पोस्ट्स

MB NEWS-सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर

इमेज
  सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन २०२३ सालासाठीच्या सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. यामध्ये  प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी गुरुवार, महाशिवरात्री १८ फेब्रुवारी शनिवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी रविवार, होळी (दुसरा दिवस) ७ मार्च मंगळवार ,गुढीपाडवा २२ मार्च बुधवार, रामनवमी ३० मार्च गुरुवार, महावीर जयंती ४ एप्रिल मंगळवार, गुड फ्रायडे ७ एप्रिल शुक्रवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल शुक्रवार, महाराष्ट्र दिन १ मे सोमवार, बुद्ध पौर्णिमा ५ मे शुक्रवार, बकरी ईद (ईद उल झुआ) २८ जून बुधवार, मोहरम २९ जुलै शनिवार, स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट मंगळवार, पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १६ ऑगस्ट बुधवार, गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर मंगळवार, ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबर गुरुवार, महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर सोमवार, दसरा २४ ऑक्टोबर मंगळवार, दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १२ नोव्हेंबर रविवार, दिवाळी (बलिप्रतिपदा) १४ नोव्हेंबर मंगळवार, गुरुनानक जयंती २७ नोव्हेंबर सोमवार, ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.राज

MB NEWS-सरकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती 8 डिसेंबरला साजरी करण्याचे श्री शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन

इमेज
  सरकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती 8 डिसेंबरला साजरी करण्याचे श्री शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन परळी वैजनाथ ता.०६ (प्रतिनिधी)        श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबरला सर्व शासकीय,निम शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने परित्रक काढले आहे. त्यामुळेे तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यात यावी असे आवाहन तेली युवक संघटना व शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.          सदुंबरे जिल्हा पुणे येथील श्री संताजी जगनाडे महाराज हे तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यातील प्रमुख टाळकरी होते. तसेच तुकाराम महाराजांची मुळ गाथा पाण्यात टाकण्यात आली होती. ती संपूर्ण गाथा श्री.जगनाडे महाराजांना मुखोद्गत होती. त्यांनी ही गाथा पुन्हा लिहून काढली. त्यामुळे श्री.संताजी जगनाडे महाराजांना मानणारा मोठा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात आहे. गुरुवारी (ता.०८) संताजी महाराजांचा जन्म दिवस साजरा करण्यात येतो. यासंदर्भात गेल्या वर्षी पासून महाराष्ट्र शासनाने परित्रकात उल्लेख केला आहे. यंदाही महापुरुषांच्या जयंती,

MB NEWS-स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजु रुग्णाला व्हील चेअर आणि एअर बेड प्रदान

इमेज
  स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजु रुग्णाला व्हील चेअर आणि एअर बेड प्रदान परळी वैजनाथ,प्रतिनिधी...     सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहून गरजुंना मदतीचा हात देणाऱ्या  स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजु रुग्णाला व्हील चेअर आणि एअर बेड प्रदान करण्यात आले.       भीमनगर मधील संतोष दत्तात्रय धाटे या युवकाचा एक महिन्यापूर्वी गंभीर अपघात होवून मेंदूला मार लागल्याने पाय अधू झाले आहेत.पुणे येथे दीर्घ उपचार होवून सध्या संतोष धाटे यांच्यावर फिजीओथेरपी चालू आहे.धाटे कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बिकट असून संतोषसाठी व्हील चेअर आणि एअर बेड घेणे आवश्यक होते ही बाब माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना भीमनगर मधील सहकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली.         त्या अनुषंगानेआज स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संतोष यांचे वडील दत्तात्रय धाटे यांना संतोषसाठी व्हील चेअर आणि एअर बेड देण्यात आला.यावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी, भागवत कसबे,सुभाष कांबळे,प्रताप समिंदरसवळे धोंडीराम धोत्रे,निलेश वाघमारे,दादा चिमणी आदी मान्यव

