• राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने निवेदन

 ■ महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय कार्यालय परळीमध्ये आणणार- धनंजय मुंडे

• राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने निवेदन 


परळी वैजनाथ प्रतिनिधी

        महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय कार्यालय परळीमध्ये आणणार असल्याचे अश्वासन राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी दिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने याबाबत आज ना.धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कार्यालय परळीमध्ये सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.


             परळी औष्णिक विद्युत केंद्र,सिमेंट फॅक्टरी तसेच परिसरातील हजारो वीटभट्टी उद्योग वाढती वाहनांची संख्या यामुळे परळी शहर आणि परिसरात वायू प्रदूषण झपाट्याने वाढत असून डब्ल्यु एच ओ च्या वार्षिक गुणवत्ता मार्गदर्शक तत्वानुसार वायु गुणवत्ता निर्देशांक   हा ६ पट खराब आहे. ही गंभीर बाब निर्माण झालेली आहे. संभाजीनगर नंतर परळी वैजनाथ प्रदूषणाच्या बाबतीत आघाडीवर असणारे शहर आहे.पर्यावरणातील वाढते कार्बन मोनाक्साईड गंधक,यामुळे श्वसनाचे रोग,दमा,क्रॉनिक ऑबस्ट्रॅक्टीव्ह पल्मोनरी डिसिज (COPD) फुफ्फुसांची श्वसन क्षमता कमी होणे,कर्करोग त्वचेचा निस्तेजपणा वाढणे,हेअर फॉल या नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या वाढत चालल्या आहेत.वातावरणातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणाला रोखण्यासाठी सक्षम प्राधिकरण असणे गरजेचे आहे.महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय कार्यालय परळीमध्ये सुरु झाले तर प्रतिबंधात्मक आवश्यक त्या उपाययोजना तसेच विविध अभियान राबविणे शक्य होवून प्रदूषणाला रोखण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहता येईल अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे  यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.

         याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतिने शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी आज मुंबई येथे राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्यासोबत या विषयाव चर्चा करून निवेदन दिले. या विषयावर तात्काळ  धनंजय मुंडे यांनी सबंधित आयुक्तांना फोन करून या संबंधी सूचना दिल्या. लवकरच पर्यावरण मंत्री यांच्यासह बैठक आयोजित करुन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कार्यालय परळीमध्ये सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !