इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाबद्दल परळीत तिरंग्याची मिरवणूक काढत नागरिकांचा जल्लोष

 'आपला भाऊ सोमनाथ भाऊ' अशा आगळ्या वेगळ्या घोषणा देत शास्त्रज्ञांचे नागरिकांनी केले अभिनंदन



चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाबद्दल परळीत तिरंग्याची मिरवणूक काढत नागरिकांचा जल्लोष





परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा..

       संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान ३ मोहिम आज यशस्वी झाली. या गौरवशाली क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी नागरिकांकडून शहरांत मिरवणूक काढून राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. यावेळी पेढे भरवत शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने झाली.


सायंकाळी  सहाच्या सुमारास विक्रम लँडर चंद्रावर सुखरूप उतरल्याचे इस्रोने जाहीर केले त्यांनंतर राणी लक्ष्मीबाई टॉवर समोर चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाबद्दल नागरिकांनी आज ढोल ताशांच्या गजरात नाचून आनंदोत्सव साजरा केला. 


आपला भाऊ सोमनाथ भाऊ

'आपला भाऊ सोमनाथ भाऊ' अशा आगळ्यावेगळ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. इस्रोचे चेयरमन एस सोमनाथ व त्यांच्या शास्त्रज्ञ सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन ही मोहीम यशस्वी केली त्यामुळे त्या सर्वांचे अभिनंदन करत त्यांचा जयघोष केला गेला. जब तक सूरज चांद रहेगा हिंदुस्थान तेरा नाम रहेगा, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या