इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

विद्यापीठ वर्धापन दिन

 वैद्यनाथ कॉलेजमध्ये विद्यापीठ वर्धापन दिन साजरा


परळी, प्रतिनिधी...

        जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 65 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.आर डी राठोड यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रगीत, विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे सदस्य, डॉ.पी एल कराड,एन.सी.सी विभागाचे कॅप्टन प्रा.गणेश चव्हाण यांची उपस्थिती होती.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यात मिलिंद महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणाचा विस्तार घडून आणला. त्यानंतर मराठवाड्यात इ. स.1958 मध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेनंतर मराठवाड्याचा शैक्षणिक विकास व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यास  प्रारंभ झाला असेच म्हणावे लागेल.हा कार्यक्रम करण्यासाठी एन.सी.सी विभागाचे सहकार्य लाभले.त्याचबरोबर या दिनाचे औचित्य साधून रसायनशास्त्र विभागाच्या वतीने भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. आर डी राठोड, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्या परिषदेचे सदस्य डॉ.पी एल कराड,उपप्राचार्य प्रा. हरीश मुंडे, डॉ. डी व्ही मेश्राम,डॉ.एम जी लांडगे, डॉ. अर्चना चव्हाण, डॉ. वीरश्री आर्या ,प्रा.गया नागोराव यांची उपस्थिती होती. या वर्धापन दिनाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्त्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या