पोस्ट्स

चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाबद्दल परळीत तिरंग्याची मिरवणूक काढत नागरिकांचा जल्लोष

इमेज
 ' आपला भाऊ सोमनाथ भाऊ' अशा आगळ्या वेगळ्या घोषणा देत शास्त्रज्ञांचे नागरिकांनी केले अभिनंदन चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाबद्दल परळीत तिरंग्याची मिरवणूक काढत नागरिकांचा जल्लोष परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा..        संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान ३ मोहिम आज यशस्वी झाली. या गौरवशाली क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी नागरिकांकडून शहरांत मिरवणूक काढून राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. यावेळी पेढे भरवत शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने झाली. सायंकाळी  सहाच्या सुमारास विक्रम लँडर चंद्रावर सुखरूप उतरल्याचे इस्रोने जाहीर केले त्यांनंतर राणी लक्ष्मीबाई टॉवर समोर चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाबद्दल नागरिकांनी आज ढोल ताशांच्या गजरात नाचून आनंदोत्सव साजरा केला.  आपला भाऊ सोमनाथ भाऊ 'आपला भाऊ सोमनाथ भाऊ' अशा आगळ्यावेगळ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. इस्रोचे चेयरमन एस सोमनाथ व त्यांच्या शास्त्रज्ञ सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन ही मोहीम यशस्वी केली त्यामुळे त्या सर्वांचे अभिनंदन करत त्यांचा जयघोष केला गेला. जब तक सूरज चा

Chandrayaan-3 mission: चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करणारे 'ही' आहेत उपकरणे

इमेज
  Chandrayaan-3 mission: चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करणारे 'ही' आहेत उपकरणे भारताच्या चांद्रयान-३ चे लँडर मॉड्यूल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरले. या मोहीमेच्या यशामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विश्वविक्रम रचला आहे. या मोहीमेच्या यशासाठी अनेक उपक्रमांचे योगदान महत्त्वाचे आहे. चांद्रयान-२ च्या अपयशानंतर भारताने या उपकरणांच्या रचनेमध्ये महत्वपूर्ण बदल करत चांद्रयान- ३ मधील उपकरणांची पुर्नरचना करत ही मोहिम फत्ते (Chandrayaan-3 mission) केली आहे. Chandrayaan-3mission: इंटिग्रेटेड मॉड्यूल चांद्रयान-३ मोहीमेत इंटिग्रेटेड मॉड्यूल तयार करण्यात आले आहे होते. यामध्ये लँडर मॉड्यूल (LM) + रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल (PM) या दोन वेगळ्या उपकरणांचा समावेश होता. हे इंटिग्रेटेड मॉड्यूल भारताचे बाहुबली रॉकेट LVM च्या सहाय्याने २४ जुलै रोजी चंद्राच्या दिशेने श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले. त्यानंतर विविध टप्पे पार करत आज अखेर भारताची चांद्रयान- ३ ही मोहिम यशस्वी झाली आहे. ही मोहीम फत्ते करण्यासाठी या उपकरणां महत्त्वाची भूमिका (Chandrayaan-3 mission बजावली. LVM रॉकेट आ

Chandrayaan-3 मोहिमेचे 'हे' आहेत 'शिल्पकार', जाणून घ्या सविस्तर

इमेज
  Chandrayaan-3 मोहिमेचे 'हे' आहेत 'शिल्पकार', जाणून घ्या सविस्तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज इतिहास घडविला. चांद्रयान-३ मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथम चांद्रयान उतरवणारा देश, अशी भारताची ओळख झाली आहे. या ऐतिहासिक यशाचे शिल्पकारांविषयी जाणून घेण्यास उत्सुक असाल. चला तर चांद्रयान-३ मोहिमेच्या शिल्पकारांविषयी जाणून घेवूया..... Chandrayaan-3 mission : इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान- ३ मोहिमेचे प्रमुख शिल्पकार हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस सोमनाथ यांना मानले जाते. त्यांनी जानेवारी २०२२ मध्ये संस्थेचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हीएसएससी) आणि लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरचे संचालक म्हणून काम केले. चांद्रयान-३ सोबतच आदित्य-एल१ ते सूर्य आणि गगनयान (भारताची पहिली मानव मोहीम) यासारख्या इतर महत्त्वाच्या मोहिमा त्यांच्या देखरेखीखाली आहेत. प्रकल्प संचालक पी वीरामुथुवेल पी वीरामुथुवेल हे २०१९ मध्ये चांद्रयान- 3 प्रकल्पाचे संचालक झाल

LIVE:‘चांद्रयान- ३’

इमेज
थेट पहा:‘चांद्रयान- ३’  मोहिम https://www.youtube.com/live/DLA_64yz8Ss?feature=share प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे कार्य आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी करून दाखवले आहे. भारताचे ‘चांद्रयान- ३’  आज 6 वा. 4 मी. चंद्रावर उतरणार आहे. हा क्षण प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असेल. ही ऐतिहासिक घटना प्रत्येक भारतीयांना अनुभवता यावी यासाठी इस्त्रोच्या अधिकृत वेबसाईटवर पाहण्यासाठी खालील लिंकवर जावे व या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे. https://www.youtube.com/live/DLA_64yz8Ss?feature=share  

विद्यापीठ वर्धापन दिन

इमेज
  वैद्यनाथ कॉलेजमध्ये विद्यापीठ वर्धापन दिन साजरा परळी, प्रतिनिधी...         जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 65 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.आर डी राठोड यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रगीत, विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे सदस्य, डॉ.पी एल कराड,एन.सी.सी विभागाचे कॅप्टन प्रा.गणेश चव्हाण यांची उपस्थिती होती.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यात मिलिंद महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणाचा विस्तार घडून आणला. त्यानंतर मराठवाड्यात इ. स.1958 मध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेनंतर मराठवाड्याचा शैक्षणिक विकास व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यास  प्रारंभ झाला असेच म्हणावे लागेल.हा कार्यक्रम करण्यासाठी एन.सी.सी विभागाचे सहकार्य लाभले.त्याचबरोबर या दिनाचे औचित्य साधून रसायनशास्त्र विभागाच्या वतीने भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाविद्यालय

राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबीन क्लबचा उपक्रम

इमेज
न्यू हायस्कूल कॉलेजच्या रक्त तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद  राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबीन क्लबचा उपक्रम प्रतिनिधी (परळी वै.) : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व स्वामी विवेकानंद कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व महाराष्ट्र शासनाच्या रेड रिबीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन दि. 23 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.                                शहरातील थर्मल कॉलनी परिसरातील न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व स्वामी विवेकानंद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, पालक तसेच परिसरातील नागरिकांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर परळी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आय.सी.टी.सी. विभागाचे शरद चव्हाण, अमोल गालफाडे, अविनाश व्हावळे, प्राचार्य बी.ए. नाईकनवरे , प्राचार्या डॉ. वनमाला गुंडरे, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगरचे सदस

• राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने निवेदन

इमेज
 ■ महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय कार्यालय परळीमध्ये आणणार- धनंजय मुंडे • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने निवेदन  परळी वैजनाथ प्रतिनिधी         महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय कार्यालय परळीमध्ये आणणार असल्याचे अश्वासन राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी दिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने याबाबत आज ना.धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कार्यालय परळीमध्ये सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.              परळी औष्णिक विद्युत केंद्र,सिमेंट फॅक्टरी तसेच परिसरातील हजारो वीटभट्टी उद्योग वाढती वाहनांची संख्या यामुळे परळी शहर आणि परिसरात वायू प्रदूषण झपाट्याने वाढत असून डब्ल्यु एच ओ च्या वार्षिक गुणवत्ता मार्गदर्शक तत्वानुसार वायु गुणवत्ता निर्देशांक   हा ६ पट खराब आहे. ही गंभीर बाब निर्माण झालेली आहे. संभाजीनगर नंतर परळी वैजनाथ प्रदूषणाच्या बाबतीत आघाडीवर असणारे शहर आहे.पर्यावरणातील वाढते कार्बन मोनाक्साईड गंधक,यामुळे श्वसनाचे रोग,दमा,क्रॉनिक

