MB NEWS-सरकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती 8 डिसेंबरला साजरी करण्याचे श्री शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन

 सरकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती 8 डिसेंबरला साजरी करण्याचे श्री शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन




परळी वैजनाथ ता.०६ (प्रतिनिधी)

       श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबरला सर्व शासकीय,निम शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने परित्रक काढले आहे. त्यामुळेे तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यात यावी असे आवाहन तेली युवक संघटना व शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

         सदुंबरे जिल्हा पुणे येथील श्री संताजी जगनाडे महाराज हे तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यातील प्रमुख टाळकरी होते. तसेच तुकाराम महाराजांची मुळ गाथा पाण्यात टाकण्यात आली होती. ती संपूर्ण गाथा श्री.जगनाडे महाराजांना मुखोद्गत होती. त्यांनी ही गाथा पुन्हा लिहून काढली. त्यामुळे श्री.संताजी जगनाडे महाराजांना मानणारा मोठा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात आहे. गुरुवारी (ता.०८) संताजी महाराजांचा जन्म दिवस साजरा करण्यात येतो. यासंदर्भात गेल्या वर्षी पासून महाराष्ट्र शासनाने परित्रकात उल्लेख केला आहे. यंदाही महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी संदर्भात परिपत्रक जारी केले असून यामध्ये सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयात ८ डिसेंबरला संताजी महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात ही जयंती साजरी करण्यात यावी असे आवाहन तेली युवक संघटना व शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !