इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबीन क्लबचा उपक्रम

न्यू हायस्कूल कॉलेजच्या रक्त तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 

राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबीन क्लबचा उपक्रम


प्रतिनिधी (परळी वै.) : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व स्वामी विवेकानंद कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व महाराष्ट्र शासनाच्या रेड रिबीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन दि. 23 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.

                               शहरातील थर्मल कॉलनी परिसरातील न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व स्वामी विवेकानंद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, पालक तसेच परिसरातील नागरिकांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर परळी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आय.सी.टी.सी. विभागाचे शरद चव्हाण, अमोल गालफाडे, अविनाश व्हावळे, प्राचार्य बी.ए. नाईकनवरे , प्राचार्या डॉ. वनमाला गुंडरे, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगरचे सदस्य अजय सोळंके, उपप्राचार्य सुनील लोमटे, प्रा. रविशंकर स्वामी, प्रा. राजू कोकलगावे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयातील 130 विद्यार्थ्यांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य सुनील लोमटे यांनी केले. तर सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अंकुश वाघमारे व आभार प्रा. बाळासाहेब देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या