इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS-श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळीचा उपक्रम

 राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व श्री दत्त जन्मोत्सव निमित्त श्री शनि मंदिरात खिचडी वाटप

श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळीचा उपक्रम


परळी वैजनाथ / प्रतिनिधी


वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक पोर्णिमेनिमित्त श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळी वैजनाथच्या वतीने खिचडी प्रसादाचे आयोजन भाविक-भक्तांसाठी करण्यात येते तसेच बुधवारी आलेल्या श्री दत्त जन्मोत्सव निमित्त दुहेरी योग साधत भाविकांना खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले. श्री दत्त जन्मोत्सव निमित्त श्रीं च्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी बुधवार दि. 7 डिसेंबर 2022 रोजी झाली होती. 

श्री भगवान शनैश्वर व वसुंधरारत्न राष्ट्रसंत सद्गुरु  डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रतिमेचे यावेळी तपोनुष्ठान समितीच्या वतीने वतीने पुजन श्री.नरेश साखरे, श्री.चंद्रकांत उदगीरकर व श्री.वैजनाथआप्पा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री दत्त जन्मोत्सवच्या अनुषंगाने श्री शनि मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून खिचडी वाटप करण्यात आली. हजारो भाविक भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला. वसुंधरारत्न डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमपुरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ तपोनुष्ठान समितीच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित भाविकांनी आपल्या गुरूंचे मनोभावे दर्शन घेत श्रीं चे आशिर्वाद प्राप्त केले. भाविकांनी यावेळी आरती कार्यक्रमातही सहभाग घेतला.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परळी येथील ८२ व्या श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे,  उपाध्यक्ष चंद्रकांत उदगीरकर, प्रसिद्ध व्यापारी वैजनाथअप्पा कोल्हे, कार्याध्यक्ष शाहूराव ढोबळे,  रमेश सपाटे,वैजनाथ बागवाले, गिरीष बेंबळगे, सचिव संतोष पंचाक्षरी, सोमनाथ निलंगे,नंदकुमार खानापुरे,अशोक नावंदे, सोमनाथ गोपनपाळे,सदानंद चौधरी, ओमप्रकाश बुरांडे,संजय खाकरे,दयानंद चौधरी, वैजनाथ निलंगे,वैजनाथ शेटे,अॅड. गिरीष नरवणे, चंदूअप्पा हालगे,मकरंद नरवणे,सचिन काटकर, जगदीश मिटकर, रवी मिसाळ,अरविंद चौधरी, प्रा.अमर आलदे,कैलास रिकीबे,राजाभाऊ हलकंचे, रमेश चौधरी सर,उमाकांत काळे,गजानन हालगे,बाबासाहेब शिगे, रमेश काळे,प्रकाश खोत,संतोष चौधरी,चंद्रशेखर फुटके, बाबासाहेब चौधरी, विश्वनाथअप्पा लव्हराळे,डॉ.योगीराज बर्दापुरे,संदीप तिळकरी सर,चंद्रकात अंदुरे,शिवशंकर नाईक,शिरीष सलगरे, अनिल चौधरी, नागेश अलबिदे,मन्मथ नरवणे, कपील चौधरी,शिवदीप चौंडे,संदीप चौधरी,मनोज बेंबळगे,संतोष जुजगर,अमोल घेवारे,रत्नेश बेलुरे,निरंजन गौरशेटे,अविनाश चौधरी, सतीश कापसे,नंदूअप्पा शेटे,अशोकअप्पा झाडे, जगदीश महागांवकर, संजय कोरे आदींनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या