इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

Chandrayaan-3 mission: चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करणारे 'ही' आहेत उपकरणे

 Chandrayaan-3 mission: चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करणारे 'ही' आहेत उपकरणे




भारताच्या चांद्रयान-३ चे लँडर मॉड्यूल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरले. या मोहीमेच्या यशामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विश्वविक्रम रचला आहे. या मोहीमेच्या यशासाठी अनेक उपक्रमांचे योगदान महत्त्वाचे आहे. चांद्रयान-२ च्या अपयशानंतर भारताने या उपकरणांच्या

रचनेमध्ये महत्वपूर्ण बदल करत चांद्रयान- ३ मधील उपकरणांची पुर्नरचना करत ही मोहिम फत्ते (Chandrayaan-3 mission) केली आहे.

Chandrayaan-3mission: इंटिग्रेटेड मॉड्यूल

चांद्रयान-३ मोहीमेत इंटिग्रेटेड मॉड्यूल तयार करण्यात आले आहे होते. यामध्ये लँडर मॉड्यूल (LM) + रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल (PM) या दोन वेगळ्या उपकरणांचा समावेश होता. हे इंटिग्रेटेड मॉड्यूल भारताचे बाहुबली रॉकेट LVM च्या सहाय्याने २४ जुलै रोजी चंद्राच्या दिशेने श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले. त्यानंतर विविध टप्पे पार करत आज अखेर भारताची चांद्रयान- ३ ही मोहिम यशस्वी झाली आहे. ही मोहीम फत्ते करण्यासाठी या उपकरणां महत्त्वाची भूमिका (Chandrayaan-3 mission बजावली.

LVM रॉकेट

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून १४ जुलै रोजी रॉकेट LVM च्या मदतीने चांद्रयान-३ अवकाशात झेपावले. चांद्रयान मोहीमेसाठी इस्रोने १०० हत्तींचे बळ असणाऱ्या LVM या बाहुबली रॉकेटचा या मोहीमेत महत्त्वाचा सहभाग होतो. भारताचे चांद्रयान- ३ नेणारे रॉकेट एलव्हीएम 3 हे देशाचे सर्वात अवजड रॉकेट आहे. या रॉकेटचे वजन 640 टन, लांबी 43.5 मीटर आहे. इंटिग्रेटेड मॉड्यूलमध्ये पुढील मॉड्यूलचा समावेश होता.

प्रोपल्शन मॉड्यूल (PM)

चंद्राच्या अंतिम कक्षेदरम्यान १७ ऑगस्ट रोजी प्रोपल्शन मॉड्यूल हे लँडर मॉड्यूलपासून वेगळे झाले. यानंतर प्रोपल्शन मॉड्यूल ऑर्बिटरची भूमिका बजावत आहे. प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या परिघातील वातावरणात फिरत राहिल. हे मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल तसेच पृथ्वीवरील जीवनचिन्हे दिसतात काय? याचाही अभ्यास करेल. हाच डेटा भविष्यात, इतर ग्रह, उपग्रह आणि ताऱ्यांवर पृथ्वीप्रमाणे जीवन आहे काय, त्याचा शोध घेण्यास उपयुक्त ठरू शकतो, असे इस्रोने म्हटले आहे.

स्वदेशी लँडर मॉड्यूल (LM)

लँडर : भारताच्या चांद्रयान- ३ मोहीमेत लँडर विक्रम मुख्य उपकरण आहे. उपकरणात रेट्रोरिफ्लेक्टर समाविष्ट असून, त्या माध्यमातून चंद्रावरून पृथ्वीवरील रेंजिंगची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू राहील. सिस्मोग्राफ भूगर्भीय प्रक्रिया समजून घेण्यात मदत करेल. चौथे उपकरण सरफेस थर्मोफिजिकल परीक्षण हे आहे. पटलावरील वरच्या आवरणातील_ रिगोलिथ तपीय परिचालकता यात मोजली जाईल
रोव्हर : रोव्हर प्रज्ञान हे विक्रम लँडरच्या आत ठेवले गेले आहे. यशस्वी लँडिंगनंतर रोव्हर चंद्राच्या भूभागावर उतरवले जाईल. यात अल्फा पार्टिकल एक्साईट स्पेक्ट्रोमीटर एपीईएस व लेजर इंड्यूसड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोपी अशी दोन उपकरणे आहेत. चंद्राच्या भूभागावरील घटक शोधणे, खनिजे व अन्य सामग्रीबाबत माहिती पुरवणे, हे त्याचे मुख्य कार्य असेल.

चांद्रयान- 3 चे महत्त्व काय?

चंद्राच्या अशा भागात लँडर उतरणार आहे, ज्याची काहीही माहिती आजवर उपलब्ध नाही. चंद्रावरील सोने, प्लॅटिनियम, युरेनियम आदी खनिज संपत्तीचा शोध घेतला जाणार आहे. अंतराळात चीनला प्रतिआव्हान देणे, या दृष्टिनेही ही मोहीम महत्त्वाची आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या