इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

Chandrayaan-3 मोहिमेचे 'हे' आहेत 'शिल्पकार', जाणून घ्या सविस्तर

 Chandrayaan-3 मोहिमेचे 'हे' आहेत 'शिल्पकार', जाणून घ्या सविस्तर


भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज इतिहास घडविला. चांद्रयान-३ मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथम चांद्रयान उतरवणारा देश, अशी भारताची ओळख झाली आहे. या ऐतिहासिक यशाचे शिल्पकारांविषयी जाणून घेण्यास उत्सुक असाल. चला तर चांद्रयान-३ मोहिमेच्या शिल्पकारांविषयी जाणून घेवूया.....

Chandrayaan-3 mission : इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ

भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान- ३ मोहिमेचे प्रमुख शिल्पकार हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस सोमनाथ यांना मानले जाते. त्यांनी जानेवारी २०२२ मध्ये संस्थेचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हीएसएससी) आणि लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरचे संचालक म्हणून काम केले. चांद्रयान-३ सोबतच आदित्य-एल१ ते सूर्य आणि गगनयान (भारताची पहिली मानव मोहीम) यासारख्या इतर महत्त्वाच्या मोहिमा त्यांच्या देखरेखीखाली आहेत.

प्रकल्प संचालक पी वीरामुथुवेल

पी वीरामुथुवेल हे २०१९ मध्ये चांद्रयान- 3 प्रकल्पाचे संचालक झाले. वीरमुथुवेल हे तामिळनाडूमधील विल्लुपुरम येथील असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासचे (IIT-M) माजी विद्यार्थी आहेत. त्यापूर्वी त्यांनी इस्रोच्या मुख्य कार्यालयातील अंतराळ पायाभूत सुविधा कार्यक्रम कार्यालयात उपसंचालक म्हणून काम केले. भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेच्या मालिकेची दुसरी आवृत्ती असलेल्या चांद्रयान-2 मोहिमेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Chandrayaan-3 mission : एस उन्नीकृष्णन नायर

जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (GSLV) मार्क - III, ज्याचे नाव लाँच व्हेईकल मार्क-III, रॉकेट असे ठेवण्यात आले आहे, हे केरळच्या तिरुवनंतपुरममधील थुंबा येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने विकसित केले आहे. व्हीएसएससीचे प्रमुख असल्याने एस उन्नीकृष्णन नायर आणि त्यांची टीम महत्त्वपूर्ण मिशनच्या विविध प्रमुख कार्यांसाठी प्रभारी आहेत.

एम शंकरन

एम शंकरन हे यू आर राव उपग्रह केंद्र (URSC) चे
संचालक आहेत. त्यांनी जून 2021 मध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. या केंद्रावर ISRO साठी भारतातील सर्व उपग्रह तयार करण्याची जबाबदारी आहे. दळणवळण, नेव्हिगेशन, रिमोट सेन्सिंग, हवामान अंदाज आणि इतर ग्रहांचा शोध घेण्यासाठी उपग्रह बनवणाऱ्या टीमचे मार्गदर्शक आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!