वैद्यनाथ महाविद्यालयाला भेट

इमेज
 एन.सी.सी. कमांडिंग ऑफिसर कर्नल श्री.बी.सुनील रेड्डी  यांची वैद्यनाथ महाविद्यालयाला भेट परळी :  एन.सी.सी.51 महाराष्ट्र बटालियन छ. संभाजी नगर चे  कमांडिंग ऑफिसर कर्नल श्री.बी.सुनील रेड्डी  यांनी शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयाला भेट दिली यावेळी त्यांनी प्राचार्य व एन.सी.सी. अधिकाऱ्यांशी चर्चा केली तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एन.सी.सी.51 महाराष्ट्र बटालियन छ. संभाजी नगर चे  कमांडिंग ऑफिसर कर्नल श्री. बी.सुनील रेड्डी यांनी अंबेजोगाई सेक्टर अंतर्गत असलेल्या सर्व एन.सी.सी.विभागांना आज भेट दिली. या निमित्तानी  शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयाला त्यांनी भेट दिली असता एनसीसी विभागा तर्फे त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्री.आर.डी. राठोड सर यांनी कमांडिंग ऑफिसर कर्नल श्री.बी.सुनील रेड्डी यांचा सत्कार केला नंतर एन.सी.सी विभाग प्रमुख कॅप्टन श्री.जी.एस.चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.  कर्नल श्री. बी.सुनील रेड्डी यांनी मोठ्या संख्येत महाविद्यालयाचे विद्यार्थी सैन्य दलात सामील झाल्याबद्दल  महाविद्यालयाचे  कौतुक केले
इमेज
  चेक न वटल्या प्रकरणी निर्दोष मुक्तता परळी वैजनाथ, प्रतिनिधी चेक न वटल्या प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.     प्रकरणाची माहिती अशी की, प्रकरणातील आरोपी सूर्यकांत व्यवहारे यांनी फिर्यादी कडून सन 2016 मध्ये रु 500000 हात उसने घेतले आणि मुदतीनंतर रक्कम परत मागितली असता त्यांनी फिर्यादिस रु  500000 चा H D F C   बँक परळी वै चा चेक  दिनांक 4.7.2017  रोजीचा दिला, परंतु सदर चेक वठवण्यासाठी बँकेत जमा केला असता खात्यावर पुरेशी रक्कम नसल्यामुळे वठला नाही. म्हणून फिर्यादीने सदर आरोपीस नोटीस पाठवून रकमेची मागणी केली, तरीसुद्धा आरोपीने रक्कम न दिल्या मुळे , फिर्यादीने आरोपी विरुध्द कलम 138 चलनक्षम पत्र कायदा प्रमाणे मा. न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परळी वैजनाथ यांच्या न्यायालयात एस.एस.सी. क्र. 899/2017 दाखल केली,.         सदर केस मध्ये फिर्यादी च्या वतीने  तीन साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या, परंतु आरोपीच्या वतीने  फक्त त्यांचे उलट तपास घेण्यातआला , आणि दोन्ही पक्षांची बहस  ऐकून मा न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.      सदर निकाल दिनांक 18.8.23 रोजी देण्यात आला, प्रकरणात

शिवाजी,संभाजी,तानाजी नावांचे आधार कार्ड भुजबळांना पाठवले

इमेज
  परळी वैजनाथ मध्ये 'छगन ओळखपत्र बघ' म्हणत निषेध  आंदोलन मंत्री छगन भुजबळ यांच्या बेताल वक्तव्याचा घेतला समाचार शिवाजी,संभाजी,तानाजी नावांचे आधार कार्ड भुजबळांना पाठवले परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि.22 - वारंवार सरस्वती देवी तसेच ब्राह्मण समाजाबद्दल राज्य सरकार मधील मंत्री भुजबळ करत असलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या विरोधात सकल ब्राह्मण समाजाकडून 'छगन ओळखपत्र बघ' म्हणत व घोषणाबाजी करत तीव्र निषेध करण्यात आला. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात हे आंदोलन करण्यात आले. छगन भुजबळाना मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांना मंत्री पदावरून तात्काळ बाजूला करावे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी, तानाजी हे नाव दिसत नाहीत असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले होते. तसेच देवी सरस्वतीने किती व कोणत्या शाळा काढल्या असे विधानही त्यांनी केले होते. या वक्तव्यामुळे सकल ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. वारंवार सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य भुजबळ करत आहेत. त्यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अज

अमृतवाणीतून वेदज्ञानाची पर्वणी

इमेज
  आर्य समाजातर्फे परळीत २४ ऑगस्ट पासून श्रावणी वेदप्रचार सप्ताह  आचार्य सानंद शास्त्री व पं.अजय आर्य यांच्या अमृतवाणीतून वेदज्ञानाची पर्वणी      परळी वैजनाथ-दि.२२-                     मानवी जीवनाच्या सर्वांगीण कल्याणासाठी व शाश्वत सुख प्राप्तीसाठी वेदज्ञानाच्या माध्यमाने सर्वांना योग्य ती दिशा मिळावी, या उद्देशाने येथील आर्य समाजाच्या वतीने येत्या दि.२४ ते ३० ऑगस्ट या दरम्यान "श्रावणी वेदप्रचार सप्ताहा"चे आयोजन करण्यात आले आहे . यावर्षी श्रावणी या वेदप्रचार कार्यक्रमाकरिता वैदिक व्याख्याते म्हणून पानिपत (हरियाणा) येथील प्रसिद्ध  विद्वान आचार्य श्री सानंदजी शास्त्री यांना तर भजनोपदेशक म्हणून मेरठ (उ.प्र.) येथील प्रसिद्ध भजन गायक पं. अजय आर्य यांना आमंत्रित करण्यात आले आहे.          परळी येथील आर्य समाजाच्या सभागृहात संपन्न होणाऱ्या या दोन्ही वक्त्यांच्या रसाळ वाणीतून परळी शहर व पंचक्रोशीतील अध्यात्मप्रेमी श्रोत्यांना वेद ज्ञानाची अपूर्व मेजवानी लाभणार आहे ‌. या तज्ज्ञ विद्वानांची 'मानवी जीवनाचा शोध व बोध, सुसंस्कार, जीवन कसे जगावे ?,शाश्वत सुखाचा मार्ग ,अध्यात्म योग, जाग

संभाजी ब्रिगेडची मागणी

इमेज
  शासनाने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी : संभाजी ब्रिगेडची मागणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  जून - जुलै - ऑगस्ट महिन्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यावरच कशीबशी पेरणी झाली असून आज घडीस ऑगस्ट महिना संपत आला आहे. पाहिजे तसा पुरेसा पाऊस नसल्याकारणाने पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले असून सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस, मका या सर्व पिकांची वाढ खुंटली तर काही ठिकाणी पाण्याअभावी सर्व पिके करपून गेली आहेत. त्या कारणाने शेतकरी वर्ग पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला आहे. मागील वर्षीचे अनुदान वाटप करण्यात महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. मागील अनुदान व विमा अद्यापही मिळाला नाही. पशुधनाचा पिण्याच्या पाण्यासह चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे. त्याकरिता सरकारने तात्काळ पिकांचे पंचनामे करून अनुदान द्यावे. नसता संभाजी ब्रिगेड च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसीलदार परळी यांना निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

परळीतील फोटोग्राफीचा पुरस्काराने सन्मान

इमेज
  बेबी  मॅजिक च्या संचालिका सौ. संजीवनी भाले प्रथम पुरस्काराने सन्मानित परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     परळीत अगदी काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या आणि अल्पावधीत ग्राहकांची मने जिंकलेल्य Babymagic studio या फक्त नवजात शिशु व लहान बालकांच्या  फोटोसाठीच सुप्रसिद्ध असलेल्या स्टुडिओच्या संचालिका सौ. संजीवनी भाले यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.        नुकत्याच झालेल्या जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने नागपूर येथील AWPD  फाउंडेशन द्वारा आयोजित फोटोग्राफी स्पर्धेत सौ. संजीवनी भाले यांनी काढलेल्या फोटोला New Born Baby या वैशिष्ट्यपूर्ण विभागात संपूर्ण राज्यभरातून आलेल्या फोटो मधून प्रथम पुरस्कार मिळाला आहे.  फोटोग्राफीच्या क्षेत्रात सतत नवनवीन प्रयोग करणारे भाले फोटोग्राफीचे श्रीराम भाले यांच्या संजीवनी भाले या पत्नी असून परळी शहरातील प्रथम महिला फोटोग्राफर ठरल्या आहेत.  विशेष म्हणजे कालच या स्टुडिओने आपल्या Baby magic studio ची वेबसाईट लॉन्च केली आहे.  त्यांनी मिळवलेल्या या पुरस्काराने परळीची मान फोटोग्राफीच्या क्षेत्रात निश्चितच उंचावली आहे . परळीतील फोटोग्र

स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन दिली माहिती

इमेज
  पतीनेच केला पत्नीचा खून :स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन दिली माहिती नांदूरफाटा,बीड:- बीड तालुक्यातील धावज्याचीवाडी येथे अंगणवाडी सेविका मंगल गुंडिराम भोसले वय (४५) वर्षं यांचा सकाळी शेतात गोठ्यातीलजनावरे सोडवण्यासाठी गेल्या असता पती  गुंडीराम भोसले यांनी पाठीमाघुन येऊन लोखंडी खोऱ्याचा दांडा डोक्यात मारल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला .  जागेवर अक्षरक्षा डोक्याचा चिंधड्या केल्या घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता . पती आरोपी गुंडीराम भोसले वय (50) वर्षं यांनी नेकनुर पोलीस ठाण्यात येऊन मी स्वतः माझ्या बायकोला मारून टाकले आहे अशी माहिती दिली. चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. आयपीएस पंकज कुमावत , नेकनुर ठाण्याचे एपीआय विलास हजारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