MB NEWS-योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

इमेज
  पुर्णाहुती महापूजेने श्री योगेश्वरी मार्गशीर्ष महोत्सवाची सांगता  योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी   अंबाजोगाई   -    महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची सांगता बुधवारी  सकाळी १० वाजता होमहवन व पुर्णाहुती महापूजेने झाली. अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव व सौ.शिवकन्या यादव यांच्या उपस्थितीत पुर्णाहुती व महापुजा झाली. महापुजेनंतर योगेश्वरी देवीच्या होमात श्रीफळ टाकण्यासाठी भाविकांची  गर्दी झाली होती.          श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत साजरा झाला. आज महोत्सवाची सांगता होमहवन व पुर्णाहुती महापूजेने झाली. अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव व सौ.शिवकन्या यादव यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापूजा केली. यावेळी झालेल्या महापूजेला अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव व सौ.शिवकन्या यादव  यांनी विधिवत योगेश्वरी देवीची महापूजा व महाआरती केली. यावेळी  देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विपीन पाटील,सचिव अँड शरद लोमटे,उपाध्यक्ष गिरीधारीलाल भराडीया, मं

MB NEWS- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सुशोभीकरण करा- अनंत इंगळे

इमेज
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सुशोभीकरण करा-  अनंत इंगळे परळी (प्रतिनिधी.)   शहरातील रेल्वे स्थानका समोरील तसेच बस स्टँड कडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सूशोभिकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस परळीचे सरचिटणीस अनंत इंगळे यांनी परळी नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रति माजी मंत्री आ.धनंजय मुंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वाल्मीक अण्णा कराड यांनाही देण्यात आल्या आहेत.       याबाबत अनंत इंगळे यांनी परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परळी शहरातील विविध चौकांचे नगरपालिकेच्या वतीने जसे सुशोभीकरण करण्यात आले. तसेच सुशोभीकरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाचे ही करावे.      परळी बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच रेल्वे स्थानकाच्या समोरील मुख्य रस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आहे. अनेक वर्षापासून हा चौक अस्तित्वात आहे. परळी शहरात मौलाना आझाद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तसेच इटके कॉर्नरला असणाऱ्या संभाजी चौक आदि चौकांचे नगरपालिकेच्या वतीने सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. अशाच प्र

MB NEWS-श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळीचा उपक्रम

इमेज
  राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व श्री दत्त जन्मोत्सव निमित्त श्री शनि मंदिरात खिचडी वाटप श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळीचा उपक्रम परळी वैजनाथ / प्रतिनिधी वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक पोर्णिमेनिमित्त श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळी वैजनाथच्या वतीने खिचडी प्रसादाचे आयोजन भाविक-भक्तांसाठी करण्यात येते तसेच बुधवारी आलेल्या श्री दत्त जन्मोत्सव निमित्त दुहेरी योग साधत भाविकांना खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले. श्री दत्त जन्मोत्सव निमित्त श्रीं च्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी बुधवार दि. 7 डिसेंबर 2022 रोजी झाली होती.  श्री भगवान शनैश्वर व वसुंधरारत्न राष्ट्रसंत सद्गुरु  डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रतिमेचे यावेळी तपोनुष्ठान समितीच्या वतीने वतीने पुजन श्री.नरेश साखरे, श्री.चंद्रकांत उदगीरकर व श्री.वैजनाथआप्पा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री दत्त जन्मोत्सवच्या अनुषंगाने श्री शनि मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून खिचडी वाटप करण्यात आली. हजारो भाविक भक्त

MB NEWS- लग्नकार्यातील जेवणातून ५० महिलांना विषबाधा

इमेज
 लग्नकार्यातील जेवणातून ५० महिलांना विषबाधा अंबाजोगाई तालुक्यातील गीत्ता येथील घटना अंबाजोगाई - लग्नकार्यानिमित्त सुवासिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या जेवणातून जवळपास ५० महिलांना विषबाधा झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील गीत्ता येथे मंगळवारी (दि.०६) घडली. सुदैवाने सर्व बाधित महिलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.       गीत्ता येथील तरुणाचा येत्या शुक्रवारी विवाह आहे. यानिमित्ताने सोमवारी (दि.०५) भावकीतील महिलांसाठी सुवासिनींचे जेवण आयोजित करण्यात आले होते. सोमवारी दुपारी गावातील जवळपास शंभर महिलांनी या कार्यक्रमात जेवण केले. दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यातील काही महिलांना विषबाधेची लक्षणे दिसू लागली. दुपारनंतर बाधित महिलांची संख्या वाढल्याने त्यापैकी ३६ महिलांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर काही महिलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, सर्व महिलांची परिस्थिती धोक्याबाहेर असल्याची माहिती स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. सध्या स्वाराती रुग्णालयात संध्या दिनेश शिंदे (३५), नीता भागवत शिंदे (४१), अनिता प्रदीप शिंदे (४५),

