प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सुशोभीकरण करा- अनंत इंगळे

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सुशोभीकरण करा-  अनंत इंगळे



परळी (प्रतिनिधी.)   शहरातील रेल्वे स्थानका समोरील तसेच बस स्टँड कडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सूशोभिकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस परळीचे सरचिटणीस अनंत इंगळे यांनी परळी नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रति माजी मंत्री आ.धनंजय मुंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वाल्मीक अण्णा कराड यांनाही देण्यात आल्या आहेत.

      याबाबत अनंत इंगळे यांनी परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परळी शहरातील विविध चौकांचे नगरपालिकेच्या वतीने जसे सुशोभीकरण करण्यात आले. तसेच सुशोभीकरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाचे ही करावे.

     परळी बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच रेल्वे स्थानकाच्या समोरील मुख्य रस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आहे. अनेक वर्षापासून हा चौक अस्तित्वात आहे. परळी शहरात मौलाना आझाद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तसेच इटके कॉर्नरला असणाऱ्या संभाजी चौक आदि चौकांचे नगरपालिकेच्या वतीने सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. अशाच प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे नगरपालिकेने सुशोभीकरण करण्याची मागणी ही अनंत इंगळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना केली आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी मुळे, तकी खान तसेच धम्मा अवचारे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या