सभेची जय्यत तयारी सुरू

इमेज
  राष्ट्रवादी काँग्रेसच्या रविवारी होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू, धनंजय मुंडेंनी केली सभास्थळाची पाहणी बीड (दि. 21) - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष खा.प्रफुल्ल पटेल, प्रांताध्यक्ष सुनील खा.तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत येत्या रविवारी (ता.27) रोजी बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे दुपारी 3 वा. जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून, या सभेची सध्या जोरदार व जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसत आहे.  सभास्थळाची आज ना.धनंजय मुंडे यांच्यासह सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानात जाऊन पाहणी केली. याठिकाणी पावसापासून सुरक्षित अशा भव्य वॉटर प्रूफ मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. यावेळी सुरक्षा, बैठक व्यवस्था, पार्किंग, येण्या व जाण्यासाठीचे मार्ग आदी बाबत धनंजय मुंडे यांनी संबंधितांना आवश्यक सूचना केल्या.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर आबा चव्हाण, परळी बाजार समितीचे सभापती स

किसान सभेची निदर्शने

इमेज
  पीक विम्याची अग्रीम तात्काळ मंजुर करा परळी / प्रतिनिधी        परळी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने तालुका प्रशासनाने तात्काळ अवर्षणग्रस्त तालुका म्हणून शासनास अहवाल पाठवावा व पीक विम्याची अग्रीम म्हणून पन्नास टक्के रक्कम मंजुर करावी यासह विविध मागण्यासाठी बीड जिल्हा किसान सभेच्या वतीने परळी तहसील कार्यालया समोर सोमवारी (ता.२१) दुपारी बारा वाजता तीव्र निदर्शने करण्यात आली.        केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेला ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करावा. सोयाबीन, कापुस, तुर या  धान्यास यांना शेतकऱ्यांना परवडेल असा भाव द्यावा. प्रशासनाने परळी तालुका अवर्षणग्रस्त असल्याचा अहवाल शासनास तात्काळ पाठवावा. अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांचे खरीप पिक कर्ज माफ करावे. खरीप पिकाची नुकसान झाल्यामुळे पिक विम्याची पन्नास टक्के रक्कम आग्रीम म्हणुन शेतकऱ्यांच्या  खात्यात जमा करावी. सन २०२२ मधील अतिवृष्टी अनुदानापासुन वंचित शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करावे. सन २०२० चा मंजुर पिक विमा त्वरीत वितरीत करावा. तालुक्यात लंपी स्किन रोगाचे लसीकरण युध्द पातळीवर करुन पशु संपती वाचवावी. दुष्काळसदृश शेतकऱ्यांना शासनाने तातडी

ना.धनंजय मुंडेंनी दिले प्रशासनाला निर्देश

इमेज
  वाण धरणात जेमतेम पाणीसाठा ;परळी शहर व ग्रामीण भागाची पाणीटंचाई टाळण्यासाठी जलआरक्षण करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन ना.धनंजय मुंडेंनी दिले प्रशासनाला निर्देश  परळी (प्रतिनिधी)  परळी शहरासह 15 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्या नागापुर येथील वाण धरणक्षेत्रात यावर्षी आत्तापर्यंत पाणीसाठा वाढेल असा पाऊस झालेला नसल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासुनये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतिने  उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देवुन पिण्याच्या पाण्यासाठी जलआरक्षण करावे अशी मागणी केली.या प्रश्नाबाबत राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क करुन माहिती दिली असता त्यांनी व्यवस्थित नियोजन करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनास दिले आहेत.      नागापुर येथील वाण धरणातुन परळी शहर व तालुक्यातील 15 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो.यावर्षी अत्यल्प पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात किंचितही वाढ झालेली नाही.सध्या वाण धरणात 5 द.ल.घ.मी.म्हणजेच केवळ 24 % पाणीसाठा शिल्लक आहे.धरणातील कमी होत चाललेली पाण्याची पातळी ही धोक्याची घंटा असून परतीचा पाऊस जर झाला नाही तर मोठे जलसंक

मुंडेंची भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीदिनी घोषणा

इमेज
  भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता खतांसाठीही 100% अनुदान मिळणार - धनंजय मुंडे 100 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद, आवश्यकता वाटल्यास तरतूद वाढविणार - मुंडेंची भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीदिनी घोषणा मुंबई (दि. 21) - महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यांसारख्या कामांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील 100% अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.  फळबाग लागवड अंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते, त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या दि

Photo Feature: छायाचित्रकार जयराम गोंडे स्माईल फोटो स्टुडिओ: संपूर्ण वैद्यनाथ दर्शन -आकर्षक सजावट

इमेज
  Photo Feature: छायाचित्रकार जयराम गोंडे स्माईल फोटो स्टुडिओ: संपूर्ण वैद्यनाथ मंदिर दर्शन - आकर्षक सजावट