MB NEWS-महाराष्ट्र राज्य हिंदी, गुजराती, सिंधी भाषेतील साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार योजना

इमेज
  महाराष्ट्र राज्य हिंदी, गुजराती, सिंधी भाषेतील साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार योजना पुस्तक प्रकाशन अनुदानासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन मुंबई, दि. 6 :  महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीच्या हिंदी, गुजराती, सिंधी भाषेतील २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या ३ वर्षांचे साहित्यविषयक पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशन अनुदानासाठी ३० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन अकादमीने केले आहे. अधिक माहिती https://mahasahitya.org वर उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी भाषेतील साहित्य प्रचार आणि प्रसारासाठी विविध योजना राबविण्यात येतात. हिंदी भाषेच्या समग्र विकासासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी काम करत आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीमार्फत सन 2020-21, 2021-22 आणि 2022-23  या तीन वर्षांसाठी अखिल भारतीय सन्मान जीवन गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, विधा पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशन अनुदानासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रवेशिका अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, दुसरा मजला, जुने जकात

MB NEWS-वैद्यनाथ विद्यालयातील 1993 च्या तुकडीचे झाले स्नेह संमेलन

इमेज
 32 वर्षानंतर भेटले 44 शाळकरी मित्र.... शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही शाळेतील आठवणींनी गहिवरले जीवनात यशस्वी झाला आहात, आता चांगले माणूस म्हणून जगा - शिक्षकांचा सल्ला परळी वैजनाथ...... तीस वर्ष आणि आठ महिन्यांपूर्वी दहावीच्या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी ते सर्वजण भेटले होते आणि नंतर पुन्हा त्यांची एकत्रित भेट कधीच झाली नाही....  प्रत्येकाने शैक्षणिक दृष्ट्या आपली स्वतंत्र वाट निवडली होती....  शिक्षण , नोकरी आणि कुटुंब अशा एकेक जबाबदाऱ्या पार पडत ते वेगवेगळ्या ठिकाणी स्थिरावले होते....  मात्र शाळेच्या आठवणी आजही त्यांच्या मनात कायम होत्या ....मित्रांसोबत चे क्षण आणि शिक्षकांनी दिलेली शिकवण त्यांना दररोज आठवत होती.... याच ओढीने त्यांना तीस वर्षानंतर जवळपास 31 वर्षानंतर पुन्हा एकत्र आणले..... पुन्हा एकदा 31 वर्षानंतर त्यांनी शाळा अनुभवली...अगदी तशीच... सकाळच्या प्रार्थनेपासून  ते दुपारच्या मध्यंतरांमध्ये गोळ्या बिस्कीट, शेंगदाणे फुटाणे खाणे,  मैदानावर खेळाच्या तासात जाऊन खेळ खेळणे आणि शिक्षकांच्या तासाला बसून त्यांच्याकडून शिकवणीचे चार शब्द घेणे..... अगदी सगळे तसेच..... हे सर्व घडले ते वै

MB NEWS-लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन परळी वैजनाथ ता.०६ (प्रतिनिधी)               येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.                     शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (ता.०६) करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. विनोद जगतकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.डॉ विनोद जगतकर यांनी सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थिनी सपना भुसे हिने मनोगत व्यक्त केले, अध्यक्षीय समारोप संजय देशमुख यां

MB NEWS-महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालय मोहा येथे अभिवादन कार्यक्रम

