MB NEWS-स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजु रुग्णाला व्हील चेअर आणि एअर बेड प्रदान

 स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजु रुग्णाला व्हील चेअर आणि एअर बेड प्रदान



परळी वैजनाथ,प्रतिनिधी...

    सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहून गरजुंना मदतीचा हात देणाऱ्या  स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजु रुग्णाला व्हील चेअर आणि एअर बेड प्रदान करण्यात आले.

      भीमनगर मधील संतोष दत्तात्रय धाटे या युवकाचा एक महिन्यापूर्वी गंभीर अपघात होवून मेंदूला मार लागल्याने पाय अधू झाले आहेत.पुणे येथे दीर्घ उपचार होवून सध्या संतोष धाटे यांच्यावर फिजीओथेरपी चालू आहे.धाटे कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बिकट असून संतोषसाठी व्हील चेअर आणि एअर बेड घेणे आवश्यक होते ही बाब माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना भीमनगर मधील सहकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली.


        त्या अनुषंगानेआज स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संतोष यांचे वडील दत्तात्रय धाटे यांना संतोषसाठी व्हील चेअर आणि एअर बेड देण्यात आला.यावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी, भागवत कसबे,सुभाष कांबळे,प्रताप समिंदरसवळे धोंडीराम धोत्रे,निलेश वाघमारे,दादा चिमणी आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार