प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS- लग्नकार्यातील जेवणातून ५० महिलांना विषबाधा

 लग्नकार्यातील जेवणातून ५० महिलांना विषबाधा



अंबाजोगाई तालुक्यातील गीत्ता येथील घटना


अंबाजोगाई - लग्नकार्यानिमित्त सुवासिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या जेवणातून जवळपास ५० महिलांना विषबाधा झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील गीत्ता येथे मंगळवारी (दि.०६) घडली. सुदैवाने सर्व बाधित महिलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. 


     गीत्ता येथील तरुणाचा येत्या शुक्रवारी विवाह आहे. यानिमित्ताने सोमवारी (दि.०५) भावकीतील महिलांसाठी सुवासिनींचे जेवण आयोजित करण्यात आले होते. सोमवारी दुपारी गावातील जवळपास शंभर महिलांनी या कार्यक्रमात जेवण केले. दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यातील काही महिलांना विषबाधेची लक्षणे दिसू लागली. दुपारनंतर बाधित महिलांची संख्या वाढल्याने त्यापैकी ३६ महिलांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर काही महिलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, सर्व महिलांची परिस्थिती धोक्याबाहेर असल्याची माहिती स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. सध्या स्वाराती रुग्णालयात संध्या दिनेश शिंदे (३५), नीता भागवत शिंदे (४१), अनिता प्रदीप शिंदे (४५), श्रद्धा राजेश शिंदे (३०), सुवर्णा मुरलीधर शिंदे (४०), झुंबर सिद्धलिंग शिंदे (४०), संगीता रामलिंग शिंदे (४०), शीतल श्रीधर शिंदे (४०), सुनिता दशरथ शिंदे (३०), मीनाक्षी मधुकर शिंदे (४५), वर्षा राम शिंदे (४५), रोहिणी परमेश्वर शिंदे (३०), मनीषा गणेश धुमाळ (२९), कविता बाळासाहेब शिंदे (४०), अनिता दिपक शिंदे (४५), जान्हवी राजेश शिंदे (१२), प्रभावती वसंत शिंदे (५२), सुरेखा अरविंद शिंदे (४०), ज्ञानेश्वरी नरसिंग शिंदे (३१), माया संतोष शिंदे (४०), देवकन्या चंद्रकांत शिंदे (४२), मीना पांडुरंग शिंदे (५०), शेषाबाई बाळासाहेब शिंदे (५५), कान्हाबाई शेषेराव शिंदे (६५), मंदोदरी रामराव शिंदे (६०), सुमन विलास शिंदे (५०), अर्चना राजेश शिंदे (४०), सक्षमबाई शाहूराव शिंदे (६०), संगीता विलास शिंदे (४५) अलका सतीश शिंदे (३५), रतनबाई विष्णू शिंदे (६०), स्वाती उमेश शिंदे (२२) आणि काव्या उमेश शिंदे (४०) या महिलांवर उपचार सुरु आहेत. 


आ. धनंजय मुंडे यांची तत्परता....

घटनेची माहिती मिळताच आ. धनंजय मुंडे यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक खंडू गोरे यांना तातडीने स्वाराती रुग्णालयात पाठवून रुग्णांना मदत करण्याबाबत सूचना केल्या. अधिष्ठाता डॉ. खैरे यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सर्व रुग्णांना वार्डात दाखल करेपर्यंत आ. मुंडे दूरध्वनीवरून सर परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. 


स्वाराती मधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कर्तव्यतत्परता....

अचानकच मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्यानंतरही स्वाराती रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सर्व रुग्णांना तत्पर सेवा दिली. तातडीने उपचार करून काही रुग्णांना सुटीही देण्यात आली तर काही रुग्णांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. यावेळी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, अधीक्षक डॉ. राकेश जाधव, डॉ. विनोद वेदपाठक, डॉ. नागेश अब्दागीरे, डॉ. राहुल मुंडे यांच्यासह अपघात विभागातील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी यांनी रुग्णांवर विशेष लक्ष दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या