इमेज
 ●नकारात्मक दृष्टीकोन हेच अपयशाचे कारण:पीएसआय शेळके ◆समाज परिवर्तनासाठी मुलींनी शिकले पाहिजे-स्नेहल औटी परळी / प्रतिनिधी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालय मोहा येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास सिरसाळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी.डी शेळके, विदेशात संशोधन कार्य करणारी कु.स्नेहल औटी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या अभिवादनपर भाषणात श्री.शेळके म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमाणे प्रत्येकांनी शालेय शिक्षणात शिस्त व जिद्द बाळगली की यश हमखास मिळते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आज शिक्षण क्षेत्रातील मक्तेदारी मोडीत निघाली असून सर्वाना शिक्षणाची दारे उघडी आहेत.तर विदेशात संशोधन कार्य करणारी शाळेचे माजी विद्यार्थी तथा देशाच्या संरक्षण विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले उत्तरेश्वर औटी यांची कन्या व विदेशात शिक्षण घेत संशोधन कार्य करणारी युवा संशोधक स्नेहल औटी हिने मुलींनी आपल्या महापुरुषणाच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याची गरज असल्याचे सांगत डॉ.बाबासाहेब आंब

MB NEWS-खळबळजनक घटना :मुख्याध्यापकाची आत्महत्या

इमेज
  खळबळजनक घटना : मुख्याध्यापकाची आत्महत्या केज - तालुक्यातील रहिवासी व जि.प.शाळेवर असललेल्या मुख्याध्यापकाने बीड येथे जिल्हा परिषद कार्यालयासमोर हॉटेलच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. 5 ) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. पोलीसांना माहिती दिल्यानंतर शहर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन रात्रीच मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला होता. आज सकाळी इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. सोमवारी रात्री 11 वाजता काही व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या नवीन इमारती समोरील एका हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह दिसला अन् एकच खळबळ उडाली. याची माहिती शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. परंतु हा व्यक्ती कोण? असा प्रश्न पोलीस समोर होता. आज सकाळी ओळख पटली असून, भारत सर्जेराव पाळवदे ( वय 45 वर्ष) रा. सासुरा (ता. केज ) असे मयताचे नाव असल्याचे समजले. ते केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील शाळेत मुख्याध्यापक असल्याची माहिती मिळाली. भारत

MB NEWS-महाराष्‍ट्राच्‍या संयमाची परीक्षा बघू नका : शरद पवारांचा कर्नाटकच्‍या मुख्‍यमंत्र्यांना इशारा

इमेज
  महाराष्‍ट्राच्‍या संयमाची परीक्षा बघू नका : शरद पवारांचा कर्नाटकच्‍या मुख्‍यमंत्र्यांना इशारा  कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेली वक्तव्ये बेजबाबदार आहेत.  सीमाप्रश्नाला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्नाटकच्‍या मुख्‍यमंत्र्यांनी महाराष्‍ट्राच्‍या संयमाची परीक्षा बघू नये, असा इशारा असा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्‍हणाले,  सीमाभागात आज घडलेला प्रकार  निषेधार्थ आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नावर आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह, नेत्यांनी एकत्र येत, यावर मार्ग काढावा, असे आवाहनही त्‍यांनी केले. …तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते सीमाभागात महाराष्‍ट्रातील वाहनांवर होणारे हल्‍ले २४ तासांमध्‍ये थांबले पाहिजेत. नाहीतर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशारा देत अशा प्रकारचे हल्ले म्हणजे देशाच्या एकात्मतेवरील हल्ला आहे, असेही पवार म्‍हणाले. या प्रश्‍नी केवळ बघ्याची भूमिका न घेता आता ठोस कृती करावी, असे आवाहन

MB NEWS-ATM मधून पैसे नाही चक्क निघतंय सोनं; विश्वास बसत नाही तर वाचा हे.....

इमेज
  ATM मधून पैसे नाही चक्क निघतंय सोनं; विश्वास बसत नाही तर वाचा हे..... ATM मधून सोनं येणार अशी एक यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. हे वाचून तुमचंही डोकं चक्रावलं ना, पण होय असं खरंच घडलं आहे. आतापर्यंत तुम्ही पैशांसाठी ATM चा वापर केल्याचं ऐकलं असेल. ATM मधून पैसेही निघतात हे देखील माहिती असेल. देशात पहिल्यांदाच ATM मधून सोनं येणार अशी एक यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. हे वाचून तुमचंही डोकं चक्रावलं ना, पण होय असं खरंच घडलं आहे. ATM पैसे बाहेर पडताना तुम्ही पाहिले असतील. आता एक सुविधा सुरू करण्यात आली आहे, ज्याद्वारे तुम्हाला एटीएममधून सोनं काढता येणार आहे. खरं तर, तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये पहिलं रिअल टाइम गोल्ड एटीएम बसवण्यात आलं आहे. रिअल टाइम गोल्डच्या या एटीएममधून सोन्याची नाणी काढता येणार आहेत. गोल्डसिक्का प्रायव्हेट लिमिटेड या हैदराबाद येथील कंपनीने ओपनक्युब टेक्नॉलॉजीजच्या मदतीने हे एटीएम तयार केलं आहे. एटीएमद्वारे सोन्याची नाणी खरेदी करण्यासाठी ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा उपयोग करता येणार आहे. सोने खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या गोल्डसिक्काचे सीईओ सी. तरुज यांच्या

MB NEWS-जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या वराबाबत धक्‍कादायक माहिती उजेडात

इमेज
  जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या वराबाबत धक्‍कादायक माहिती उजेडात गेले काही दिवस राज्यभर एका लग्नाची गोष्ट खूप चर्चेत आहे. एका तरुणाशी उच्चशिक्षित जुळ्या बहिणींनी एकच मांडवात लग्न केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राज्यभर या लग्‍नाची चर्चा सुरु झाली. सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. या प्रकरणी पोलिसांनी वरावर गुन्‍हा दाखल केला आहे. तसेच राज्‍य महिला आयोगाने त्‍याला नोटीसही बजावली आहे. आता या कहानीमध्‍ये ट्विस्ट आलं आहे.   एकाच मांडवात   जुळ्या बहिणींशी  विवाह सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथील अतुल अवताडे नावाच्या तरुणाने कांदिवली मधील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींशी लग्न एकाचवेळी केलं. त्या दोघी मुंबईतील आयटी कंपनीत इंजिनीअर आहेत. हा विवाह शुक्रवारी (दि.२) अकलूज-वेळापूर रोडवरील एका कार्यालयात झाला होता. वरमाला घालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलं झाला आणि या लग्‍नाची चर्चा सगळीकडे सुरु झाली. अतुल हा मुंबई येथे ट्रॅव्हल्स एजन्सीचा व्यवसाय करतो. काही महिन्यापुर्वी  पिंकी आणि रिंकी यांच्या आईची तब्येत बिघडली तेव्हा अतुलने त्यांना मदत केली

MB NEWS-महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न चिघळला, कन्नड रक्षण वेदिकेकडून महाराष्ट्राच्या ६ ट्रक्‍सवर दगडफेक

इमेज
  महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न चिघळला, कन्नड रक्षण वेदिकेकडून महाराष्ट्राच्या ६ ट्रक्रवर दगडफेक बेळगाव : कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांकडून महाराष्ट्र पासिंग असणाऱ्या मालवाहू 6 ट्रक्सवर दगडफेक केल्याची घटना नुकताच घडली आहे. बेळगाव जवळील पुणे- बंगळूर महामार्गावरील हिरेबागेवाडी टोलनाक्यावर सदर घटना घडली आहे. यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. महामार्गावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्र पासिंगच्या ट्रक्सवर दगडफेक करण्यात आली आहे. जवळपास ६ ट्रक्‍सवर दगडफेक करून शाहीफेक करण्यात आली आहे. यामुळे सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे. न्यायप्रविष्‍ट प्रकरणाबाबत अशा घटना घडत असतील तर हे निषेधार्ह आहे. कर्नाटक सरकारने दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्‍ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. दरम्यान, सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांचा आज (मंगळवार) होणारा बेळगाव दौरा रद्द झाला असला, तरी कर्नाटक सरकारने खबरदारी घेतली असल्‍याचे दिसून येत आहे. कर्नाटकच्या पोलिसांकडून कर्नाटक-महाराष्ट्रच्या कोगनोळी सीमेवर खबरदारी घेत प्रवेश करणाऱ्य

MB NEWS-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या समाजाला प्रेरणादायी--प्राचार्य डॉ डी व्ही मेश्राम

इमेज
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या समाजाला प्रेरणादायी--प्राचार्य डॉ डी व्ही मेश्राम  परळी प्रतिनिधी ---जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी व्हि मेश्राम यांनी थोर महापुरुषांच्या विचाराचा हा मुद्दा सांगत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या समाजाला प्रेरणादायी आहेत असे उद्गार काढले. .    कार्यक्रमाच्या व्यासपीठावर  महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. डी व्हि मेश्राम, इतिहास विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब शेप, कार्यालयीन प्रमुख श्री अशोक रोडे, प्रर्यवेक्षक प्रा  मंगला पेकमवार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात डॉ बाबासाहेब शेप यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आथांग महासागरासारखे आहे, असे सांगून त्यांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले आहेत ज्ञानाचा सागर म्हणून देखील त्यांची गणना भारताच्या इतिहासात झालेली आहे असे सांगितले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य, डॉ मेश्राम बोलताना म्हणाले की, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, रा

MB NEWS-नाथ्रा येथे मराठी ग्रामिण साहित्य संमेलनानातील विविध पुरस्कारासाठी 16 डिसेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवा - डॉ.एकनाथ मुंडे

इमेज
  नाथ्रा येथे मराठी ग्रामिण साहित्य संमेलनानातील विविध पुरस्कारासाठी 16 डिसेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवा - डॉ.एकनाथ मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  श्रीनाथ मानव सेवा मंडळाच्या वतीने सहावे मराठी ग्रामिण साहित्य संमेलनाची नाथ्रा येथे मंगळवार दि. 3 जानेवारी 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे. तसेच या संमेलनात विविध क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मान देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तरी ग्रामिण मराठी साहित्य संमेलनातील पुरस्कारसाठी प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन संयोजक डॉ.एकनाथ मुंडे नाथ्राकर यांनी केले आहे.    याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामीण मराठी साहित्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी व ग्रामीण साहित्याची ओळख आणि महत्व अखंड राहण्यासाठी साहित्य रसिकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी श्रीनाथ मानव सेवा मंडळाने डॉ. एकनाथ मुंडे यांच्या  मुख्य संयोजनातून गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केलेले आहे. आज पर्यंत संस्थेने पाच ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन करून परिसरातील  आणि विविध जिल्ह्यातील नवोदित कवी, लेखक, साहित्यिक

MB NEWS-..तर धर्मांतर हे थेट संविधानाविरुद्ध; सर्वोच्च न्यायालयाचे मत

इमेज
  ..तर धर्मांतर हे थेट संविधानाविरुद्ध; सर्वोच्च न्यायालयाचे मत         नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  सक्तीचे धर्मांतर, फूस लावून धर्मांतर, सामूहिक मोहीम म्हणून धर्मांतर करणे असे सगळेच प्रकार गंभीर आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा एकदा अधोरेखित केले. त्याचबरोबर अशा प्रकारे धर्मांतरे होत असतील तर ही बाब नुसती गैर नाही, तर ती थेट संविधानाविरुद्ध आहे, असे स्पष्ट मतही न्यायालयाने व्यक्त केले. अ‍ॅड. अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. भीती दाखवून, धोका देऊन, आमिष दाखवून एखाद कट रचल्यासारखे पार पाडले जाणारे धर्मांतर बेकायदा ठरवून त्याविरोधात कृती कार्यक्रम राबविण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना द्यावेत, अशी मागणी अ‍ॅड. उपाध्याय यांनी या याचिकेतून केली आहे. केंद्र सरकारलाही त्यावर न्यायालयाने नोटीस बजावली होती. अशा पद्धतीने होणार्‍या धर्मांतरांसंदर्भात सर्व राज्यांकडून आम्ही माहिती संकलित करत आहोत, असे स्पष्टीकरण त्यावर केंद्राच्या वतीने न्यायालयात देण्यात आले. न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार यांच्

MB NEWS-राज्यावर वीज दरवाढीचे संकट; प्रतियुनिट १ रुपया ३० पैसे दरवाढीची शक्यता

इमेज
  राज्यावर वीज दरवाढीचे संकट; प्रतियुनिट १ रुपया ३० पैसे दरवाढीची शक्यता मुंबई :  महावितरण व महानिर्मिती या कंपन्यांची अकार्यक्षमता, वीजचोरी आणि खासगी कंपन्यांकडून जादा दराने वीज खरेदी केली जात असल्यामुळे राज्यावर वीज दरवाढीचे संकट निर्माण झाले आहे. ही दरवाढ ७५ पैसे ते १ रुपया ३० पैसे प्रति युनिटपर्यंत होऊ शकते, असे राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सोमवारी सांगितले. दरनिश्चिती विनिमयानुसार महावितरण कंपनीने दरवाढीसाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेची राज्यात महसुली विभागात सहा ठिकाणी सुनावणी होईल. त्यानंतर मार्च २०२३ अखेरपर्यंत निर्णय होईल, आणि एप्रिल २०२३ पासून पुढील दोन वर्षांसाठी ती लागू होईल, असे त्यांनी सांगितले. महावितरणकडून विजेची गळती १४ टक्के असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात गळती ३० टक्क्यांहून अधिक आहे. ही गळती म्हणजे आयोगानेच केलेल्या व्याख्येनुसार चोरी आणि भ्रष्टाचार आहे. शेती पंपांचा वीज वापर १५ टक्केऐवजी ३० टक्के दाखवून चोरी लपवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अदानी पॉवर कंपनीने चेंज इन लॉ म्हणजे कायद्यातील बदल या करारातील कलमाचा आधार घेऊन २

MB NEWS-मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे गावकऱ्यांचे आवाहन

इमेज
 ● मांंडवा येथे उद्या प्रसिद्ध काळभैरव यात्रोत्सव मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे गावकऱ्यांचे आवाहन परळी-वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मांडवा येथे मार्गशिष पोर्णिमेला काळभैरवाची मोठी यात्रा भरते. या यात्रेला दरवर्षी मराठावाड्यासह आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी. परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. आंध्रप्रदेशातील लभान समाजातील भाविक काळभैरवाला आपले कुलदैवत मानत असल्याने  मोठ्या प्रमाणात हे भाविक यात्रोत्सवास आवर्जून उपस्थित राहतात.मांंडवा येथे उद्या (दि.७)  प्रसिद्ध काळभैरव यात्रोत्सव असुन मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन मांडवा गावकऱ्यांनी केले आहे.       प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही ग्रामस्थांच्या वतीने भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या बुधवार दि.७ रोजी सकाळी ८ ते १० श्री रामकथेची सांगता तद्नंतर भव्य यात्रोत्सव व पारंपरिक पालखी मिरवणूक आणि मंदिर प्रदक्षिणा होईल व दु. १ ते ३ वाजता ह.भ.प विठ्ठल महाराज उखळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने यात्रोत्सवाचा समारोप होईल. या कार्यक्रमासाठी विविध श्रेञातील मान्यवर व साधूसंतांची उपस्थिती लाभणार आहे. भाविकांनी भव

MB NEWS-ग्रामपंचायत निवडणूक: परळी तालुक्यात छाननीमध्ये एकूण 30 अर्ज बाद ; उमेदवार व उमेदवार प्रतिनिधींची मोठी गर्दी

इमेज
  ग्रामपंचायत निवडणूक: परळी तालुक्यात छाननीमध्ये एकूण 30 अर्ज बाद ; उमेदवार व उमेदवार प्रतिनिधींची मोठी गर्दी परळी वैजनाथ ,प्रतिनिधी ..           परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज दि. 5 रोजी झालेल्या छाननीअंती एकूण 30 अर्ज बाद झाले. तहसील कार्यालय येथे आयोजित छाननी प्रक्रियेसाठी उमेदवार व उमेदवार प्रतिनिधींची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.         परळी तालुक्यातील एकूण 80 ग्रामपंचायतीसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. 80 ग्रामपंचायतीं मध्ये एकूण 263 प्रभागाची संख्या आहे. अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत प्राप्त अर्जांची संख्या सरपंच पदासाठी 547 तर सदस्य पदासाठी 2418 एवढी संख्या होती. छाननीअंती एकूण सरपंच पदाचे 4 अर्ज तर सदस्य पदाचे 26 अर्ज अवैध ठरले आहेत. छाननीअंती एकूण वैध उमेदवारांची संख्या 493 तर सदस्य पदासाठी 2297 अर्ज राहिले आहेत. दिनांक 7 डिसेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. दरम्यान आज छाननीच्या वेळी उमेदवार व उमेदवार प्रतिनिधींनी मोठी गर्दी केली होती. 29 टेबलावर एकूण 80 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली.

MB NEWS-पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचार्‍यास दहा हजाराची लाच घेताना पकडले

इमेज
  पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचार्‍यास  दहा हजाराची लाच घेताना पकडले बीड :  विनयभंगाच्या गुन्ह्यात बी फायनल पाठवण्यासाठी तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. पैकी 15 हजारांची लाच स्विकारताना शिवाजीनगर ठाण्यातील उपनिरीक्षकासह एका पोलीस कर्मचार्‍यास सोमवारी (दि.5) रात्री आठच्या सुमारास बसस्थानकासमोरील हॉटेलात रंगेहाथ पकडले. ही कारवाई औरंगाबाद येथील एसीबीच्या टिमने केली.  तक्रारदाराला विनयभंगाचा गुन्हा बी फायनल करण्यासाठी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यातील दहा हजार रुपये तक्रारदाराकडून यापुर्वीच आरोपींनी घेतलेले आहेत. तर त्यातील 15 हजाराची लाच घेताना शिवाजीनगर ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक राजु गायकवाड व पोलीस कर्मचारी विकास यमगर या दोघांना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई शहरातील बसस्थनका समोरील हॉटेलात करण्यात आली. ही कारवाई औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टिमने केली आहे. दोन्ही आरोपींना एसीबीने ताब्यात घेत बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात नेवून चौकशी केली. त्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर

MB NEWS-अंबाजोगाई ग्रामीण रूग्णालयास खा.डॉ.प्रितमताई मुंडेंची सरप्राईज व्हिजिट

इमेज
  अंबाजोगाई ग्रामीण रूग्णालयास खा.डॉ.प्रितमताई मुंडेंची सरप्राईज व्हिजिट अंबाजोगाई(प्रतिनिधी)-येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रूग्णालयात बाह्य रूग्णालय कक्षाच्या स्वच्छता गृहात नवजात अर्भक प्रकरण उघडकीस येवुन देखील प्रशासनाने गांभीर्य घेतले नसल्याचे लक्षात येताच जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी काल अचानक सरप्राईज व्हिजिट देत दबंगगिरी दाखवताना रूग्णालय प्रशासन धारेवर धरले. या संपुर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी शिवाय पोलीसांनीही वेगाने तपास करून सत्य बाहेर आणण्याच्या सुचना त्यांनी केल्या.दरम्यान एवढ्या मोठ्या रूग्णालयात बाहेरच्या महिला येवुन असा प्रकार करत असतील तर लाजीरवाणी गोष्ट आहे. या घटनेनंतर अनेक प्रश्न समोर येवु शकतात. सरप्राईज व्हिजिटमध्ये खासदारांनी एमआरआय मशिन विभागाची पहाणी करत लवकर कार्यान्वित करण्याच्याही सुचना केल्या. बीड जिल्ह्याच्या खासदारांची ओळख दबंग खासदार म्हणुन यासाठीच म्हणावी लागेल.कारण एखाद्या प्रश्नावर कुणी लक्ष घालत नसेल तर तिथे खासदारांचा पाय पडल्याशिवाय रहात नाही. काल अचानक कुणाला कल्पना न देता रूग्णालयात त्यांच्या गाडीचा ताफा आला. थेट अधिष्ठाता

MB NEWS-वैद्यनाथ कॉलेजमध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धाचे आयोजन

इमेज
  वैद्यनाथ कॉलेजमध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धाचे आयोजन   परळी, प्रतिनिधी ---     वैद्यनाथ कॉलेजमध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त वादविवाद स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.    जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या 73 व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे सभागृहात दि.9 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी अकरावी ते पदवी स्तरावरील सर्व विद्यार्थी सहभागी होतील.  .    या स्पर्धेत सर्वांगीण गुण मिळविणाऱ्या संघास सांघिक पारितोषिक तसेच वैयक्तिक पारितोषिके प्रथम रुपये 7000 , द्वितीय रुपये 5000 ,तृतीय रुपये 3000 आणि रुपये 1000 चे उत्तेजनार्थ बक्षीस देणार देण्यात येणार आहेत. स्पर्धेचा विषय महापुरुषांचे विचार हरवत चालले आहेत/ नाहीत असा आहे .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जवाहर शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. सुरेश चौधरी, कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल एस मुंडे उपस्थित रा