इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-लाचखोर तलाठ्यासह खाजगी इसम बीड एसीबीच्या जाळ्यात

 लाचखोर तलाठ्यासह खाजगी इसम बीड एसीबीच्या जाळ्यात







अंबाजोगाई / टॅक्स पावती न देता 7/12 फेरफार नोंद करण्यासाठी तलाठ्याने दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडअंती सात हजार रुपये खाजगी इसमाच्या हस्ते स्वीकारताना दोघांनाही बीड एसीबीने सोमवारी (दि.26) अंबाजोगाई शहरात रंगेहाथ पकडले.


प्रफुल्ल (विक्की)सुहासराव आरबाड (वय 30 रा.प्रशांतनगर, अंबाजोगाई) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तर नजीरखान उमरद राजखान पठाण (वय 43 रा.फ्लॉवर्स क्वार्टर अंबाजोगाई) असे खाजगी इसमाचे नाव आहे. तक्रारदाराने खरेदी केलेल्या प्लॉटची 7/12 फेरफार नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे कागदपत्रे सादर केली. टॅक्स पावती न देता 7/12 फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी प्रफुल्ल आरबाड यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली. त्यानंतर सोमवारी (दि.26) बीड एसीबीने सापळा लावला. लाचखोर तलाठी आरबाड व त्यासोबत सोबत खाजगी नजीरखान उमरद राजखान पठाण यांनी दुचाकीवर बसून तक्रारदारास त्यांच्या पाठीमागे येण्यास सांगितले. अंबाजोगाईतील एका बिअरबार समोर गाडी थांबवून दुचाकीवर पाठीमागे बसलेले पठाणकडे पैसे देण्यास सांगितले. पठाणने पंचासमक्ष सात हजार रुपये लाच तक्रारदाराकडून स्वीकारली. तलाठ्यास लाचेची रक्कम मिळवून देण्यासाठी सहकार्य केले असता लाच रकमेसह रंगेहाथ पकडून दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी निरीक्षक अमोल धस, पोलीस अमंलदार भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, चालक गणेश मेहत्रे यांनी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!