पत्र मुख्याध्यापक भागवत होळंबे व व्ही.ए.चव्हाण यांनी संस्थाचालकाकडे  तक्रार केली व कारवाई करण्यास सांगितले.यावरुन संस्थाअध्यक्ष भीमराव विठ्ठल सातभाई यांनी शिक्षक फड यांना तुम्ही विद्यार्थ्यांना मारहाण का केली अशी विचारणा केली असता त्यांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की केली.सदरील घटनेबाबत संस्थेचे अध्यक्ष भिमराव सातभाई यांच्या तक्रारीवरुन या शिक्षकाविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला