MB NEWS-पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचार्‍यास दहा हजाराची लाच घेताना पकडले

 पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचार्‍यास दहा हजाराची लाच घेताना पकडले




बीड :

 विनयभंगाच्या गुन्ह्यात बी फायनल पाठवण्यासाठी तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. पैकी 15 हजारांची लाच स्विकारताना शिवाजीनगर ठाण्यातील उपनिरीक्षकासह एका पोलीस कर्मचार्‍यास सोमवारी (दि.5) रात्री आठच्या सुमारास बसस्थानकासमोरील हॉटेलात रंगेहाथ पकडले. ही कारवाई औरंगाबाद येथील एसीबीच्या टिमने केली. 


तक्रारदाराला विनयभंगाचा गुन्हा बी फायनल करण्यासाठी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यातील दहा हजार रुपये तक्रारदाराकडून यापुर्वीच आरोपींनी घेतलेले आहेत. तर त्यातील 15 हजाराची लाच घेताना शिवाजीनगर ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक राजु गायकवाड व पोलीस कर्मचारी विकास यमगर या दोघांना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई शहरातील बसस्थनका समोरील हॉटेलात करण्यात आली. ही कारवाई औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टिमने केली आहे. दोन्ही आरोपींना एसीबीने ताब्यात घेत बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात नेवून चौकशी केली. त्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?